Interview Preparation : आजच्या या स्पर्धात्मक जगात नोकरी मिळवणे, हे एक आव्हानात्मक काम आहे. कोणतीही नोकरी प्राप्त करताना मुलाखतीला सामोरे जावे लागते. मुलाखती दरम्यान पारदर्शकता जपणे, खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्ही मुलाखती दरम्यान खोटं बोलत असाल तर त्यामुळे तुमची प्रतिष्ठा खराब होईलच पण त्याबरोबर तुमचे करिअर सुद्धा धोक्यात येईल. त्यामुळे नेहमी विचारपूर्वक बोलावे आणि आपले खरे कौशल्य दाखवावे.
१. तुम्हाला आता माहित नसलेली कौशल्ये पण तुम्ही शिकू शकतात आणि मिळवू शकतात –
आपल्याला एका वेळी MS Excel विषयी एक किंवा दोन फार्मुलासुद्धा माहित नव्हते तेव्हा आपण MS Excel ची कौशल्य येत असल्याचा दावा केला आहे पण जेव्हा प्रत्यक्षात आपल्याला एक किंवा दोन फार्मुलासुद्धा माहित नव्हते. पण जेव्हा तुमच्यापैकी काहींना खरोखर समजून घ्यायची वेळ आली असेल तेव्हा तुम्ही कदाचित एक कोर्स केला असेल आणि त्या कौशल्यात निपुण होण्याचा प्रयत्न केला असेल.
जेव्हा मुलाखतीदरम्यान, मुलाखतकार तुम्हाला विचारतो की तुम्ही एखाद्या विशिष्ट सॉफ्टवेअरमध्ये निपुण आहात का, आणि तुम्ही ते आधीच शिकत असाल किंवा ती गोष्ट शिकण्याची तुमची योजना असेल, तर तुम्ही नक्कीच हो म्हणू शकता. परंतु जर हे एक टेक्निकल कौशल्य असेल ज्यासाठी तुम्हाला सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे आणि मास्टर करण्यासाठी काही महिन्यांची आवश्यकता असेल तर त्यावेळी हे मान्य करणे योग्य आहे की आता तुम्हाला त्याविषयी ज्ञान नाही परंतु भविष्यात तुम्ही ते शिकण्यास तयार आहात.
२. जेव्हा मुलाखतदार तुम्हाला तुमच्या कमकुवतपणाबद्दल विचारतात –
हा एक कठीण प्रश्नांपैकी एक प्रश्न आहे आणि या प्रश्नाला अनेकदा बनावट उत्तरे दिले जातात. मुलाखतकाराला कोणते उत्तर अपेक्षित असते, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
हा प्रश्न एखाद्या व्यक्तीच्या आत्म-जागरूकतेच्या आणि सुधारण्याच्या इच्छेच्या पातळीचे मूल्यांकन करण्यासाठी विचारला जातो. उदा. जर तुम्ही लेखनाचे काम करत असाल आणि तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी बोलताना अडचण येत असेल, तर हे मान्य करणे योग्य आहे कारण सार्वजनिक ठिकाणी बोलण्याचा लेखकाशी काहीही संबंध नाही.
३. जेव्हा तुम्हाला तुमच्या पूर्वीच्या बॉसविषयी विचारले जाते –
जेव्हा मुलाखतीमध्ये तुम्हाला तुमच्या पूर्वीच्या बॉसबद्दल विचारले जाते तेव्हा त्यांच्याविषयी वाईट बोलण्याची ही योग्य वेळ नाही, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. हा प्रश्न विचारण्यामागील तुमच्या मुलाखतकाराचा हेतू तुमच्याबरोबर काम करणे योग्य आहे का, हे समजून घेणे आहे. तुमचं उत्तर त्यांना तुम्ही आव्हाने किती चांगल्या प्रकारे हाताळता किंवा विविध प्रकारच्या लोकांमध्ये कसे काम करता हे ठरविण्यात मदत करते.
विशेषत: जर तुम्ही तुमची नोकरी वाईट पद्धतीने सोडली असेल तर, नकारात्मक बोलू नका. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही कोणत्या प्रकारची कौशल्ये आत्मसात केली आणि ती तुमच्या पुढच्या नोकरीत कशी ही कौशल्ये वापरण्यास तुम्ही उत्सुक आहात, याविषयी बोला.
हेही वाचा : SBI मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! १५० जागांची भरती जाहीर; कसा अन् कुठे कराल अर्ज? जाणून घ्या
४. तुमच्या छंदांबद्दल आणि आवडींबद्दल विचारतात –
जेव्हा मुलाखतदार तुमच्या छंदांबद्दल आणि आवडींबद्दल विचारतात तेव्हा मुलाखत घेणारा तुम्ही संस्कृतीशी कसे जुळवून घेऊ शकता हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे.
उदा. जर तुम्ही फुटबॉल खेळायला आवडते असे सांगितले आणि भविष्यात तुम्हाला तुमच्या बॉसने आमंत्रित केले, तेव्हा तुम्हाला या खेळाविषयी माहीत नसेल तर तुमच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते.