Anganwadi Recruitment 2025 Notification: नोकरीच्या शोधात असणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागान अंगणावाडी सेविक तसेच अंगणवाडी मदतीन पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी एकूण ५६३९ अंगणवाडी सेविका पदांसाठी तसेच १३२४३ अंगणवाडी मदतनीस या पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जाईल. याच पार्श्वभूमीवर अर्ज करण्याच्या अटी काय आहेत? वयाची मर्यादा काय असावी? असे वेगवेगळे प्रश्न विचारले जात आहेत. त्यामुळे या भरती प्रक्रियेच्या सर्व अटी जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता व भाषेचे ज्ञानः अंगणवाडी मदतनीस या पदासाठी उमेदवार किमान इयत्ता १२ वी उत्तीर्ण (राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष) अशी किमान शैक्षणीक पात्रता आवश्यक राहील या मध्ये शैक्षणिक अर्हते पैकी किमान एक अर्हता मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण असने आवश्यक आहे.

नियम आणि अटी खालीलप्रमाणे

वयाची अट – अंगणवाडी मदतनीस या पदासाठी वयोमर्यादा दि. १८.०२.२०२५ रोजी किमान १८ व कमाल ३५ वर्ष अशी राहील. तथापी विधवा उमेदवारासाठी ही वयोमर्यादा कमाल ४० वर्ष राहील.

स्थानिक रहिवाशी असणे अट – अर्जदार महिला संबधित ग्रामपंचायत नव्हे तर महसुली गाव/वाडी/तांडा/वस्ती येथील स्थानिक रहिवाशी असावी.

अंगणवाडी मदतनीस या पदावर अंतिम निवड झाल्यास उमेदवारास पंचायत राज संस्थांच्या जि.प.पं.स.ग्रा.पं. सदस्य असल्यास या पदाचा राजीनामा द्यावा लागेल.

एका पदासाठी एकच अर्ज करावा लागेल. अंगणवाडीच्या अनुभवासाठी फक्त बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.

कोणती कागदपत्रे लागणार ?

  • तहसिल कार्यालयाचे रहिवासी प्रमाणपत्र (अनिवार्य)
  • लहान कुटूंबाचे प्रमाणपत्र
  • सक्षम प्राधिकारी यांचे जातीचे प्रमाणपत्र (लागु असल्यास)
  • सक्षम प्राधिकारी यांचे विधवाचे प्रमाणपत्र (लागु असल्यास)
  • शासकिय / अनुदानित संस्थेत दाखल असलेल्या अनाथ अर्जदाराचे बाबतीत सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र (लागु असल्यास)
  • शैक्षणीक अर्हता / पात्रता प्रमाणपत्र, गुणपत्रके अर्जा सोबत जोडलेली कागदपत्रे स्वतः साक्षांकित (Self Attested) केलेली जोडणे बंधनकारक राहील.
  • अंगणवाडी सेविका / अंगणवाडी मदतनीस यांना किमान आर्हता १२वी (HSC) उत्तीर्ण आवश्यक आहे उमेदवार पदवी/पदव्युत्तर इत्यादी बाबतचे गुणपत्रक व प्रमाणपत्र यांच्या सत्य प्रति.
  • डी.एड. पदविका, बी. एड. पदविका असल्यास त्याचे गूणपत्रक व प्रमाणपत्रक.
  • विधवा व अनाथ सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र (लागु असल्यास)
  • उमेदवार MS-CIT उत्तीर्ण असल्यास प्रमाणपत्र
  • अंगणवाडी सेविका/अंणवाडी मदतनीस / मिनी अंगणवाडी सेविका म्हणुन कमीत कमी २ वर्षाचा अनुभव असल्याचे प्रमाणपत्र. (लागु असल्यास)
  • आधार कार्ड