घोडे, गाई, बैल, म्हशी, कुत्री,मांजरे यांचे खेरीज माणसाचे जीवन अपूर्ण आहे हे अनेक शतकांनी सिद्ध केले आहे. या प्राण्यांना माणसासारखेच आजारपण येते. माणसासारखेच तेही जखमी होण्याची वेळ येते. त्यावेळी त्यांची काळजी घ्यावी लागते. अशावेळी प्राणिप्रेमी आणि त्यांनी तयार केलेली शेल्टरसारखी व्यवस्था ही अत्यंत गरजेची व उपयुक्त ठरते.

पाळीव प्राणी आणि जंगली प्राणी हा जसा फरक असतो तसाच त्रासदायक प्राणी आणि भीतीदायक प्राणी हाही गट आहे. माणुसकी सारखाच ‘प्राणुसकी’ हा शब्द रुळावा इतकी प्राणीप्रेमींची संख्येने शहरी भागात वाढ झालेली दिसते. छोट्या खेड्यात, ग्रामीण भागात हा भेदभाव फारसा दिसतच नाही हे लक्षात घेण्याजोगे वैशिष्ट्य नाही काय?

हेही वाचा >>> दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्ण संधी; इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस दलात भरती, जाणून घ्या कुठे कसा कराल अर्ज

एक छोटेसे उदाहरण द्यायचे झाले तर शहरात एखाद्या सोसायटीत कोणाला कुत्रे चावले तर तो चर्चेचा, भांडणाचा, काही वेळा तर मारामारीचाही विषय ठरतो. त्याच्या बातम्या वृत्तपत्रात छापून येतात. याउलट एखाद्या शेतकऱ्याला कुत्रे चावले तर तो म्हणतो त्याची काही चूक नव्हती. मीच त्याच्या जवळ गेलो, त्याला धक्का लागला म्हणून तो चावला. शेजाऱ्याच्या मांजराने घरात घुसून दूध सांडून पिऊन टाकले यावरून शहरात होणारी भांडणे तशीच. ग्रामीण भागात भाकरी भाजीचा रुमाल सोडून जेवायला बसलेला कामकरीसमोर भटका कुत्रा आला तरी त्याला चतकोर भाकरी सहज काढून देतो. हा उल्लेख करण्याची गरज जेव्हा प्राणिप्रेमाचा अतिरेक काहीजण करतात त्यावेळी सुरू होते.

महासाथीच्या काळात अशीच भांडणे खूप झाली. पहाटेच्या वेळी कामावर जाणाऱ्या व्यक्ती, दूधवाले, पेपर टाकणारी मुले, पोस्टमन एवढेच काय रात्री-अपरात्री व्हिजिटला जाणारे डॉक्टरसुद्धा भटक्या कुत्र्यांच्या तावडीत सापडतात. कुत्र्यांच्या चाव्यापेक्षा त्यातून होणारा रेबीज हा रोग १०० टक्के जीवघेणा असल्यामुळे सर्वांच्या मनात प्रचंड भीतीचा गोळा असतो. रेबीज होऊ नये यासाठी दिली जाणारी इंजेक्शन खाजगीमध्ये काही हजारांच्या घरात जातात, तर सरकारी दवाखान्यात सहज उपलब्ध असत नाहीत. कोणत्याही प्राण्याची मादी व्यायल्यानंतर पिल्लांच्या संरक्षणासाठी ती अत्यंत आक्रमक होते. शहरी भागात यामुळे होणारा त्रास हा जागेअभावी सगळ्यांना सोसावा लागतो. त्यातून ही मादी भटकी असेल तर तो भांडणाचाच विषय होतो. शहरात प्राणिप्रेमी तिची काळजी घेतात तर इतरांना ते नकोसे व अवाजवी वाटते.

सहजीवन

घोडे, गाई, बैल, म्हशी, कुत्री,मांजरे यांचे खेरीज माणसाचे जीवन अपूर्ण आहे हे अनेक शतकांनी सिद्ध केले आहे. या प्राण्यांना माणसासारखेच आजारपण येते. माणसासारखेच तेही जखमी होण्याची वेळ येते. त्यावेळी त्यांची काळजी घ्यावी लागते. अशी काळजी घेण्याकरता शहरी भागात जागा नसते माणूस बळ अपुरे पडते. खर्च अफाट येतो. अशावेळी प्राणी प्रेमी आणि त्यांनी तयार केलेली शेल्टरसारखी व्यवस्था ही अत्यंत गरजेची व उपयुक्त ठरते. ज्यांच्याकडे पाळीव कुत्रा, मांजर आहे त्यांना कुठे गावाला जायचे असले तर त्याची व्यवस्था करण्यासाठी आता मोठ्या शहरांतून प्राण्यांची हॉस्टेल्स निघाली आहेत. पण गमतीची गोष्ट म्हणजे अशा हॉस्टेलमध्ये ठेवलेल्या प्राण्यांची नीट देखभाल न करता हेळसांड केल्याबद्दल एखादा अतिरेकी प्राणीप्रेमी पोलिसांत जाऊन तक्रार करतो, त्यावेळी ती पेपरची बातमी होते. खरे तर यातील सीमारेषा अतिशय तरल असून ज्यांना प्राणी आवडतात त्यांनी आणि ज्यांना प्राणी नकोसे वाटतात अशांनी एकमेकांना समजून घेण्याची गरज असते.

अशातच एखाद्या दिवशी शहरातील भटक्या कुत्र्यांनी लहान बालकाचा चावून जीव घेतल्याची बातमी आली की या दोघांतील लढाईला जोरदार तोंड फुटते. वृत्तपत्रातील पत्र लेखनाला यातून उभय बाजूंना जोर येतो. अशीच भांडणे काही प्राणिप्रेमी गावातील भटक्या कुर्त्यांना जागोजागी खायला घालतात त्यावरून होतात. काही दानशूर प्राणीप्रेमी आपल्या गाडीतून किंवा एखाद्या भाड्याच्या टेम्पो मधून शहरातील भटक्या कुत्र्यांना ठराविक वेळेला खायला घालतात. त्यांची गाडी आली की प्रेमाने त्यांचे स्वागत करणारी कुत्री पाहून हे काम किती गरजेचे आहे हे लक्षात येते. भटक्या कुत्र्यांची नसबंदी करून त्यांना पुन्हा त्याच जागी सोडून देणे हे महापालिका काम करते. पण याचा उपयोग होत नाही व भटक्या कुत्र्यांची संख्या अमाप वाढत आहे हेही संख्याशास्त्रातून सिद्ध होत असते. त्यातच गेली २५ वर्षे सुप्रीम कोर्टाने भटक्या कुत्र्यांना मारून टाकू नये असा कायदा केल्यामुळे हा प्रश्न दोन्ही गटातील भांडणाचा विषय झाला आहे.

अतिरेक नको कोणत्याही विषयात अतिरेकी भूमिका घेतली की समाजातील बहुसंख्यांचे स्वास्थ्य नाहीसे होते हे मात्र खरे आहे. कुत्रा व मांजर हे उपजत एकमेकांचे शत्रू. पण एखाद्या घरात दोघेही सुखाने एकत्र नांदताना दिसतात त्यावेळी सामंजस्याची भूमिका किती गरजेची आहे हे लक्षात येते.

Story img Loader