डॉ.श्रीराम गीत

शिक्षक दिनाच्या दिवशी लिहिलेल्या मागच्या मंगळवारचे लेखाचा आजचा हा पुढचा भाग समजायला हरकत नाही. मात्र आजच्या भागातील काही माहिती जाणकार वाचकांना सुद्धा थोडीशी धक्कादायक वाटण्याची शक्यता आहे. हुशार समजल्या जाणाऱ्या सर्व विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांचे बोलण्यात, चर्चेत, स्वप्नात कायम ज्या नामवंत इंजिनीअिरग, मेडिकल व मॅनेजमेंट संदर्भातील भारतीय संस्थांची नावे येत असतात तेथील शिक्षकांची परिस्थिती काय असते याचा सारांशाने गेल्या ५० वर्षांतील आढावा घेतला तर काय दिसते? एक गमतीची बाब समोर येते.

uddhav Thackeray Devendra fadnavis
“पुढील मकर संक्रांतीपर्यंत ठाकरे-फडणवीस एकत्र”, आमदार रवी राणांचा दावा
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
यूपीएससीची तयारी : ‘जीएस’ची तयारी
Babasaheb Ambedkar Marathwada University ,
नामविस्तारानंतर आंबेडकरी चळवळीची वाढ खुंटलेली कशी?
Devendra Fadnavis News
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “मागच्या दहा वर्षांत २०१९ हे वर्ष आलंच नसतं तर…”
Santosh Deshmukh Murder Case
Devendra Fadnavis : संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा
assistant professor without NET-SET
सहायक प्राध्यापक होणे नेट-सेटशिवायही शक्य?
savitribai phule pune university warns affiliated colleges for not providing naac information
‘नॅक’ची माहिती न दिल्यास प्रवेशांवर निर्बंध; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संलग्न महाविद्यालयांना इशारा

याच संस्थांमध्ये शिकलेले आणि तेथेच शिकवायला सुरुवात केलेले किंवा बाहेर कामाचा अनुभव घेऊन तिथे परतलेले एकूण अध्यापक, विभाग प्रमुख किंवा संस्थाप्रमुख यांची संख्या एकूण प्राध्यापकांमध्ये जेमतेम पंधरा ते वीस टक्के एवढीच भरते. या स्थितीमध्ये गेल्या ५० वर्षांमध्ये फारसा फरक पडलेला नाही. सामान्यपणे या साऱ्या संस्थांकडे व तिथे शिकवणाऱ्या प्रत्येकाकडे गाभाऱ्यातील देवाकडे पहावे तसे समाजाकडून पहिले जाते. ही सारी मंडळी उच्चशिक्षित नक्की असतात. शिकवण्याचा अनुभव यथावकाश येत असतो. मात्र, मातृसंस्थेतच संपूर्ण शिक्षण घेऊन तिथेच काम करावे अशा स्वरूपाचे दिशादर्शक वळण वा पद्धत गेल्या ५० वर्षांत आपण पाडू शकलेलो नाही. अजूनही एक गोष्ट ठळकपणे सातत्याने जाणवत राहते. रिकाम्या होणाऱ्या अध्यापकांच्या जागा योग्य त्या माणसां अभावी अनेक वर्षे रिकाम्या राहतात. हे प्रमाण अनेकदा पंचवीस टक्के एवढे मोठे असते. असे असले तरी देवळाच्या शिखराकडे बघून आपण गाभाऱ्यात काय आहे याचा विचार करत नाही व देवळाच्या पायरीशीच चप्पल काढून, मान झुकवून, नमस्कार करतो, पुढे कामाला लागतो तसेच येथेही घडत राहते.

या साऱ्याच्या कारणांमध्ये साधीशी गोष्ट दडलेली आहे. ती म्हणजे शिक्षकी पेशाबद्दलची अनास्था. ही समाजाकडून जितकी वाढत जाते तितकीच त्या त्या व्यावसायिकांमध्ये मनात पक्की मुरते. उदाहरणार्थ शहरातील खासगी कार्पोरेट रुग्णालयातील नामवंत डॉक्टर जास्त हुशार व कौशल्य असलेला अशी ठाम समजूत शहरात असेल तर त्याच शहरातील तो डॉक्टर तयार करण्याच्या मेडिकल कॉलेजमधील नामवंत प्राध्यापक डॉक्टरांना मानसिक उभारी कशी येईल? एखाद्या कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टरला किंवा सीईओला शहरातील विविध कार्यक्रमात जो मान दिला जातो, वृत्तपत्रात त्यांचे नाव छापले जाते, त्यांच्या मुलाखती घेतल्या जातात तसे कोणतेही नामवंत मॅनेजमेंट संस्थेतील प्राध्यापकांचे बाबतीत फारच क्वचित घडते. मात्र, ज्यांचे कौतुक केले जाते ते कोणत्या संस्थेत शिकले आहेत त्याचा उल्लेख मात्र प्रत्येक कार्यक्रमात आवर्जून केला जातो. उदाहरणच द्यायचे तर अमुक व्यक्ती अमुक आयआयटीतून बाहेर पडली किंवा अमुक व्यक्तीने अमुक आयआयएममधून शिक्षण पूर्ण केले हा उल्लेख सहजगत्या पेपर उघडला तर वाचायला मिळतो. या संस्थांमध्ये शिकवतो कोण? तेथील प्रमुख कोण? त्यांची नावे काय? याबद्दल सहज चौकशी केली असता नुकत्याच प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांला त्यातील एकही गोष्ट सांगता येत नाही. मुंबईतील सुप्रसिद्ध संस्थेमध्ये पदवीसाठी मला प्रवेश मिळवायचा आहे आणि ते स्वप्न पूर्ण झाले म्हणून जुलै महिन्यात मला एका विद्यार्थ्यांचा फोन आला. तो व त्याचे आई-वडील या तिघांनाही त्या संस्थेच्या प्राचार्याचे नाव सुद्धा सांगता आले नाही. किंबहुधा मी ते का विचारतो आहे असाच भाबडा प्रश्न त्यांना पडला होता.

या उलट आज परदेशातील प्रत्येक नामवंत संस्थेची परिस्थिती गेली शंभर वर्षे तरी टिकून कायम आहे. एका भारतीय व्यक्तीची हार्वर्ड विद्यापीठाचा प्रमुख म्हणून नेमणूक झाली. त्यावेळी ते कितवे संचालक झाले, त्यांच्या आधीचे कोण कोण होते, त्यांच्या कामाचे क्षेत्र कोणते होते याचा सविस्तर आढावा प्रमुख वृत्तपत्रात छापून आला होता. एवढेच काय भारतीय वृत्तपत्र सृष्टीने सुद्धा ती दखल ठळकपणे घेतली होती. असे फारसे भारतीय संदर्भात कधी घडल्याचे आठवत नाही. या उलट विविध शिक्षण संकुलांच्या शिक्षण महर्षीच्या बद्दल ठळकपणे त्यांच्या फोटोसकट (जाहिरातीने) भरलेल्या पुरवण्याच्या पुरवण्या कायम आढळतात. अपवाद लोकसत्तामधील ‘माझे गुरू’ या सदराचा. अशावेळी एक जुनी आठवते. आपण जे पेरतो तेच उगवते.

तीव्र स्पर्धेमध्ये धावण्यापूर्वी दरवेळी आपण का कमी पडतो याची खरी कारणे म्हणजे उत्तम प्रशिक्षण देणाऱ्यांचा सन्मान ,आदर आणि कौतुक करायचे असते हेच विस्मरणात जात आहे..

Story img Loader