कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड ( KRCL). ( Notification No. CO/ APPR/ २०२४/०१) अॅप्रेंटिसशिप (अमेंडमेंट) अॅक्ट, १९७३ अंतर्गत ग्रॅज्युएट/ डिप्लोमा इंजिनिअर्स/ ग्रॅज्युएट (जनरल स्ट्रीम) ची १ वर्षाच्या अॅप्रेंटिसशिप ट्रेनिंगकरिता भरती. एकूण रिक्त पदे – १९०.
कॅटेगरी – ( I) ग्रॅज्युएट अॅप्रेंटिसेस – पात्रतेनुसार KRCL च्या क्षेत्रातील रिक्त पदांचा तपशील –
(i) सिव्हील इंजिनीअरिंग – ३० पदे (अजा – ४, अज – २, इमाव – ८, ईडब्ल्यूएस – २, खुला – १४).
पात्रता : सिव्हील इंजिनीअरिंग पदवी उत्तीर्ण.
(ii) इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग – २० पदे (अजा – ३, अज – १, इमाव – ५, ईडब्ल्यूएस – १, खुला – १०).
पात्रता : इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर इंजिनिअरींग किंवा समतुल्य इंजिनीअरिंग पदवी उत्तीर्ण.
(iii) इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग – १० पदे (अजा – १, इमाव – २, ईडब्ल्यूएस – १, खुला – ६).
पात्रता : इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ आयटी/ कम्युनिकेशन इंजिनीअरिंग/ कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग/ कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर इंजिनीअरिंग पदवी उत्तीर्ण किंवा समतुल्य इंजिनिअरींग पदवी.
(iv) मेकॅनिकल इंजिनीअरिंग – २० पदे (अजा – ३, अज – १, इमाव – ५, ईडब्ल्यूएस – १, खुला – १०).
पात्रता : मेकॅनिकल/ इंडस्ट्रियल/ ऑटोमोबाईल/ प्रोडक्शन इंजिनीअरिंग पदवी.
कॅटेगरी – ( II) टेक्निशियन (डिप्लोमा) अॅप्रेंटिसेस –
(i) डिप्लोमा सिव्हील – ३० पदे (अजा – ४, अज – २, इमाव – ८, ईडब्ल्यूएस – २, खुला – १४).
पात्रता : सिव्हील इंजिनीअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण.
(ii) डिप्लोमा इलेक्ट्रिकल – २० पदे (अजा – ३, अज – १, इमाव – ५, ईडब्ल्यूएस – १, खुला – १०).
पात्रता : इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर इंजिनीअरिंग किंवा समतुल्य इंजिनीअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण.
(iii) डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स – १० पदे (अजा – १, इमाव – २, ईडब्ल्यूएस – १, खुला – ६).
पात्रता : इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ आयटी/ कम्युनिकेशन/ कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग/ कॉम्प्युटर इंजिनीअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण.
(iv) डिप्लोमा मेकॅनिकल – २० पदे (अजा – ३, अज – १, इमाव – ५, ईडब्ल्यूएस – १, खुला – १०).
पात्रता : मेकॅनिकल/ इंडस्ट्रियल/ ऑटोमोबाईल/ प्रोडक्शन इंजिनीअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण.
कॅटेगरी – (III) ग्रॅज्युएट अॅप्रेंटिसेस –
(i) जनरल स्ट्रीम ग्रॅज्युएट – ३० पदे (अजा – ४, अज – २, इमाव – ८, ईडब्ल्यूएस – २, खुला – १४).
पात्रता : B.A./ B.Sc./ B.Com./ B.B.A./ B.M.S./ B.J.M.C./ B.B.S. पदवी उत्तीर्ण.
पात्रता परीक्षेच्या अंतिम निकालाची वाट पाहणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करू नये.
पात्रता परीक्षा २०२०, २०२१, २०२२, २०२३ आणि २०२४ मध्ये उत्तीर्ण केलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. सर्व सेमिस्टर्सचे मिळून सरासरी गुण राऊंडींग ऑफ न करता दाखवावेत.
वयोमर्यादा : दि. १ सप्टेंबर २०२४ रोजी १८२५ वर्षे. (इमाव – २८ वर्षे, अजा/अज – ३० वर्षे)
अर्जाचे शुल्क : रु. १००/-. (अजा/ अज/ महिला/ अल्पसंख्यांक/ ईडब्ल्यूएस यांना फी माफ आहे.)
स्टायपेंड : ग्रॅज्युएट अॅप्रेंटिसेस रु. ९,०००/- आणि टेक्निशियन (डिप्लोमा) अॅप्रेंटिसेस रु. ८,०००/- दरमहा स्टायपेंड दिले जाईल. स्टायपेंड मिळण्यासाठी उमेदवारांकडे (स्वतच्या नावे असलेले) आधार कार्डाशी जोडलेले बँक खाते असणे आवश्यक.
निवड पद्धती : पदवी/डिप्लोमा परीक्षेतील सर्व सेमिस्टर्सचे मिळून सरासरी टक्केवारी पाहून गुणानुक्रमे रिक्त पदांच्या ३ पट उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविले जाईल. कोंकण रेल्वे प्रोजेक्टसाठी जमीन संपादित झालेल्या कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी, नातू, नात यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
KRCL च्या कार्यक्षेत्रातील महाराष्ट्र राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग; गोवा राज्यातील उत्तर गोवा, दक्षिण गोवा आणि कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नाडा, उडुपी, दक्षिण कन्नाडा या जिल्ह्यांतील उमेदवारांना दुसरे प्राधान्य देण्यात येईल.
ऑनलाइन अर्जासोबत पुढील कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे. फोटो आणि स्वाक्षरी; आरक्षणाचा दावा करणारे इमाव/अजा/ अज उमेदवारांनी केंद्र सरकारमधील नोकरीसाठी लागणाऱ्या नमुन्यातील जातीचे दाखले; प्रकल्पग्रस्तांसाठीचा तहसीलदारांचा दाखला; अल्पसंख्यांक दाखला; ईडब्ल्यूएससाठी उत्पन्नाचा दाखला इ. कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे.
ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी ठअळर पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. कागदपत्र पडताळणीच्या वेळी ठअळर कऊ सादर करणे अनिवार्य आहे.
ऑनलाइन अर्ज https:// konkanrailway. com/ या संकेतस्थळावर दि. २ नोव्हेंबर २०२४ पर्यंत करावेत. ( Quick Links -; Graduate Apprentice/ Technician Apprentices for training in KRCL)