Army Welfare Placement Organization Recruitment 2023: आर्मी वेल्फेअर प्लेसमेंट ऑर्गनायझेशन (AWPO) ने काही जागांसाठीची भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. ही भरती मध्य रेल्वेच्या ‘रेल्वे गेटमन आणि DFCCL मुंबई या पदासंसाठी जाहीर करण्यात आली आहे. भरतीसाठीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया. आर्मी वेल्फेअर प्लेसमेंट ऑर्गनायझेशन (AWPO) भरती बोर्ड, पुणे यांनी एप्रिल २०२३ च्या जाहिरातीमध्ये एकूण २५० रिक्त पदांची घोषणा केली आहे. या जाहीरातीनुसार उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
आर्मी वेल्फेअर प्लेसमेंट ऑर्गनायझेशन भरती २०२३.
पदाचे नाव – रेल्वे गेटमन.
रिक्त पदे – २५०
नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
शैक्षणिक पात्रता – १० वी पास.
वयोमर्यादा – ५४ वर्षाखालील सर्व उमेदवार.
पगार – ३१ हजार ५०० ते ३२ हजार रुपयांपर्यंत.
अर्जाची पद्धत – ऑफलाईन.
हेही वाचा- मुंबईमध्ये सरकारी नोकरीसाठी भरती जाहीर; MIDC अंतर्गत रिक्त पदांसाठी कसा कराल अर्ज
निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे
महत्वाची तारीख –
मुलाखतीची (माजी सैनिक भरती मेळावा) तारीख – २५ एप्रिल २०२३.
मुलाखतीचा पत्ता: एमआयआरसी, अहमदनगर.
आवश्यक कागदपत्रे –
ओळखपत्र, पेन्शन बुक, पीपीओ, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, कॅन्सल चेक, पासपोर्ट साईज १० फोटो.
भरतीबाबतची सविस्तर माहीती पाहण्यासाठी https://indianarmy.nic.in/ या अधिकृत बेवसाईटला अवश्य भेट द्या.
जाहिरात पाहण्यासाठी https://drive.google.com/file/d/1cuxpoYX0G5So91BVu-dUdJQz5tyIaove/view?usp=share_link या लिंकला भेट द्या.