फारुक नाईकवाडे

मागील लेखामध्ये इतिहास या घटकावर मागील काही वर्षांत विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे विश्लेषण आपण पाहिले. या आणि पुढील लेखामध्ये या घटकाची तयारी कशी करावी ते पाहू. या घटक विषयाचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे देण्यात आला आहे:

nyaymurti mahadev govind ranade lokrang article
प्रबोधनयुगाच्या प्रवर्तकाचे विचार
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Gods Guns and Missionaries The Making of Modern Hindu Identity Hindu
‘हिंदू कोण’ याचा शोध
Gulbadan Begum's Hajj Pilgrimage
Mughal History: गुलबदन बेगमची हजयात्रा: श्रद्धेचा व स्वातंत्र्याचा शोध, ही यात्रा का ठरली इस्लामिक साम्राज्याची ओळख?
Tarkatirtha Laxman Shastri Joshi Marxs Hindi Ancestor
तर्कतीर्थ विचार: मार्क्सचे हिंदी पूर्वज
Buddha head Ratnagiri
Buddha head Ratnagiri: भव्य बुद्धशीर्ष व मोठा तळहात रत्नागिरीत सापडण्यामागचा अर्थ काय?
maha Kumbh Mela and flow of techniques in Hindu religion culture society structure
‘कुंभमेळा’ आणि हिंदू धर्म-संस्कृती-समाज रचना यांतील तंत्र प्रवाह!
Lakshman Shastri Joshi Manusmriti Dahan and Tarkatirtha
तर्कतीर्थ विचार: मनुस्मृती दहन व तर्कतीर्थ

‘भारताचा इतिहास (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) व राष्ट्रीय चळवळ’

अभ्यासक्रमामध्ये प्राचीन व मध्ययुगीन कालखंडाचा उल्लेख नाही. पण भारताचा इतिहास व राष्ट्रीय चळवळ असा उल्लेख असल्यामुळे या दोन कालखंडांचा अभ्यासही आयोगाला अभिप्रेत आहे ते लक्षात घ्यावे लागेल. शिवाय प्रश्न पत्रिकांच्या विश्लेषणावरूनही ही बाब स्पष्ट होते. प्राचीन अणि मध्ययुगीन इतिहासाचा कालखंड हा खूपच विस्तृत आहे. त्यात महाराष्ट्राचा विशेष संदर्भ असल्याने या कालखंडातील महाराष्ट्राचा अभ्यास अजूनच खोलवर करावा लागतो.

हेही वाचा >>> NMC Nagpur Recruitment 2024 : नागपूर महानगरपालिकेत ‘या’ रिक्त पदाकरिता थेट मुलाखत, जाणून घ्या मुलाखतीची तारीख

आधुनिक भारतीय इतिहासातील मुद्दे, घटना यांची तोंड ओळख असल्याने याविषयी उमेदवारांना सर्वसाधारण माहिती असते. पण तुलनेने प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास घटकाच्या अभ्यासाविषयी क्लिअर प्लॅन नसतो. त्यामुळे बरेच वेळा हा घटक पाहिल्यावर नवीन उमेदवारांना स्पर्धा परीक्षा खूप विस्तारलेली किंवा खूप अवघड आहे असे वाटू लागते. तुलनेने अवघड वाटणाऱ्या या घटक विषयाचा अभ्यास सोप्या पद्धतीने कसा करता येईल ते या लेखात पाहू.

प्राचीन कालखंड

महाराष्ट्रातील प्रागैतिहासिक पुरातत्व स्थळे, त्यांचा काळ, उत्खननातील वस्तू आणि त्या त्या कालखंडाबाबत इतिहासकारांची मते माहीत असायला हवीत. त्याबरोबरच भारतामध्ये अन्य ठिकाणच्या प्रागैतिहासिक पुरातत्व स्थळांचा आढावा घ्यायला हवा.

सिंधु संस्कृतीमधील पुरातत्व स्थळे, तेथील उत्खननात सापडलेल्या वस्तू, त्यांची वैशिष्ट्ये, उत्खननकर्ते, नगर रचनेची ठळक वैशिष्ट्ये, कालखंड व अस्ताबाबतची इतिहासकारांची मते या बाबी माहित असायला हव्यात.

वैदिक व उत्तरवैदिक कालखंडातील ग्रंथ व त्यांचे विषय व त्यांतील महत्त्वाचे मुद्दे, साहित्य, साहित्यकार यांवर अभ्यास करताना भर द्यायला हवा. या काळातील आर्थिक व्यवहार, सामाजिक रचना, सांस्कृतिक बाबी आणि राजकीय जीवन यांचा आढावा घ्यायला हवा.

जैन व बौद्ध धर्मांचा उदय व विस्तार, त्यांची मुख्य शिकवण, महत्त्वाचे ग्रंथ, राजाश्रय यांचा अभ्यास आवश्यक आहे. या काळातील सोळा महाजनपदे आणि त्यांचे महत्त्वाचे शासक यांचा आढावा घ्यायला हवा.

तमिळ संगम साहित्य, त्यांचे साहित्यकार आणि ग्रंथ, महत्त्वाच्या ग्रंथांमध्ये वर्णन केलेले विषय, कालखंड, राजवटी / राजाश्रय यांच्या नोट्स काढून अभ्यास करायला हवा. या काळातील महत्त्वाच्या राजवटी आणि त्यांमधील संघर्षाचाही आढावा घ्यायला हवा.

हेही वाचा >>> ESIS Pune Recruitment 2024 : महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्थेत भरती सुरू; पाहा अधिक माहिती….

मौर्य व गुप्त साम्राज्यांच्या इतिहासाच्या अभ्यासाचे स्त्रोत, शिलालेख, नाणी, साहीत्य यांच्या टेबलमध्ये नोटस काढाव्या. या कालखंडातील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय जीवनाचे स्वरूप समजून घ्यावे. विशेषत: अशोकाच्या कालखंडातील प्रशासन व बौद्ध धर्मविषयक बाबी बारकाईने अभ्यासाव्यात. गुप्त कालखंडातील कला, नाणी व राजकीय घडामोडींवर जास्त भर द्यावा.

प्राचीन महाराष्ट्रातील सातवाहन घराणे, वाकाटक, बदामीचे चालुक्य, राष्ट्रकूट घराणे, शिलाहार, गोंड घराणे या घराण्यांचा अभ्यास करताना घराणे/ राजवटीचा कालखंड, संस्थापक, महत्त्वाचे राजे, शाखा व त्याचे प्रमुख, राजधानी (आर्थिक/सांस्कृतिक), आर्थिक, सामाजिक स्थिती, सांस्कृतिक योगदान, महत्त्वाच्या घटना, प्रमुख युद्धे या बाबींचा तुलनात्मक अभ्यास करणे फायद्याचे ठरते.

मध्ययुगीन कालखंड

मध्ययुगीन कालखंडामध्ये राजकीय आणि सामाजिक- सांस्कृतिक अभ्यासावर भर असावा. हर्षाच्या अस्तानंतर सल्तनत कालखंडापर्यंतचे प्रादेशिक राज्ये, त्यांचे महत्त्वपूर्ण राजे, लढाया, त्यांचे परिणाम, समकालीन जगभरातील घटना आणि त्यांचा भारतावरील परिणाम हे मुद्दे असणारे टेबल तयार करावेत. सल्तनत व मुघल काळातील महत्त्वाचे राज्यकर्ते, त्यांचे महत्त्वाचे आर्थिक – सामाजिक निर्णय, महत्त्वाच्या लढाया व त्यांचे निर्णय यांचा टेबलमध्ये अभ्यास करावा.

मध्ययुगीन महाराष्ट्रातील प्रमुख राजवटींचा अभ्यास – चालुक्य, यादव, बहामनी – (ईमादशाही, निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, बरीदशाही) महत्त्वाचे राज्यकर्ते, त्यांचे महत्त्वाचे निर्णय, महत्त्वाच्या लढाया व त्यांचे निर्णय या मुद्द्यांच्या आधारे करावा.

मध्ययुगीन कालखंड हा सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध होता. या कालखंडातील सांस्कृतिक जीवन अभ्यासण्यासाठी इग्नूच्या नोट्स हा उत्तम संदर्भ ठरतो. या काळातील विविध कला व शास्त्रीय शोधांचा आढावा घ्यायला हवा. वास्तुकला, चित्रकला व संगीत आणि नृत्य या दृष्यकलांचा वेगवेगळ्या शैली, आणि त्यांची वैशिष्ट्ये व त्यांचे क्षेत्र या मुद्द्यांच्या आधारे नोट्स काढून अभ्यास करावा. भारतातील वेगवेगळ्या राज्यांच्या आश्रयाला असलेले साहित्यिक, इतिहासकार आणि त्यांच्या रचना व त्यातील महत्त्वाच्या साहित्यकृतींचा विषय, या कालखंडातील परकीय प्रवासी आणि त्यांची प्रवासवर्णने यांचा टेबलमध्ये नोट्स काढून अभ्यास करावा. प्रश्नांचे वस्तुनिष्ठ स्वरूप लक्षात घेता नोट्स काढणे आणि त्यांची उजळणी करणे या घटकाच्या परिणामकारक तयारीसाठी अत्यंत आवश्यक आहे.

मराठा कालखंड (१६३०१८१८)

मराठा राजवटीचा कालखंड छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेपासून १८१८ पर्यंत असा आहे. शिवाजी महाराजांच्या महत्त्वाच्या लढाया, तह, ठळक घडामोडी, अष्ट्प्रधान मंडळ, आर्थिक व राजकीय निर्णय यांचा बारकाईने अभ्यास करावा. पेशव्यांची कारकीर्द अभ्यासताना महत्त्वाचे पेशवे, त्यांच्या लढाया व त्यांचे निर्णय, तह, महत्त्वाचे मराठा सरदार व त्यांचे कार्यक्षेत्र हे मुद्दे लक्षात घ्यावेत. वारकरी संप्रदाय, महानुभाव पंथ, इतर मध्ययुगीन संत, त्यांच्या रचना, त्यांची शिकवण यांचा आढावा घ्यायला हवा. वारकरी संप्रदाय तसेच महाराष्ट्रातील इतर संतांच्या व्यक्तिगत आयुष्यातील बाबीही माहीत असणे आवश्यक आहे.

Story img Loader