रोहिणी शहा

मागील वर्षीपासून अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सर्व गट ब अराजपत्रित आणि गट क संवर्गांच्या परीक्षांचा पहिला टप्पा म्हणून सुरू झाली. या व त्यामागील गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षेमध्ये नागरिकशास्त्र या घटकावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे विश्लेषण व त्या आधारे तयारी करताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे या लेखामध्ये पाहू.

TET, AI Technology TET, TET candidates,
टीईटी परीक्षेत एआय तंत्रज्ञान वापरल्याचा परिणाम काय? किती उमेदवारांनी दिली परीक्षा?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
BCCI conducts 6 hour review meeting with Indian team management
BCCI : टीम इंडियाच्या पराभवावर सहा तास चालली बीसीसीआयची बैठक, रोहित-गंभीरला विचारले ‘हे’ तीन महत्त्वाचे प्रश्न
election day fun facts election day activities voting activities on Election Day
मतदान दिनाच्या गमतीजमती!
MPSC Mantra State Services Main Exam Science and Technology
MPSC मंत्र: राज्यसेवा मुख्य परीक्षा; विज्ञान व तंत्रज्ञान
maharashtra assembly election 2024, Mahayuti Campaign, Palghar, Dahanu,
महायुतीच्या प्रचारात गुजरातमधील निरीक्षकांची देखरेख
Thane district, 578 children came under education stream, Survey of out of school children
ठाणे जिल्ह्यातील ५७८ मुले आली शिक्षणाच्या प्रवाहात
Ajit Pawar lashed out at the group over the issue of disclaimer regarding the clock symbol print politics news
घड्याळाबाबत अस्वीकरणाच्या मुद्द्यावरून अजित पवार गटाला फटकारले

● प्रश्न १. महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियमातील ग्राम विकास समित्यासंबंधीच्या तरतुदी बाबत खालील विधाने विचारात घ्या :

अ. ग्राम विकास समितीतील सदस्यांची एकूण संख्या सातपेक्षा कमी नसेल आणि सतरा पेक्षा जास्त नसेल.

ब. ग्राम विकास समितीतील सदस्यांपैकी एकतृतीयांशापेक्षा कमी नसतील इतके सदस्य ग्राम पंचायतीच्या सदस्यांमधील असतील.

क. तिच्या सदस्यांपैकी एक द्वितीयांशापेक्षा कमी नसतील इतके सदस्य महिला असतील.

ड. उप सरपंच हा तिचा पसिद्ध अध्यक्ष असेल.

ई. ग्रामसेवक हा तिचा पदसिद्ध सदस्य-सचिव असेल.

वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत?

(१) फक्त अ, ब, क आणि ड

(२) फक्त ब, क आणि ई

(३) फक्त अ, ब, क आणि ई

(४) वरील सर्व

हेही वाचा >>> नोकरीची संधी : केंद्रीय लोकसेवा आयोगातील संधी

● प्रश्न २. संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा ….मध्ये तयार केला.

(१) जानेवारी, १९४७

(२) मार्च, १९४७

(३) सप्टेंबर, १९४७

(४) ऑक्टोबर, १९४७

● प्रश्न ३. कोणती जोडी अयोग्यरित्या जुळवलेली आहे/त ?

अ. भेदभाव करण्यास मनाई – कलम १५

ब. संमेलनाचा हक्क – कलम १९

क. जीवित संरक्षणाचा अधिकार – कलम २०

ड. घटनात्मक उपायाचा अधिकार – कलम ३२

पर्यायी उत्तरे:

(१) अ फक्त

(२) ब आणि क फक्त

(३) क फक्त

(४) ड फक्त

● प्रश्न ४. अचूक जोड्या लावा.

पर्यायी उत्तरे:

(१) अ-४, ब-३, क- १, ड-२

(२) अ-३, ब-४, क-१, ड-२

(३) अ-२, ब-१, क-४, ड-३

(४) अ-४, ब-१, क-३, ड-२

हेही वाचा >>> डिझाईन रंग-अंतरंग : अभियांत्रिकी पदवीनंतर ‘क्रिएटिव्ह डिझाईन’ क्षेत्रातील आकर्षक करिअर संधी…

● प्रश्न ५. राज्यपाल पदाच्या कालावधीबाबत खालीलपैकी कोणती कथने बरोबर आहेत?

( a) राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात.

( b) राज्यपाल स्वखुशीने आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात.

( c) राज्यपालांची नियुक्ती सर्वसाधारणपणे पाच वर्षासाठी असते.

( d) दुसरी व्यक्ती पद स्विकारेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात.

पर्यायी उत्तरे :

(१) फक्त विधाने ( a), ( b) व ( c) बरोबर आहेत

(२)फक्त विधाने ( a), ( b) व ( d) बरोबर आहेत

(३)फक्त विधाने ( b), ( c) व ( d) बरोबर आहेत

(४) सर्व विधाने बरोबर आहेत

● प्रश्न ६. भारतात संसद आणि राज्य विधान मंडळांच्या निवडणुका — द्वारे आयोजित केल्या जातात.

(१) राष्ट्रपती

(२) राज्य निवडणूक आयोग

(३) राज्यपाल

(४) भारताचा निर्वाचन आयोग

वरील विश्लेषणाच्या आधारे पुढील मुद्दे लक्षात येतात.

● भारताच्या घटनात्मक विकासातील महत्त्वाचे टप्पे, घटना परिषदेबाबतच्या घडामोडी याबाबत दरवर्षी प्रश्न विचारण्यात आले आहेत.

● घटनेतील मूलभूत हक्क, मूलभूत अधिकार आणि निती निर्देशक तत्वे यांवर यापूर्वी फारसे प्रश्न विचालेले नसले तरी मागील वर्षीच्या प्रश्न पत्रिकेचे विश्लेषण केले तर हे मुद्दे यापुढे महत्वाचे ठरतील असे दिसते.

● राज्यघटनेतील केंद्र राज्य संबंध, संसद आणी विधान मंडळे यांची रचना, कार्यपद्धती, विधेयके, न्यायसंस्था, घटनात्मक पदे, घटनादुरुस्ती या मुद्द्यांवर तयारी करताना भर देणे आवश्यक ठरेल असे विश्लेषणावरून समजून येते.

● मागील चार पाच वर्षांमध्ये बहुविधानी प्रश्नांवर भर असल्याचे लक्षात येते. सरळसोट प्रश्नांमध्येही पूर्ण वाक्ये किंवा मोठे पर्याय आहेत. त्यामुळे प्रत्येक मुद्द्यांचा बारकाईने अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. एकूणच या विषयाचा लिंक लावून अभ्यास करणे आवश्यक आहे.

● सर्व उपघटकांना महत्त्व देऊन प्रश्नांची रचना करण्यात येते. त्यामुळे सर्व उपघटक कव्हर करणे आवश्यक आहे.

या घटकाची तयारी कशी करावी हे पुढील लेखामध्ये पाहू.

अ. ६१ वी घटनादुरुस्ती  १ राज्य लोक सेवा आयोगातील सदस्यांचे सेवा निवृत्तीचे वय ६० वरून ६२ वर्षे

ब. ४४ वी घटनादुरुस्ती  २ त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था

क. ४१ वी घटनादुरुस्ती  ३ मतदाराचे वय २१ वरून १८ वर्षे केले

ड. ७३ वी घटनादुरुस्ती   ४ राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या निवडणुकी विषयी वाद सर्वोच्च व उच्च न्यायालयात