राज्य सेवा मुख्य परीक्षेमधील सामान्य अध्ययन पेपर एकमधील कृषी विषयक घटकाच्या मृदा आणि जलव्यवस्थापन या मुद्यांची तयारी कशी करावी ते मागील लेखामध्ये पाहिले. या लेखामध्ये कृषी विषयाच्या सामान्य अध्ययन पेपर एकमधील परिसंस्था आणि पर्यावरणाशी संबंधित मुद्यांच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे.

Agro ecology या शब्दाचे कृषी परिसंस्था असे भाषांतर मराठी अभ्यासक्रमामध्ये असले तरी प्रत्यक्षात कृषी पारिस्थितिकी अशी कृषी विज्ञानातील शाखा अभिप्रेत आहे हे लक्षात घ्यायला हवे. पर्यावरण विषयातील मूलभूत मुद्यांच्या आधारे शेती कशा प्रकारे करता येईल हा या शाखेचा अभ्यासविषय आहे. त्यामुळे आधी पर्यावरण विषयातील मूलभूत संकल्पना समजून घेऊन मग त्यांचा कृषी घटकाच्या संदर्भातअभ्यास करणे ही strategy असणे आवश्यक आहे.

article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र :  राज्य सेवा मुख्य परीक्षा – मानवी हक्क विकासात्मक मुद्दे
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
special fund of 20 lakhs each to all departmental offices of Mumbai Municipal Corporation
सुविधांसाठी पालिकेचे पाच कोटी, पालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांना प्रत्येकी २० लाखांचा विशेष निधी
mpsc exam preparation
MPSC मंत्र : राज्य सेवा मुख्य परीक्षा- मानवी हक्क पारंपरिक अभ्यास
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : नीतिशास्त्र, सचोटी  आणि नैसर्गिक क्षमता
mpcb issues notice to hinjewadi it park over functioning of common sewage treatment plan
हिंजवडी आयटी पार्कला जलप्रदूषणासाठी नोटीस; सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ठपका
Increase in cotton soybean prices print politics news
कापूस, सोयाबीनच्या दराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; निवडणूक काळात शेतकऱ्यांमध्ये रोष

परिसंस्थेची संकल्पना समजून घेताना त्यातील जैविक आणि अजैविक घटक, त्यांचे परिसंस्थेतील कार्य (उदा. उत्पादक/ भक्षक/ विघटक) समजून घ्यावे. परिसंस्थेची रचना अभ्यासताना वेगवेगळे घटक कोणत्या स्तरावर येतात व त्यांची त्या-त्या स्तरावरील भूमिका/ उपयोग/ आवश्यकता काय आहे हे समजून घ्यावे. या आधारे ऊर्जा प्रवाह समजून घेणे सोपे होते. परीसंस्थेचे एक घटक म्हणून कार्य, निसर्गातील महत्व, तिच्या संवर्धनाची आवश्यकता, तिचे मानवासाठी महत्व हे विश्लेषणात्मक मुद्दे आहेत. त्यांचा याच क्रमाने अभ्यास केला तर बहुविधानी प्रश्न सोडविण्यासाठी उपयुक्त ठरते.

हेही वाचा >>> नोकरीची संधी : स्टेट बँक ऑफ इंडियामधील भरती

जमिनीवरील (terrestrial) परिसंस्थांमध्ये वेगवेगळ्या हवामान प्रदेशात वेगवेगळ्या परिसंस्था असतात. त्या त्या परिसंस्थेतील मृदेचा प्रकार, हवामान, वनस्पतींचे प्रकार आणि प्राण्यांचे प्रकार हे तिचे विशिष्ट गुणधर्म असतात. जंगल, गवताळ प्रदेश, टुंड्रा आणि वाळवंट या परिसंस्थांचे प्रकार पुढील मुद्यांच्या आधारे तुलनात्मक टेबलमध्ये नोट्स काढून अभ्यासल्यास फायदेशीर ठरते.

त्या त्या परिसंस्थेतील हवामानाची वैशिष्ट्ये, आढळणाऱ्या मृदांचे प्रकार, या दोन्हींनुसार वनस्पती आणि प्राण्यांमध्ये झालेले अनुकूलन इत्यादी

पाण्यातील परिसंस्थांचे गोड्या पाण्यातील व समुद्री पाण्यातील असे दोन मुख्य प्रकार आहेत. त्यांचा अभ्यास पुढील मुद्यांच्या आधारे करता येईल

पाण्याचा प्रकार (वाहते/ साठलेले) किंवा स्थान (खोल समुद्र / किनारी प्रदेश), पाण्यातील क्षार/ मीठाचे प्रमाण, वनस्पती आणि प्राण्यांमध्ये पाण्याच्या क्षारता व खोलीनुसार झालेले अनुकूलन

परिसंस्थेतील उर्जा प्रवाह अभ्यासताना अजैविक घटकांपासून जैविक उत्पादक घटकांपर्यंत व त्यानंतर अन्न जाळ्यामध्ये व विघटनानंतर पुन्हा अजैविक घटकांपर्यंत असे ऊर्जेचे वहन नीट समजून घ्यायला हवे. त्यासाठी अन्न साखळी व अन्न जाळे या संल्पना व्यवस्थित समजून घ्याव्यात. प्रत्येक टप्प्यावरील ऊर्जेचा किती भाग पुढील टप्प्यामध्ये जातो हे समजून घेणेही आवश्यक आहे.

जैवविविधता ही संकल्पना समजून घेताना त्यातील महत्वाचे घटक, त्यांचे महत्व, जैवविविधतेच्या संवर्धनाची आणि तिच्या शाश्वत व्यवस्थापनाची आवश्यकता हे मुद्दे पहायला हवेत. जैवविविधतेस असलेले धोके, त्यामागील कारणे, तिच्या नाशाचे परिणाम, जैवविविधता संवर्धन करण्यासाठीचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रयत्न, त्यामध्ये कार्यरत संस्था/संघटनांची रचना, कार्ये, यश हे मुद्दे अभ्यासणे आवश्यक आहे.

नैसर्गिक साधनसंपत्तीचे प्रकार, त्यांचा वापर, महत्व, त्यांचे संवर्धन करण्याची आवश्यकता या बाबी उदाहरणांसहित समजून घ्याव्यात. नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन करण्यासाठी मानवाची भूमिका/ जबाबदारी हा विश्लेषणात्मक मुद्दा हे. याबाबतचे मुद्दे विविध स्त्रोतांतून अभ्यासायला हवेत. तसेच या क्षेत्रातील नवनवीन उपक्रमही माहित करुन घ्यायला हवेत.

पीक उत्पादनासंबंधीत पर्यावरणीय आणि सामाजिक बाबी या परस्परसंबंधित आहेत हे लक्षात घ्यायला हवे. यामध्येच आर्थिक पैलूही लक्षात घेणे आवश्यक आहे. शेतीतील प्रक्रिया (उदा. सिंचन आणि) परिसंस्था किंवा एकूणच पर्यावरण यांचा एकमेकांवर होणारा परिणाम व्यवस्थित समजून घ्यायला हवा. अन्न सुरक्षा, उपजिविका इत्यादी सामाजिक आर्थिक घटक आणि पीक उत्पादन यांमधील परस्परसंबंध बारकाईने अभ्यासायला हवेत.

कार्बन क्रेडीट ही संकल्पना अभ्यासताना कार्बन उत्सर्जन, कार्बन उत्सर्जन करण्यासाठी अनुज्ञेय मर्यादा (कार्बन क्रेडीट), त्यांच्या मर्यादेबाहेर कार्बन उत्सर्जन करण्यासाठी कार्बन क्रेडीट्सची देवाणघेवाण हे मुद्दे बारकाईने अभ्यासावेत. याबाबतच्या IPCCC मधील ठराव आणि निर्णय तसेच चालू घडामोडींची माहिती असायला हवी. कार्बन उत्सर्जन शोषून घेण्याच्या कार्बन जप्ती (Sequestration) या संकल्पनेचा अर्थ व्यवस्थित समजून घ्यावा. कार्बन शोषून घेणारी माध्यमे व त्यामागील प्रक्रिया समजून घ्याव्यात. कार्बन जप्तीचे पर्यावरणीय आणि आर्थिक महत्व समजून घ्यायला हवे. त्यासाठीचे उपाय/मार्ग माहित करून घ्यावेत.

पर्यावरणीय नितीतत्त्वेे ही पर्यावरण संवर्धन व सुरक्षेतील मानवाची भूमिका व जबाबदारी अशा दृष्टीकोनातून अभ्यासायची आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातील पर्यावरणीय समस्यांबाबत पर्यावरणीय नितीतत्वे उदाहरणांच्या माध्यमातून समजून घ्यायला हवी. कृषी, पशुसंवर्धन आणि मत्स्यसंवर्धन यावरील हवामान बदल, जागतिक तापमान वाढ, आम्ल वर्षा, ओझोन थर कमी होणे, आण्विक अपघात, सर्वनाश (होलोकॉस्ट) परिणाम अभ्यासताना या सर्व मुद्यांमुळे निर्माण होणा-या समस्या, त्यांचे स्त्रोत, या समस्या कमी करण्यासाठीचे उपाय, करण्यात येणारे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रयत्न असे मुद्दे पहावेत.

आपल्या प्रतिक्रियांसाठी आमचा ई-पत्ता : careerloksatta@gmail. com