प्रश्न १. भारतीय राज्यघटनेत आयरीश राज्यघटनेवर आधारित कोणती तरतूद घेतलेली नाही?
१) प्रजासत्ताकाची संकल्पना
२) राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे
३) राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत
४ ) राज्यसभेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन नेमणूक
प्रश्न २. भारताच्या घटना सभेबाबत पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
१) भारतासाठी घटनासभा बनविण्याची कल्पना सर्वप्रथम १९३४ मध्ये मानवेंद्रनाथ रॉय यांनी मांडली.
२) फाळणीनंतर भारतीय घटना सभेच्या सदस्यांची संख्या ३८९ इतकी झाली..
३) घटना सभेची शेवटची बैठक २४ जानेवारी १९५० रोजी झाली.
४) डॉ. राजेंद्र प्रसाद हे घटना सभेचे अध्यक्ष तर हरेंद्र कुमार मुखर्जी हे उपाध्यक्ष होते.
प्रश्न ३. भारतीय राज्यघटनेचे भाग आणि त्यांचे विषय याबाबत पुढीलपैकी कोणती जोडी योग्य नाही?
१) भाग ७ – स्थानिक स्वराज्य संस्था
२) भाग ११ – केंद्र -राज्य संबंध
३) भाग १८ – आणीबाणी विषयक तरतुदी
४) भाग २० – घटना दुरुस्ती प्रक्रिया
हेही वाचा >>> रतन टाटा यांची बिझनेस ऑफर नाकारली आणि वर्षभरात कमावले २३०० कोटी रुपये, वाचा जयंती चौहान यांच्या यशाचं सीक्रेट
प्रश्न ४. भारतीय राज्यघटनेतील समान नागरी कायद्याच्या तरतुदीबाबत पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे ?
१) याबाबतची तरतूद घटनेच्या चौथ्या भागामध्ये करण्यात आली आहे.
२) सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा/ संहिता लागू करण्याचा राज्य प्रयत्न करेल असे कलम ४४ मध्ये नमूद करण्यात आले आहे.
३) राज्यघटनेतील या तरतुदीच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयाकडे दाद मागता येते.
४) राज्य धोरणांसाठीचे हे उदारमतवादी मार्गदर्शक तत्त्व आहे.
प्रश्न ५. भारतीय राज्यघटनेबाबतचे सर्वोच्च न्यायालयाचे खटले व निर्णय याबाबत पुढीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे?
१) शंकरी प्रसाद खटला – संसदेला मूलभूत हक्कांमध्ये सुधारणा करण्याचा अधिकार आहे.
२) गोलकनाथ खटला – संसदेला मूलभूत हक्कांवर मर्यादा आणण्याचा अधिकार नाही.
३) केशवानंद भारती खटला – संसदेला मूलभूत हक्कांमध्ये सुधारणा करण्याचा अधिकार आहे पण राज्यघटनेच्या मूलभूत चौकटीचा भंग करता येणार नाही.
४) इंद्रा साहनी खटला – अनुच्छेद २१ अंतर्गत व्यक्तिगत स्वातंत्र्याची व्याप्ती वाढविली.
प्रश्न ६. ‘‘संविधान कितीही चांगले असो ते राबविण्याची जबाबदारी ज्याच्यावर आहे ते जर अप्रामाणिक असतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही आणि संविधान कितीही वाईट असो ते राबविण्याची जबाबदारी ज्याच्यावर आहे ते जर प्रामाणिक असतील तर ते चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही’’ हे उद्गार कोणाचे आहेत?
१) डॉ. राजेंद्र प्रसाद
२) के,एम. मुन्शी
३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
४) पंडित नेहरू
योग्य उत्तरे व स्पष्टीकरणे
प्रश्न १ : (१)
भारतीय राज्यघटनेत राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत, राज्यसभेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन या तरतुदी आयरीश राज्यघटनेच्या आधारे घेण्यात आल्या आहेत.
प्रजासत्ताकाची संकल्पना, स्वातंत्र्य आणि समानतेचे आदर्श फ्रान्सच्या राज्यघटनेवरुन घेण्यात आले आहेत.
प्रश्न २ : (२)
सन १९३५ मध्ये काँग्रेसने अधिकृतपणे घटनासभेच्या स्थापनेची मागणी केली. सन १९४६ च्या कॅबिनेट मिशन प्लॅनअंतर्गत घटनासभेसाठी निवडणुका घेण्यात आल्या. ६ डिसेंबर १९४६ रोजी घटनासभा स्थापन झाली.
फाळणीपूर्वी घटना सभेच्या सदस्यांची संख्या ३८९ इतकी होती. फाळणीनंतर ती २९९ इतकी झाली.
घटनासभेची पहिली बैठक ९ डिसेंबर १९४६ रोजी तर शेवटची बैठक २४ जानेवारी १९५० रोजी झाली. २६ जानेवारी १९५० पासून निवडणुका होऊन संसद स्थापन होईपर्यंत घटना सभेने हंगामी संसद म्हणून कामकाज पाहिले.
प्रश्न ३ : (१)
राज्यघटनेत एकूण २५ भाग आहेत. यातील स्थानिक स्वराज्य संस्थांबाबतचे भाग पुढीलप्रमाणे आहेत:
भाग ९ – पंचायतराज – ग्रामपंचायत , पंचायत समिती , जिल्हा परिषद, नगर पंचायत
भाग ९ A -कलम 243 P – 243 ZG नगरपालिका
भाग ९ B -कलम ZH – कलम ZT सहकारी संस्था
प्रश्न ४ : (३)
(घटनेच्या चौथ्या भागातील राज्यासाठीच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये कलम ४४ अन्वये राज्य समान नागरी कायदा करण्याचा प्रयत्न करेल अशी तरतूद करण्यात आली आहे. ही बाब मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट नसल्याने तिच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयामध्ये याचिका दाखल करता येत नाही.)
प्रश्न ५ : (४)
सर्वोच्च न्यायालयाने मनेका गांधी खटल्यामध्ये अनुच्छेद २१ अंतर्गत व्यक्तिगत स्वातंत्र्याची व्याप्ती वाढविली. तर इंद्रा साहनी खटल्यामध्ये अनुच्छेद १६(४) अंतर्गत ओबीसी आरक्षणाच्या घटानात्मकतेवर शिक्कामोर्तब केले. यामध्ये क्रिमी लेयर ही संकल्पना मांडणायात आली.
याव्यतिरीक्त महत्त्वाचे न्यायनिर्णय पुढीलप्रमाणे:
मिनर्व्हा मिल्स खटला – मूलभूत चौकटीच्या सिद्धांतानुसार ४२व्या घटनादुरूस्तीती काही तरतूदी रद्द ठरविण्यात आल्या.
एस. आर. बोम्मई खटला – अनुच्छेद ३५६ लागू करण्याचा निर्णय न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेत येतो. बहुमताअभावी सरकार स्थापना शक्य नाही या आधारावर राज्याची विधानसभा विसर्जित करण्यापूर्वी फ्लोअर टेस्ट घेणे आवश्यक आहे.
प्रश्न ६ : (३)