रोहिणी शहा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील वर्षीपासून राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सर्व राजपत्रित संवर्गांच्या परीक्षांचा पहिला टप्पा म्हणून सुरू झाली. या व त्यामागील राज्य सेवा पूर्व परीक्षा पेपर एकमध्ये अर्थव्यवस्था या घटकावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे विश्लेषण व त्या आधारे तयारी करताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे या लेखामध्ये पाहू.

प्रश्न १. निती आयोगाच्या चिरंतन विकास उद्दिष्टे निर्देशांक अहवालाप्रमाणे (२०२०-२१) भारताची उद्दिष्टनिहाय कामगिरी दर्शविते की,

( a) भारताचा निर्देशांक २०२०-२१ मध्ये ६६ पर्यंत सुधारला आहे. तो २०१९-२० मध्ये ६० तर २०१८-१९ मध्ये ५७ होता.

( b) २०२०-२१ मध्ये कोरोना संकट असतानाही भारताची कामगिरी १५ पैकी ८ उद्दिष्टांबाबत उत्तम राहिली आहे.

वरीलपैकी कोणता/ कोणते पर्याय योग्य आहे/त?

१) फक्त ( a)

२) फक्त ( b)

३) दोन्ही पर्याय

४) एकही पर्याय नाही

प्रश्न २. Rio २० संयुक्त राष्ट्रे विकास परिषदेविषयी खालीलपैकी कोणते /कोणती विधान/ विधाने योग्य आहे?

१) जून २०१४ मध्ये ही परिषद ब्राझिलमध्ये पार पडली.

२) या परिषदेमध्ये जगासमोर सहस्त्रक विकास उद्दिष्टे मांडण्यात आली.

३) हरीत अर्थव्यवस्था धोरणाविषयीची मार्गदर्शक तत्वे या परिषदेत स्वीकारण्यात आली.

४) या परिषदेमध्ये संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचे सर्व अधिकार काढून घेण्यात आले.

प्रश्न ३. निव्वळ राष्ट्रीय उत्पादना संबंधात कोणते/ती विधान/ने अयोग्य आहे/त?

अ. हे विशिष्ट आर्थिक वर्षात केलेले वस्तू व सेवांचे उत्पादन मूल्य व व परदेशातून येणाऱ्या निव्वळ उत्पादन घटकांचे उत्पन्न ( factor income) दर्शविते.

ब. ह्याच्यात निर्यात आयात यांचा समावेश असतो परंतु परदेशातून येणाऱ्या निव्वळ उत्पादन घटकांचे उत्पन्न समाविष्ट नसते.

क. ह्याला निव्वळ उत्पन्न म्हणतात कारण यामध्ये सकल राष्ट्रीय उत्पन्नांअधून भांडवली घसाऱ्याची वजावट केली जाते.

हेही वाचा >>> चौकट मोडताना : हळूहळू बहरले गाणे

पर्यायी उत्तरे

१) क २) अ

३) ब ४) अ आणि क

प्रश्न ४. दारिर्द्यात घट आणि उपजीविका प्रोत्साहन यासाठी भारत सरकारबरोबर संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमांना पाठबळ दिले आहे?

अ. सर्वांसाठी माफक दरात ग्रामीण गृहनिर्माण

ब. बहुराज्यीय आरोग्यसेवा व्यवस्था क्षमता सुधारणा (२०१३-२०१७)

क. प्रशासन व गुणित उपजिविका पाठबल ( GOALS) (२०१३-२०१७)

ड. आदिवासी विभाग राष्ट्रीय क्षमता बळकटीकरण

पर्यायी उत्तरे

१) फक्त अ

२) अ, ब आणि क

३) ब, क आणि ड

४) वरीलपैकी सर्व

प्रश्न ५. जोड्या लावा.

गट अ (आर्थिक सुधारणा) गट ब (उद्दिष्ट्ये)

( a) विमुद्रीकरण ( i) काळ्या पैशाचे नियंत्रण

( b) नवा बेनामी कायदा ( ii) खोटे चलन निष्कासित करणे

( c) दिवाळखोरी कायदा ( iii) अनुदानांचे तर्काधिष्टीकरण

( d) आधार कायदा ( iv) व्यवसाय सरलतेस प्रवर्तित करणे

हेही वाचा >>> नोकरीची संधी

पर्यायी उत्तरे:

१) ( a) – ( iv); ( b) – ( iii); ( c) – (ii); ( d) – ( i)

२) ( a) – ( ii); ( b) – ( i); ( c) – (iv); ( d) – (iii)

३) ( a) – ( ii); ( b) – ( i); ( c) – (iii); ( d) – ( iv)

४) ( a) – ( i); ( b) – ( ii); ( c) – (iii); ( d) – ( iv)

प्रश्न ६. अदृष्य मुली व महिला ही संकल्पनात्मक स्थिती पुढीलपैकी कोणत्या बाबींमुळे होते?

अ. मुलगाच हवा असण्याची प्राधान्यता/ हव्यास

ब. अपुरी सांख्यिकी माहिती

क. महिलांचा होणारा बाजार

ड. उच्च माता मृत्यू दर

पर्यायी उत्तरे

१) अ अणि क

२) अ, ब, क आणि ड

३) अ, क आणि ड

४) अ, ब आणि ड

वरील प्रातिनिधिक प्रश्नांच्या आधारे प्रश्नांचे स्वरूप समजून घेऊन तयारी करण्यासाठी पुढील मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे:

● या घटकामध्ये बहुविधानी प्रश्नांची संख्या जास्त आहे. त्यामुळे विचारण्यात आलेल्या मुद्द्याबाबत नेमकी अद्यायावत माहिती आणि पारंपरिक मुद्दे माहीत असणे आवश्यक आहे.

● किमान एक प्रश्न हा अर्थव्यवस्था घटकातील मूलभूत संकल्पनांवर विचारलेला आहे. त्यामुळे मूलभूत संकल्पना समजून घेऊन अभ्यास करणे आवश्यक आहे.

● योजना/ धोरणे यांबाबत तरतुदी, कालावधी, उद्देश अशा सर्व बाबी विचारण्यात आल्या आहेत. त्यामुळे योजनांबाबतच्या प्रश्नांमध्ये पर्यायांबाबत नेमकी माहिती असणे आवश्यक असलेले दिसते.

● आर्थिक नियोजन / पंचवार्षिक योजना या घटकाचा अभ्यासक्रमामध्ये उल्लेख नसला तरी दरवर्षी किमान एक प्रश्न त्यावर विचारलेला आहे.

● दारिद्र्य, लोकसंख्या, महागाई या मुद्द्यांमधील संकल्पनात्मक बाबींवर जास्त भर आहे पण याबाबतच्या चालू घडामोडी आणि अद्यायावत आकडेवारी यांचीही माहिती असणे आवश्यक आहे.

● सध्या शाश्वत विकास लक्ष्ये गाठायची असली तरी सहस्त्रक विकास लक्ष्यांवरही प्रश्न विचारलेले दिसतात. त्यामुळे शाश्वत विकास लक्ष्ये आणि सहस्त्रक विकास लक्ष्ये यांची तुलनात्मक नोट्स काढून तयारी करणे जास्त फायदेशीर ठरते.

आपल्या प्रतिक्रियांसाठी आमचा ई-पत्ता : careerloksatta@gmail.com