रोहिणी शाह

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेच्या इतिहास घटकाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात आली. या लेखापासून भूगोल घटकाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे. मागील वर्षांच्या प्रश्न पत्रिकांमधील भूगोल घटकाच्या प्रश्नांचे विश्लेषण या लेखामध्ये पाहू. मागील तीन वर्षांतील प्रातिनिधिक प्रश्न पाहणे यासाठी उपयुक्त ठरेल.

प्रश्न १. उद्योगाच्या स्थान निश्चिती करताना आल्फ्रेड वेबर यांनी खालीलपैकी कोणत्या घटकाचे महत्त्व आपल्या सिद्धांतात सिद्ध करण्याचा प्रयत्न केल आहे?.

१) उद्योगाच्या स्थान निश्चिती करणात मजूरांवरील मूल्याचे योगदान महत्त्वाचे असते.

२) उद्योगाच्या स्थान निश्चिती करणात कच्च्या मालावरील खर्चाचे योगदान महत्त्वाचे असते.

३) उद्योगाच्या स्थान निश्चिती करणात बाजारपेठेची सुगमता महत्त्वाची असते.

४) उद्योगाच्या स्थान निश्चिती करणात वाहतूक खर्चाचे योगदान महत्त्वाचे असते.

हेही वाचा >>> यूपीएससी सूत्र : वनसंवर्धन दुरुस्ती विधेयक २०२३ वरून सुरु झालेला वाद अन् जम्मू काश्मीरमधील जगातील सर्वात उंच रेल्वे पूल, वाचा सविस्तर…

प्रश्न २. खालीलपैकी कोणते विधान /ने बरोबर आहे/त?

महाराष्ट्रात उत्तरेकडून क्रमाने पठारावरील प्रमुख डोंगररांगा व त्यांच्या दक्षिणेकडील नद्यांची खोरी खालीलप्रमाणे आहेत:

अ: सातपुडा पर्तवरांगेच्या दक्षिणेकडे तापी-पूर्णा खोरे.

ब: सातमाळा अजिंठा डोंगराच्या दक्षिणेकडे गोदावरी नदीचे खोरे

क: हरिश्चंद्र बालाघाट डोंगर व दक्षिणेस भीमा नदीचे खोरे

ड: शंभू महादेव डोंगर व दक्षिणेस कृष्णा नदीचे खोरे

पर्यायी उत्तरे:

१) फक्त अ २) वरील सर्व बरोबर ३) फक्त अ व ब ४) फक्त अ व क

प्रश्न ३. गोदावरी व कृष्णा नद्यांच्या तुलनेत कावेरी नदीच्या पात्रात हिवाळ्यात पाण्याचे प्रमाण वाढते कारण

१) नैऋत्य मान्सून वाऱ्यांमुळे कावेरी नदीच्या पात्रात पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणात होते.

२) ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळे कावेरी नदीच्या पात्रात पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणात होते.

३) कावेरी नदीच्या पात्रात ईशान्य व नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून पर्जन्यवृष्टी होते.

४) कावेरी नदीच्या उपनद्या कावेरी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमानात पाण्याचा पुरवठा करतात .

हेही वाचा >>> UPSC-MPSC : राज्य माहिती आयोगाची स्थापना कोणत्या कायद्याद्वारे करण्यात आली? त्याची रचना, अधिकार आणि कार्ये कोणती?

प्रश्न ४. जोड्या जुळवा.

( a) सेफीड सिद्धांत ( i) लॅप्लेस

( b) विद्युत चुंबकीय सिद्धांत ( ii) डॉ. बॅनर्जी

( c) तेजोमेघ सिद्धांत ( iii) आल्फव्हेन

( d) जोडतारा सिद्धांत ( iv) लीटलटन

पर्यायी उत्तरे:

१) ( a)- ( ii) ( b)- ( iii) ( c)- (i) ( d)- ( iv)

२) ( a)- ( iii) ( b)- (iv) ( c)- ( ii) ( d)- ( i)

३) ( a)- ( iv) ( b)- ( ii) ( c)- (iii) ( d)- ( i)

४) ( a)- ( i) ( b)- (iv) ( c)- ( ii) ( d)- ( iii)

प्रश्न ५. खालीलपैकी कोणती विधाने भाबर मैदानाबाबत बरोबर आहेत?

अ. सच्छिद्रता मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे छोट्या नद्या अदृष्य होतात.

ब. भाबर पट्टा पिकांसाठी उपयुक्त आहे.

क. भाबर पट्ट्यात वास्तव्य करणारे लोक पशुपालन करणारे गुजर आहेत.

पर्यायी उत्तरे:

१) विधान अ आणि ब

२) विधान ब आणि क

३) विधान अ अणि क

४) विधान अ, ब आणि क

प्रश्न ६. जनगणना २०११ प्रमाणे खालील जिल्ह्यांचा लोकसंख्येच्या घनतेप्रमाणे उतरता क्रम लावा.

अ. कोल्हापूर ब. जळगाव क. पुणे ड. नागपूर इ. सोलापूर

पर्यायी उत्तरे:

१) ब, इ, ड, अ, क

२) अ, क, ड, ब, इ

३) क, ड, अ, इ, ब

४) क, अ, ड, ब, इ

या प्रातिनिधिक प्रश्नांवरून तयारी करताना विचारात घ्यायचे पुढील मुद्दे लक्षात येतात.

सरळसोट एका शब्दा / वाक्याचा पर्याय असलेल्या प्रश्नांचे प्रमाण खूप कमी आहे. मात्र सन २०२२ मध्ये अशा प्रकारचे प्रश्न जास्त होते.

बहुविधानी प्रश्नांमध्येही योग्य अयोग्य पर्याय शोधणे अशा ठरावीक स्वरूपाबरोबरच कथन – कारण शोधणे, निष्कर्ष शोधणे असेही प्रश्न विचारलेले दिसून येतात. यामध्ये जोड्या लावणे प्रकारच्या प्रश्नांवर आयोग बहुतांश वेळ भर देताना आढळतो.

भूगोलाच्या शाखा, सिद्धांत व ते मांडणारे शास्त्रज्ञ, महत्त्वाची प्रसिद्ध पुस्तके व त्यांचे लेखक या बाबींवर किमान एक प्रश्न विचारण्यात आला आहे. लोकसंख्या भूगोलावरही किमान एक प्रश्न विचारलेला दिसतो. उर्वरीत अभ्यासक्रमावरील घटकांवरील प्रश्नांची संख्या दरवर्षी बदलताना दिसत असली तरी मागील प्रश्न पत्रिकांच्या विश्लेषणावरून एखाद्या वर्षी कोणता घटक जास्त किंवा कमी महत्त्वाचा असेल याचा अंदाज घेणे कठीण नाही.

तरीही भूरुपे, जागतिक हवामान, महाराष्ट्रातील व देशातील महत्त्वाची शहरे, भारताचा व महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल हे भाग नेहमीच आयएमपी यादीत असले पाहिजेत. बहुविधानी प्रश्न सोडविण्यास नकाशा समोर ठेवून केलेल्या अभ्यासातून मदत होते. तसेच वारंवार आकृत्या / चित्र पाहत उजळणी केल्यास भूरुपे या घटकावरील कोणत्याही प्रकारचे प्रश्न आत्मविश्वासाने सोडविता येतात. बहुविधानी प्रश्नांचे स्वरूप पाहता मूलभूत संकल्पना व्यवस्थित समजल्या असतील तर ते आत्मविश्वासाने सोडविता येतात हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे भूगोलाचा अभ्यास हा आधी मूलभूत संकल्पना समजून घेणे व त्यानंतर नकाशावर आधारीत अभ्यास व शेवटी तथ्यात्मक अभ्यास अशा क्रमाने करणे फायदेशीर ठरते.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about mpsc exam preparation tips in marathi mpsc exam preparation guidance zws
Show comments