प्रा. रवींद्र कुलकर्णी

सारे जण एकत्र जमल्यावर वेदिकाने अधीरतेने प्रा. रमेश सरांना प्रश्न विचारला, ‘‘सर, आज तुम्ही आम्हाला नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि परीक्षा या बद्दल सांगणार आहात ना?’’ महेश सर म्हणाले, ‘‘होय सर, आम्हालाही  ठएढ चा परीक्षेकडे पाहाण्याचा दृष्टिकोन नेमका कसा असेल, शिक्षणाच्या विविध स्तरांवर निकाल कसे घोषित होतील आणि त्यांचं मूल्यांकन कसं होईल हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे.’’

रमेश सरांनी शांतपणे उत्तर द्यायला प्रारंभ केला, ‘‘भारतात आतापर्यंत उच्च शिक्षण हे बहुतांशी परीक्षाभिमुख राहिले आहे. विद्यार्थ्यांना, त्यांनी कोणत्या प्रकारचं ज्ञान मिळवलं आहे, त्यांच्यामध्ये ते ज्ञान कितपत रुजलं आहे हे समजून घेण्यासाठी परीक्षा महत्त्वाची भूमिका बजावतात. ते विद्यार्थ्यांच्या करिअर निवडीचे निर्णायक घटक आहेत, याचबरोबर त्यांच्याकडे योग्य प्रकारची उच्च पात्रता मिळवण्याची क्षमता आहे किंवा नाही हे समजून घेण्यासाठी तयार केलेली ती एक पारंपरिक पद्धत/ प्रयुक्ती आहे. विद्यापीठीय संरचनेमध्ये सध्या प्रचलित असलेली ही पारंपरिक पद्धत/ प्रयुक्ती अधिकतर स्मृती केंद्रित आहे. तिचा भर स्मरणावर जास्त आहे. अभ्यासलेलं आठवा आणि परीक्षेत लिहा. आठवलं तर स्मरण, नाही तर मरण, अशी अवस्था पारंपरिक परीक्षा पद्धतीत आहे. सध्याची सत्रांत (टर्म-एंड) परीक्षा सामान्यत: प्रश्नपत्रिकेवर आधारित असते. या परीक्षेमध्ये कौशल्य म्हणून केवळ स्मरणशक्तीची चाचणी घेतली जाते. मला असं वाटतं की ही प्रणाली, बहुतेक वेळा, विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या शोधापासून, शोधाचा उत्साह आणि शिकण्याच्या आनंदापासून दूर ठेवते. आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांना, प्रत्यक्ष जीवनात, व्यवसायांत व्यवसायांच्या मागण्यांसाठी केवळ माहिती असणे आवश्यक नाही तर प्रत्येक परिस्थितीला सामोरं जाण्याची, विविध प्रश्नांची उकल करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे.  ठएढ मात्र हा विचार करते. बहुविध प्रवेश आणि निर्गमन प्रणालीसह चार वर्षांच्या बहुविद्याशाखीय पदवी कार्यक्रमाच्या सुरळीत यशासाठी विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या (formative) तसेच सममित (summative) परीक्षा पद्धतींच्या नाविन्यपूर्ण पद्धतींच्या अंमलबजावणीद्वारे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन आणि मूल्यांकनाची  ठएढ अपेक्षा करते. अशा प्रकारे, उच्च शिक्षणाच्या या तिसऱ्या परिमाणाला मुख्य प्रवाहातील शिक्षणात योग्य मान्यता मिळणे आवश्यक आहे. मूल्यांकनाच्या पद्धतीही बहुपर्यायी असाव्या लागतात, त्या  ठएढ मध्ये आहेत.’’

आज नव्याने सामील झालेला वेदांत म्हणाला, ‘‘अरे वा, हे फारच छान. अनेक परदेशी विद्यापीठांमध्ये असं केलं जातं. मी वाचलंय त्याबद्दल.’’ प्रा. रमेश सर हसून म्हणाले, ‘‘अगदी खरं आहे तुझं. आता पुढील पिढीतील ज्ञानप्राप्तीसाठी व ज्ञानदानासाठी धडपडणाऱ्या व्यक्तींना तयार करण्यासाठी परीक्षा, मूल्यमापन आणि मूल्यमापन या बाबींचे पुनरावलोकन आणि पुनर्रचना करणे आवश्यक आहे. नव्या युगातील व्यवसाय, उद्योगधंदे, नोकऱ्यांमधील आव्हानांना तोंड देण्यासाठी एकविसाव्या शतकातील विद्यार्थ्यांना आवश्यक असलेली पुरेशी कौशल्ये देण्यात आली आहेत का आणि विद्यार्थी त्यासाठी कितपत सुसज्ज आहेत याची खात्री  ठएढ अंतर्गत घेतल्या जाणा-या परीक्षा पद्धतीत असेल. आता वेगाने वाढत चाललेल्या भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक कौशल्ये तयार करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून मूल्यमापन साधनांच्या संपूर्ण नवीन स्वरूपाचा वापर करणे आवश्यक आहे.’’

प्रा. रमेश सरांनी आपल्या म्हणण्याला पुष्टी देण्यासाठी पुढे सांगितलं, ‘‘विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ‘उच्च शैक्षणिक संस्थांमधील मूल्यमापन सुधारणा’ या अहवालात अर्थपूर्ण शिक्षण पूर्ण करण्यासाठी परीक्षा आणि मूल्यमापन हे ‘शिकण्याचे परिणाम’ आणि ‘संस्थात्मक उद्दिष्टे’ यांच्याशी जोडले जावेत, या वस्तुस्थितीवर जोर देण्यात आला आहे. या अहवालाचं सारांश रूपाने असं सार आहे: मूल्यांकन प्रक्रियेने शैक्षणिक कार्यक्रमादरम्यान शिकण्याचे परिणाम, मिळवलेले ज्ञान, विकसित वृत्ती आणि विद्यार्थ्यांने प्रावीण्य मिळवलेले कौशल्य तपासले गेले पाहिजे. एखाद्या अभ्यासक्रमाच्या अध्ययनानंतर त्यातून विद्यार्थ्यांना त्यातून विविध प्रकारच्या क्षमता किंवा कौशल्ये प्राप्त होतात की नाहीत हे पाहिलं जाईल. हे समजून घेण्यासाठी कौशल्य निर्देशांक (performance indicator) तयार केले जातील. कोणताही अभ्यासक्रम हा त्याच्या उद्दिष्टांशी आणि परिणामांशी जोडला गेलेला असला पाहिजे. तसेच, तो पुढे अभ्यासक्रम विविध स्तरांवर निश्चित केल्या गेलेल्या मूल्यांकन धोरणांशी जोडलेली असणे आवश्यक आहे. विविध प्रकारच्या परीक्षा आणि मूल्यमापन पद्धती पुढीलप्रमाणे आहेत,

 i. सारांशात्मक परीक्षा पद्धती (Summative): निर्देशात्मक युनिटच्या शेवटी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन: साप्ताहिक वर्ग आणि गृह पाठ, केस स्टडी, साप्ताहिक/अंतरिम प्रश्नमंजुषा चाचण्या इत्यादींचा समावेश यात करता येईल.

 ii. विकसनशील परीक्षा पद्धती (Formative): शिकण्याच्या प्रक्रियेदरम्यान प्रशासित अनौपचारिक आणि औपचारिक चाचण्या: वर्ग चाचण्या, ओपन बुक परीक्षा, त्रमासिक/ मध्यावधी परीक्षा, सत्रांत परीक्षा इ.’’

प्रा. रमेश सरांनी आपल्या म्हणण्याला पुढे जोड दिली, ‘‘अशा प्रकारची मूल्यांकने ही शिक्षणाच्या प्रत्यक्ष मापनाशी संबंधित असतात. ही प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या अध्ययनकार्याच्या प्रत्यक्ष नमुन्यावर आधारित असतात. त्यात अहवाल, परीक्षा, प्रात्यक्षिके, कामगिरी आणि पूर्ण झालेली कामे यांचा समावेश होतो. या प्रकारे, विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या थेट मापनासाठी काम तयार करणे अपेक्षित आहे, जेणेकरून शिक्षक विद्यार्थ्यांनी त्यांच्याबद्दलच्या अपेक्षा किती चांगल्या प्रकारे पूर्ण करतात याचे मूल्यांकन करू शकेल.’’

रमेश सर सांगत होते, ‘‘विद्यार्थ्यांचा सातत्यपूर्णतेला जोखण्यासाठी, सारांशात्मक आणि विकसनशील अशा दोन्ही पद्धतीच्या मूल्यांकनांतील सातत्य जपणे आवश्यक आहे. पुढच्या शुक्रवारी आपण मूल्यमापनाच्या विविध पद्धती समजून घेऊ या.’’

अनुवाद : डॉ. नीतिन आरेकर