डॉ.श्रीराम गीत

खेळणे का अभ्यास? खेळातच करिअर? का अभ्यासातून रीतसर नोकरीतून करिअर? खेळणे चालू ठेवायचे? कधी थांबवायचे? थांबवायचे असेल तर ते दहावीमध्ये? का नववी पासून? सायन्स घ्यायचे तर खेळणे कसे जमवायचे? फक्त क्रिकेट आवडते, फक्त फुटबॉल आवडतो, फक्त टेनिस आवडते, त्यात स्कोप किती? या सगळय़ाच चर्चेमध्ये मैदानी खेळाला तर अजिबातच स्थान नाही. वेगाने धावणे, दमदार पळणे, उंच उडी, लांब उडी, भाला फेक, गोळा फेक, याचे तर कोणी नावही घेत नाही. कुस्ती गावाकडची नाही तर हरियाणा मधली. अशा या साऱ्या गलबल्यामध्ये अजून तीन-चार खेळांचे नाव सुद्धा येत नाही. पोहोणे व डायिव्हग, सायकिलग, आर्चरी यात काय करायचे असते? शूटिंगचे आकर्षण असते पण परवडणे अजिबातच शक्य नसते. असा हा सारा माहोल असताना माझ्याकडे एक अपवाद असलेली कन्या नुकतीच भेटायला आली होती.

Marathi Actor Hemant Dhome has a new cow in his family
अभिनेता हेमंत ढोमेच्या कुटुंबात आली नवीन सदस्य, नाव आहे खूपच खास
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Sanjay Bangar Son Aryan Becomes Anaya Shares Hormonal Transformation Journey Video on Instagram
Sanjay Bangar Son: भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या मुलाची हार्माेन रिप्लेसमेंट थेरपी, आर्यनने नावही बदललं, VIDEO केला शेअर
Germanys Warren Buffett Karl Hellerding
जर्मनीचा वॉरेन बफे : कार्ल हेलरडिंग
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द

फोनवरून बोलताना तिच्या वडिलांनी एक उल्लेख केला होता. ती आर्चरीमधली ‘नॅशनल प्लेयर’ आहे. आत्ता पदवीधर झाली पुढे काय हे कळत नाही. पण या पलीकडे फारसा विस्ताराने संवाद झाला नव्हता. आई, वडील व मुलगी समोर आल्यानंतर मला कळलेली माहिती थक्क करणारी होती. तिने २२ सुवर्णपदके तर अन्य पदके मिळवून ६६ पदके मिळवलेली होती. मानसशास्त्र विषयात उत्तम पदवी घेऊन या पुढचे रस्ते तिला हवे होते. आपल्या सदराच्या नावाप्रमाणे स्पर्धेमध्ये कसे धावायचे किती धावायचे व पदके कशी मिळवायची याचे साक्षात उदाहरण माझ्यासमोर होते. सुरुवातीला उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या संदर्भातही त्यांनी नीट विचार केला होता. यश मिळवले होते. मात्र, तिला आता आर्चरीमध्ये स्पर्धात्मक भाग घेण्याची इच्छा राहिली नव्हती. मात्र, वयाच्या बावीशीमध्ये आता तिला आयुष्याच्या स्पर्धेला तोंड द्यायचे होते.

सुरुवातीला उल्लेख केलेले सारेच प्रश्न नव्याने तिच्यासमोर उभे होते. तिचे प्रश्न वेगळे.. आईचे प्रश्न वेगळे.. वडिलांचे प्रश्न वेगळे.. व नातेवाईकांच्या समोरचे आजवरचे रेखीव रंगीत चित्र वेगळे.. असा सारा एकत्रित माहोल मला तिघांच्या डोळय़ात दिसत होता. पदकांची लय लूट केल्यानंतर पुढे काय करायचे? त्या पदकांना किती मिरवत किती दिवस राहायचे? असे तिचे साधे मत होते. यशाच्या शिखरावरून खाली उतरताना काय मनोभूमिका असेल ती तिच्या चेहऱ्यावर मला दिसत होती. नेमके त्याच दिवशी जोकोव्हिचचा पराभव झाल्याची बातमी आली होती.

आईच्या मनात मुलीचे लग्न संसार व नवीन घरी जाताना मिळणारे घर या पलीकडे विचार नव्हता. अर्थातच आजवरची तिची सारी वाटचाल थोडीफार चालू राहावी खेळ खेळत राहावा त्याच्याशी संबंधित कामे असावी ही सदिच्छा आईच्याही मनात होती. वडिलांनी मात्र अजूनही शिखरावरच्या मुलीला अजून उंच शिखर कसे सापडेल याबद्दलचा विचार मनातून काढला नव्हता. मग ते शिखर नोकरीतले असेल, पगाराचे असेल किंवा खेळाशी संबंधित असेल याचे गुंजन त्यांच्या मनात चालू होते. एक वेगळा उल्लेख पण तो करणे गरजेचे. आर्थिक सुबत्ता घरात होती. मात्र, त्याचा आधार घेऊन वाटचाल करायला मुलगी तयार नव्हती. तिला तिचा तिचा रस्ता धुंडाळायचा होता व त्यासाठी नवीन पायवाट शोधायचीही तिची तयारी होती. या लेखाचा शेवट करताना कदाचित वाचकांना उत्सुकता अशी वाटेल की काय चर्चा झाली? निष्कर्ष काय निघाला? विविध चार ते पाच मार्ग सुचवले गेले. मात्र योग्य विचारांती योग्य तो निर्णय तोही शांतपणे सहा महिन्यांनी तिचा तिने घ्यावा व त्याला आई-वडिलांनी पािठबा द्यावा असे सांगून आमची भेट संपली. कठीण वाटचालीची जाणीव तिघांनाही झाली होती.

स्पर्धा जिंकणे, स्पर्धेत यश मिळवणे, स्पर्धेचे शिखर गाठणे व नंतरच्या उतारावरची वाटचाल ही किती खडतर असते नाही? त्या संदर्भात विविध स्पर्धात भाग घेऊ इच्छिणाऱ्या नवोदितांसाठी आजचे चार शब्द..