यूपीएससी पूर्व परीक्षेतील CSAT (Civil Services Aptitude Test) हा पात्रतेचा (Qualifying) पेपर आहे. त्यामुळे बहुतेक विद्यार्थी त्याकडे दुर्लक्ष करतात वा तेवढसं गांभीर्याने घेत नाहीत. सन २०२३ मधील्F CSAT पेपरने आपल्याला एक धडा शिकविला तो म्हणजे युपीएससी करताना कोणताही ‘विषय’वा‘पेपर’ गृहीत धरायचा नाही. तसं यूपीएससीनेसन २०२० नंतर उरअळ मध्ये केलेले बदल त्याबाबतचे संकेतआपल्याला देत होतेच.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सन २०२५ साठी उरअळची तयारी करताना तुम्ही उरअळचा अभ्यासक्रम व त्यासाठी कोणते संदर्भसाहित्य वापरायचे याबाबत 9 जानेवारी २०२५  रोजीच्या लेखात सविस्तर माहिती घेतली आहे. या लेखात प्रश्नांचे घटकनिहाय वर्गीकरण आपण बघणार आहोत, जेणेकरून अभ्यासकरताना कोणत्या घटकाला किती महत्त्व द्यायचे हे तुम्हाला लक्षात येईल. तसेच अभ्यासाचे नियोजन अधिक काटेकोरपणे करता येईल.

CSAT पेपरमधील गणित (Maths & Basic Numeracy) या घटकावर आयोगाद्वारे मोठय़ा प्रमाणावर प्रश्न विचारले जात आहेत. गणित हा विषय संकल्पना समजून घेऊन त्यावर सातत्याने सराव केल्यानेच आत्मसात होऊ शकतो हे लक्षात घ्या. त्यासाठी तक्ता क्र. २ प्रमाणे घटकांना अभ्यासात महत्त्व द्या-

या पेपरमधील तर्क (Logical Reasoning) या घटकाचा विचार केल्यास त्यातील घटकनिहाय वर्गीकरण तक्ता क्र. ३ प्रमाणे आहे-

घटकनिहाय वर्गीकरणावरून तुम्हाला एक बाब कळली असेल ती म्हणजे उरअळ मध्ये सर्वाधिक प्रश्न हे ‘गणित’ या विषयाशी संबंधित असून त्यानंतर ‘उतारे’ व शेवटी ‘तर्क’ हा घटक आयोगाने विचारात घेतला आहे. त्यामुळे ‘गणित’ हा विषय विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे अभ्यासायला हवा. त्यातही‘ Number System’ या घटकावर गणितातील एकूण प्रश्नांपैकी ५० टक्के पेक्षा अधिक प्रश्न विचारले आहेत. याबाबतचा एक प्रश्न बघूयात –

 Q. How many Consecutive zeros are there at the end of the integer obtained in the product?

(1)2  (2)4 (3)6 ´ (4)8  … (25)50 ?

(a) 50        (b) 55

(c) 100       (d) 200

CSAT साठीची स्ट्रॅटेजी :

अभ्यासाचे नियोजन : वरील विश्लेषणाच्या आधारे अभ्यासाचे नियोजन करणे अपेक्षित आहेत. संकल्पना समजून त्यावर आधारित प्रश्नांचा सराव नियमितपणे व्हायला हवा. त्यातून स्वत:च्या ‘ Strengthl व ‘ Weakness’ समजून घ्या. ‘Weakness’ वर अधिक मेहनत करा.

उतारा आकलन क्षमता : उताऱ्यावरील प्रश्न विचारताना प्रश्न हे सरळ-सरळ न विचारता Assumption, Interference व Conclusion अशा आशयाने विचारले जात आहे. बहुतेक विद्यार्थ्यांना शब्दसंग्रह कमी असल्याने वा सरावाचा अभाव असल्याने असे प्रश्न अचूकपणे सोडविणे अवघड जाते.एखादा उतारा वाचून त्याचे आकलन होणे मतितार्थ समजून घेणे ही क्षमता वाढविण्यासाठी Indian Express, The Hindu अशा वृत्तपत्रातील संपादकीय वाचण्याची सवय लावा. शब्दसंग्रह (Vocabulary) वाढविण्यासाठी WordPowerMadeEasybyNormanLewis हे पुस्तक वापरू शकता.

वेळेचे नियोजन : उरअळचे पेपर (TestSeries) सोडविताना वेळेचे नियोजन महत्त्वाचे आहे. २ तासांत ८० प्रश्न वाचून होणे, त्यासाठी पुरेसा वेळ असणे याकरिता सराव महत्त्वाचा असतो. तुमच्यासाठी सोपे असलेले घटक आधी सोडवा. त्यातून उरलेला वेळ इतर प्रश्नांकरिता नंतर वापरा. सन २०२० नंतर हा पेपर वेळखाऊ झालेला आहे.

प्रश्नांचे वर्गीकरण : प्रश्नांच्या काठीण्यपातळीप्रमाणे प्रश्नांचे वर्गीकरण व्हायला हवे. Data Interpretation सन २०१८ नंतर विचारलेले नाही किंवा निर्णयक्षमतेचे प्रश्न विचारण्याकडे आयोगाचा तेवढासा कल नाही हे समजून घ्या. उरअळमध्ये प्रश्न विचारताना आयोगाचा कल हा किचकट व वेळखाऊ प्रश्न विचारण्याकडे आहे.

 उरअळ हा पात्रतेचा पेपर वा २०० पैकी केवळ ६६ गुण सहजच मिळतील या भ्रमात राहून आपण आपले एक वर्ष वाया घालवू शकतो हे लक्षात ठेवा. आयोगाने जे बदल सन २०२० नंतर केलेले आहेत ते विद्यार्थ्यांनी समजून त्यानुसार अभ्यास करणे अपेक्षित आहे.

 sushilbari10@gmail.com

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi zws 70