डॉ सुशील बारी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यूपीएससी २०२५ करिता अर्ज कसा करावा यासंबंधीची माहिती आपण या लेखातून घेणार आहोत. अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम http://upsconline.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ‘वन टाईम रजिस्ट्रेशन’ (OTR) करणे अपेक्षित आहे.ज्या विद्यार्थ्यांनी हे आधीच केले असेल त्यांनी पुन्हा हे रजिस्ट्रेशन करायची गरज नाही. ‘वन टाईम रजिस्ट्रेशन’ : यात दहावीच्या प्रमाणपत्रानुसार (स्वत:चे, आई व वडिलांचे नाव व जन्मतारीख असावी.) नावासमोर Mr. वा Mrs. तुम्ही तेव्हाच लिहू शकता जेव्हा तुमचे नाव ३ अक्षरी असेल. उदा.राम. जन्मतारखेच्या बाबतीत नंतर बदल होणार नाही. ‘मोबाईल नंबर’ व ‘ईमेल आयडी’ असाच टाका जो दीर्घकाळासाठी तुम्ही वापरणार आहात.‘ओटीपी करिता’ हे महत्त्वाचे आहे. अल्पसंख्यांक (मुस्लिम, ख्रिाश्चन, शीख, बौद्ध, झोरास्ट्रीयन, जैन) असल्यास तशी नोंद करा. दहावीच्या बोर्ड परीक्षेतील परीक्षा क्रमांक नीट भरा. सुरक्षेसाठीचे प्रश्न व उत्तर लिहून ठेवा. लॉगइन करण्यासाठी याची गरज पडू शकते.

माहिती भरताना काळजीपूर्वक व योग्य तीच माहिती भरा. यात एकदाच बदल करता येतो. यासाठी १२ ते १८ फेब्रुवारी २०२५ हा कालावधी दिलेला आहे.

‘वन टाईम रजिस्ट्रेशन’ झाल्यानंतर पुन्हा लॉगइनच्या पेजवर या. मोबाईल नंबर वा ईमेलद्वारे ‘ओटीपी’च्या आधारे लॉगईन करा. यानंतर तुम्हाला आयोगाने दिलेल्या निकषांनुसार तुमचा ‘पासवर्ड’ सेट करावा लागेल. यानंतर पुढील प्रमाणे कृती करा-

भाग I

वैयक्तिक माहिती : यात नागरिकत्व, मातृभाषा, विवाहित झ्रअविवाहित, जन्माचे ठिकाण, कम्युनिटी (ओबीसी, एससी, एसटी), दिव्यांग इ. माहिती भरा.

‘ओबीसी’मध्ये ‘नॉनक्रिमीलेअर’ असेल तर ते प्रमाणपत्र कोणत्या राज्यातील आहे.प्रमाणपत्राचा क्रमांक, प्रमाणपत्र देणारी ऑथिरिटी याच्याबाबत माहिती देणे. केंद्र सरकारच्या यादीत ओबीसीतील तुमची जात कोणत्या क्रमांकावर आहे ते बघून त्याचा क्रमांक टाका.केंद्र सरकारच्या यादीत जातीचे नाव जसे असेल (स्पेलिंग) तसेच टाका. अन्यथा हे स्वीकारले जाणार नाही.

तुमचे प्रमाणपत्र (एससी, एसटी, अपंगत्व, एक्स-सर्विसमॅन इ.) ११/०२/२०२५या तारखेपूर्वीचे असणे अपेक्षित आहे.

नॉन क्रिमीलेअरसाठी २०२१-२२, २०२२-२३ व २०२३-२४ या ३ वर्षांतील उत्पन्न गृहीत धरले जाईल.

आर्थिक दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) साठी २०२३-२४वर्षातील उत्पन्न गृहीत धरले जाईल.

वडिलांच्या मूळ राज्यानुसार ओबीसी, एससी, एसटी आरक्षण मिळेल.

नोट : एका कॅटेगरीतून दुसऱ्या कॅटेगिरीत जाता येणार नाही. उदा. ओबीसी ते एससी, परंतु खुल्या गटात जाता येईल.

अर्ज केल्यानंतर ३ महिन्यात जर केंद्र शासनाने एखादी जात ओबीसी, एससी, एसटी यात समाविष्ट केली तर उमेदवाराला त्याचा लाभ घेता येईल.

परीक्षा प्रक्रियेदरम्यान उमेदवाराला ४० पेक्षा अधिक अपंगत्व आल्यास आयोगाला विनंती करून संबंधित आरक्षण मिळू शकते.

प्रमाणपत्र देणारी ऑथिरिटी तहसीलदार या पदापेक्षा खालील पदावरील नसावी.

फोटो ओळखपत्र : आधार, वाहन परवाना, पॅन कार्ड, पासपोर्ट, मतदान कार्ड, केंद्र वा राज्य शासनाने दिलेले ओळखपत्र यापैकी एक असावे. जे निवडाल तेच परीक्षा केंद्रावर नेणेबंधनकारक आहे.

पीडीएफ- २० ते ३०० केबी साईझमध्ये असावी.

दिव्यांग उमेदवाराने याआधी यूपीएससीची परीक्षा दिली असेल तर त्या संबंधी माहिती आयोगाने मागितली आहे.

निवड झाल्यावर आयोगाने उमेदवाराला अपात्र घोषित केले असल्यास ती माहिती भरणे.

मुलाखतीतून निवड न झाल्यास तुमची माहिती नोकरीसाठी इतर संस्थांना द्यावी का? होवा नाही.

तुमचा पत्ता : यात कायमस्वरूपी व पत्रव्यवहाराचा पत्ता टाका.

फोटो व स्वाक्षरी :

पासपोर्ट फोटो नोटिफिकेशन आल्याच्या आधी जास्तीत जास्त १० दिवस आधी काढलेला असावा. त्यावर चेहरा ३/४ असावा. फोटोवर नाव व फोटो काढल्याची तारीख असावी.

फोटोचे बॅकग्राऊंड पांढरे असावे. रंगीबेरंगी नसावे.

नोट : अर्जात अपलोड केलेल्या फोटोच्या ३ ते ४ कॉपीज परीक्षाकेंद्रावर तुमच्याजवळ असणे अपेक्षित आहे.

शैक्षणिक पात्रता : दहावी / बारावी / पदवी याबाबत माहिती भरणे.

पदवीच्या शेवटच्या वर्षाला असाल तर ‘अपिरिंग’ हा पर्याय निवडा. पदवीच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थी पूर्व व मुख्य परीक्षा देऊ शकतात. मुख्यपरीक्षेनंतर पदवी प्रमाणपत्र मुलाखतीच्या वेळी द्यावे लागेल.

डॉक्युमेंट अपलोड : पीडीफ फाईल ‘१एमबी’ पर्यंत चालेल. यात १०चे पासींग प्रमाणपत्र, पदवीचे प्रमाणपत्र, ओळखपत्र, आरक्षण (एससी, एसटी, ओबीसी – नॉनक्रिमीलेअर, ईडब्ल्यूएस) प्रमाणपत्र, ओबीसी व ईडब्लूएस डिक्लेरेशन, अपंगत्व प्रमाणपत्र, वयात मुभा मिळण्यासाठीचे प्रमाणपत्र, तुमच्या उपलब्धी संबंधीचे प्रमाणपत्र इ.

पालकांची माहिती : पत्ता, कामाचे स्वरूप, वार्षिक उत्पन्न,मूळ राज्य – जिल्हा इ.

रोजगारासंबंधीची माहिती: यात कामाचे स्वरूप झ्रसरकारी वा खाजगी, तुमचे पद, उत्पन्न इ. तुम्ही यूपीएससी देत आहात हे तेथील सक्षम अधिकाऱ्याला कळविल्याची तारीख देणे.

यूपीएससी परीक्षेसंबंधी माहिती: आधीचे अटेम्टस्, पद मिळाले असल्यास त्यासंबंधी माहिती.

उपलब्धी- यात स्कॉलरशिप, क्रीडा, शाळा – कॉलेजमध्ये भूषविलेले पद,छंद इ. माहिती भरणे.

ओबीसी अनेक्चर : आई-वडिलांचे पॅन नंबर, कामाचे स्वरूप, उत्पन्न, शेती, आयटीआर इत्यादी माहिती भरणे.

भाग II

हा भाग आयोगाच्या आधीच्या फॉर्मप्रमाणे आहे. येथे फॉरेस्ट वा सिविल कशासाठी परीक्षा द्यायची आहे ते निवडा. वयाची मुभा हवी असल्यास ते भरा.

मुख्य परीक्षेसाठी केंद्र, परीक्षेचे माध्यम,वैकल्पिक विषय निवडा.

भाग III

यात मुलाखतीचे माध्यम निवडा.

यानंतर सेवांचा पसंतीक्रम द्या.सेवांचा पसंतीक्रम गांभीर्यपूर्वक द्या.जी सेवा नको असेल त्यासमोर’९९’ लिहा.

सामाजिक – आर्थिक प्रश्नावली- ही माहिती गोपनीय असेल. मुलाखतीच्या वेळी पॅनलकडे नसेल.

भाग IV

पूर्व परीक्षेसाठीचे परीक्षा केंद्र निवडा.

घोषणापत्र वाचून फॉर्म सबमिट करा.

२०२५पासून अर्ज करण्याच्या प्रक्रियेतील बदल हा विद्यार्थी हितासाठीच केला आहे. हे लक्षात घेऊन शांतपणे, सर्व समजून परीक्षेसाठी अर्ज भरा.

सर्वांना पूर्वपरीक्षेसाठी शुभेच्छा!

sushilbari10@gmail.com