यूपीएससी पूर्वपरीक्षेत खात्रीने गुण मिळवून देणारा विषय म्हणून भूगोल या विषयाकडे पाहिले जाते. या विषयात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची संख्याही अधिक आहे.‘संकल्पना’,‘जीके’ व ‘चालू घडामोडी’ यांना अनुसरून भूगोलात प्रश्न विचारले जातात. यात प्राकृतिक भूगोल, भारताच्या भूगोलात विशेषत: कृषी व संसाधने तसेच मॅप आधारित प्रश्न मोठय़ा प्रमाणावर दिसून येतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पूर्व परीक्षेतील भूगोलाचा अभ्यासक्रम समजून त्यानुसार प्रत्येक घटकावर परीश्रम घ्यायला हवेत.

प्राकृतिक भूगोल : यात भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, सागरशास्त्र, जैवभूगोल व नैसर्गिक आपत्ती या घटकांचा अभ्यास अपेक्षित आहे. यावर विचारलेला २०२४ मधील प्रश्न बघा –

प्रश्न : खालील माहिती विचारात घ्या.

वरीलपैकी किती ओळींतील माहिती योग्य आहे ?

(अ) फक्त एक (ब) फक्त दोन

(क) फक्त तीन  (ड) सर्व चार

मानवी भूगोल: यात नागरिकीकरण, लोकसंख्या व वसाहती, आर्थिक भूगोल, मानवी विकास व सांस्कृतिक भूगोलाचा अभ्यास अपेक्षित आहे. २०२४ मधील खालील प्रश्न बघा –

प्रश्न : अर्थव्यवस्थेत एकूण प्रजनन दर (टीएफआर) म्हणजे –

अ)    एका वर्षांत दर १००० व्यक्तींमागे जन्मलेल्या बालकांची संख्या

ब)     एका जोडप्याला झालेल्या एकूण बालकांची संख्या

क)    जन्मदर व मृत्यूदरातील फरक

ड)     प्रजननक्षम काळात महिलेला झालेल्या जिवंत बालकांचा सरासरी दर

नोट: ही संकल्पना बहुतेक पुस्तकात आहे, परंतु प्रश्नाची भाषा व रचना जशीच्या तशी ‘एनसीईआरटी’मधील आहे.

भारताचा भूगोल : यात भारताचा प्राकृतिक भूगोल, भारतातील हवामानाचे विभाग, भारतातील नैसर्गिक संसाधने, कृषी व ग्रामीण विकास व यासंबंधीचे पर्यावरणाचे प्रश्न या सर्वाचा अभ्यास अपेक्षित आहे. यात ‘कृषी’ व ‘संसाधने’ या दोन घटकांवरील प्रश्न विचारण्याची आयोगाची वृत्ती वारंवार दिसून येत आहे.२०२४मधील खालील प्रश्न बघा –

प्रश्न : खालील बाबी विचारात घ्या.

१. काजू        २. पपई         ३. रक्तचंदन

यातील किती वृक्ष हे भारतातील देशी वृक्ष आहेत?

(अ) फक्त एक (ब) फक्त दोन

(क) सर्व तीन   (ड) एकही नाही

चालू घडामोडी : भूगोलाशी संबंधित चालू घडामोडींवर नियमित प्रश्न विचारलेले दिसून येतात. यात २१फेब्रुवारी २०२४रोजी ‘द हिंदूू’ वृत्तपत्रातील ‘कोकोआ’वरील लेखातून जसाच तसा आलेला प्रश्न बघा-

प्रश्न : खालीलपैकी कोणते दोन देश हे जगात सर्वाधिक कोकोआचे उत्पादन घेणारे देश म्हणून ओळखले जातात?

(अ) अल्जेरिआ व मोरोक्को

(ब) बोत्स्वाना व नामिबिया

(क) कोटडीआयवारेव घाना

(ड) मादागास्कर व मोझाम्बिक

नकाशा: वारंवार चर्चेत असणारी स्थळे, देश याबाबतचे प्रश्न पूर्व परीक्षेत विचारले जातात. यात गेल्या २ वर्षांपासून सुरू असलेल्या युक्रेनव रशिया युद्धामुळे २०२३ पूर्वपरीक्षेत युक्रेनच्या नकाशावर आधारित प्रश्न विचारले विचारला गेला –

प्रश्न : खालील देश विचारात घ्या.

१. बेलारूस    

२. इस्टोनिया

३. हंगरी      

४. चेक गणराज्य

५. पोलंड

यापैकी कोणत्या देशांची सीमा युक्रेनशी सामायिक आहे?

(अ) १, २ व ४ फक्त

(ब) ३, ४ व ५ फक्त

(क) १, ३ व ५ फक्त

(ड) १, २, ३ व ५

संकल्पना : यात ‘कोरिऑलिस फोर्स’, ‘आइसोथर्मल’ अशा संकल्पनांवर २०२४मध्ये प्रश्न विचारलेले आहेत. अभ्यास करताना संकल्पना समजून घेण्यावर तुमचा भर असणे आवश्यक आहे.

‘एनसीईआरटी’ भूगोलाचा पाया : भूगोलातील संकल्पना समजून घेण्यासाठी ‘एनसीईआरटी’ची पुस्तके मोलाची भूमिका बजावतात. त्यामुळे या पुस्तकांचे वाचन वारंवार होणे अपेक्षित आहे.११ वी व १२ वीची ‘एनसीईआरटी’ची ४ पुस्तके पूर्वपरीक्षेसाठी खूप महत्त्वाची आहेत.

संदर्भ पुस्तके :

६ वी ते १२ वी एनसीईआरटी

सर्टिफिकेट फिजिकल अँड ह्यूमन जिओग्राफी झ्र्जी. सी.लिओंग

ऑक्सफोर्ड स्कूल अ‍ॅटलास

जिओग्राफिकल इनसाईटस् फ्रॉम इंडिया टू द वल्र्ड – भूमिका सैनी व पंकज गर्ग

पूर्वपरीक्षेत यश मिळविण्यासाठी भूगोल विषयात तुमचा हातखंडा असायलाच हवा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वरील विश्लेषणाप्रमाणे अभ्यास करा. sushilbari10@gmail.com