या लेखात आपण युपीएससी पूर्वपरीक्षेत अलीकडे प्रकर्षाने विचारल्या जाणाऱ्या ‘संरक्षण’ या घटकाबाबत जाणून घेणार आहोत. २०२४ च्या पूर्वपरीक्षेत या घटकावर बरेच प्रश्न विचारण्यात आले होते. यात चीफ ऑफ डीफेंस स्टाफ (सीडीएस), लष्कराच्या मोहिमा, लष्करी कवायती, लढाऊ विमाने झ्र हेलिकॉप्टर व भारतीय संरक्षण दलातील पदानुक्रम यावर प्रश्न विचारलेले आहेत. तसेच गतवर्षीच्या प्रश्नांचा विचार केल्यास विविध क्षेपणास्त्रांवरही प्रश्न विचारलेले आहेत.

२०२४ च्या यूपीएससी पूर्वपरीक्षेतील प्रश्न बघा –

● प्र. लष्करी व्यवहार विभागाचे प्रमुख म्हणून संरक्षण प्रमुख (सीडीएस) यांची कर्तव्ये कोणती आहेत?

१. चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे स्थायी अध्यक्ष असतात.

२. तिन्ही सेवा प्रमुखांवर लष्करी कमांडचा वापर करणे.

३. सर्व तिन्ही सेवा बाबींवर संरक्षण मंत्र्यांचे प्रमुख लष्करी सल्लागार असतात.

खाली दिलेल्या कोडचा वापर करून योग्य उत्तर निवडा:

(अ) १, २ आणि ३ (ब) १ आणि २ फक्त(क) २ आणि ३ फक्त (ड) १ आणि ३ फक्त

संरक्षण प्रमुख (सीडीएस) यांच्या कर्तव्यांचा विचार केल्यास त्यांना तिन्ही सेवा प्रमुखांवर लष्करी कमांडचा वापर करण्याचा अधिकार नसतो. चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे ते स्थायी अध्यक्ष असतात व सर्व तिन्ही सेवा बाबींवर संरक्षण मंत्र्यांचे प्रमुख लष्करी सल्लागारही ते असतात.

कारगिल पुनरावलोकन समिती (१९९९) अहवालाचा अभ्यास करण्याचे काम सोपवण्यात आलेल्या मंत्र्यांच्या गटाने २००१ मध्ये त्याची स्थापना करण्याची शिफारस केली होती.लेफ्टनंट जनरल डी.बी. शेकटकर (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखालील शेकटकर समितीच्या शिफारशीवरून सीडीएसचे पद निर्माण करण्यात आले.

● प्र. दुर्गम भागातील स्थानिक लोकसंख्येच्या उन्नतीसाठी त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी लष्कराने हाती घेतलेल्या ऑपरेशन्सना काय म्हणतात?

(अ) ऑपरेशन संकल्प

(ब) ऑपरेशन मैत्री

(क) ऑपरेशन सद्भावना

(ड) ऑपरेशन मदद

‘ऑपरेशन सद्भावना’ हा भारतीय सैन्याचा एक मानवतावादी उपक्रम असून याचा उद्देश दुर्गम भागातील लोकांची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती सुधारणे हा आहे. यात शाळा चालवणे, पायाभूत सुविधा विकसित करणे आणि राष्ट्रीय एकात्मता दौऱ्यांना प्रोत्साहन देणे यासारख्या विविध कल्याणकारी उपक्रमांद्वारेभारतीय सैन्य स्थानिक नागरिकांना सक्षम करण्यासाठीरोजगाराच्या संधी आणि शिक्षणाला प्रोत्साहन देऊन राष्ट्र उभारणीच्या प्रयत्नांना हातभार लावणे हे आहे.

● प्र. भारतीय संरक्षण दलाच्या तीन सेवांमधील समतुल्य रँकनुसार खालीलपैकी कोणते/कोणती योग्यरित्या जुळले आहेत?

खाली दिलेल्या कोडचा वापर करून योग्य उत्तर निवडा:

(अ) १आणि ४ (ब) १आणि ४ (क) २, ३आणि ४ (ड) फक्त ३

भारतीय संरक्षण दलाच्या तीन सेवांमधील समतुल्य रँक खालीलप्रमाणे आहेत –

भारतीय संरक्षण दलाच्या तीन सेवांमधील समतुल्य रँक समजून घेणे व पदानुक्रम माहीत असणे इथे अपेक्षित आहे. असे प्रश्न सामान्यत: ‘सीएपीएफ’, ‘सीडीएस’ अशा परीक्षेत विचारले जातात.

● प्र. मित्र शक्ती-२०२३बद्दल खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

१. हा भारत आणि बांगलादेश यांच्यातील संयुक्त लष्करी सराव होता

२. तो औंध (पुणे) येथे सुरू झाला.

३. दहशतवादविरोधी कारवायांदरम्यान संयुक्त प्रतिसाद देणे हे या ऑपरेशनचे उद्दिष्ट होते.

४. भारतीय हवाई दल या सरावाचा एक भाग होते.

खाली दिलेल्या कोडचा वापर करून उत्तर निवडा:

(अ) १, २ आणि ३ (ब) १, २ आणि ४(क) १, ३ आणि ४ (ड) २,३ आणि ४

लष्करी कवायतींचा अभ्यास करताना लष्करी कवायत कोणत्या देशांमधील आहे, तसेच ती भूदल, हवाईदल व नौदल यापैकी कशाशी संबंधित आहे, स्थल, कालावधी व त्या कवायतीचे ब्रीदवाक्य काय आहे ते जाणून घ्या. उदा. मित्र शक्तीसराव(२०२३) हा भारत आणि श्रीलंका यांच्यातील9 वा संयुक्त लष्करी सराव होता. हा सराव औंध (पुणे) येथे संपन्न झाला. या सरावाच्या कक्षेत दहशतवादविरोधी कारवायांदरम्यान संयुक्त प्रतिसाद देणेही समाविष्ट आहे. भारतीय हवाई दलाचे १५ आणि श्रीलंका हवाई दलाचे ५ जवान यांनी या सरावात भाग घेतला होता. भारताच्या इतर देशांबरोबरच्या लष्करी सरावांचा अशाच प्रकारे अभ्यास करा.

● प्र. खालील विमानांचा विचार करा:

१. राफेल २. मिग-२९३. तेजस एमके-आय

वरीलपैकी किती पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने मानली जातात?

अ) फक्त एक ब) फक्त दोन क) सर्व तीन ड) काहीही नाही

पाचव्या पिढीतील लढाऊ विमानांमध्ये गुप्त क्षमता असते आणि ते आफ्टरबर्नर्सना न जुमानता सुपरसॉनिक वेगाने उड्डाण करू शकतात.सध्यापाचव्या पिढीतील विमाने केवळ रशिया, चीन आणि अमेरिकेकडे आहेत. भारत आपल्या हवाई शक्ती क्षमता वाढविण्यासाठी आणि प्रादेशिक धोक्यांना तोंड देण्यासाठीस्वत:चे स्वदेशी पाचव्या पिढीचे स्टेल्थ फायटर जेट, अॅडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट विकसित करत आहे, ज्याचे पहिले प्रोटोटाइप उड्डाण २०२८ पर्यंत अपेक्षित आहे. तसेच क्षेपणास्त्रांचा अभ्यास करताना त्यांचा पल्ला, इंधन याचा अभ्यास करा.

sushilbari@gmail.com