ऋषिकेश बडवे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
यूपीएससी मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर ३ मध्ये अर्थशास्त्र, पर्यावरण, विज्ञान व तंत्रज्ञान, अंतर्गत सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विषयांवर प्रश्न विचारलेले आढळून येतात. यापैकी अर्थशास्त्र या घटकाला अतिशय महत्त्व आहे. २५० गुणांच्या या पेपरमध्ये सर्वसाधारणपणे ५० टक्के प्रश्न अर्थशास्त्रावर विचारलेले आढळून येतात. २०२३ मधील मुख्य परीक्षेत मात्र अर्थशास्त्रावर ९० गुणांसाठी प्रश्न विचारलेले पाहावयास मिळतात. या प्रश्नांचे विश्लेषण आपण या लेखमालेत करणार आहोत.
यूपीएससी मुख्य परीक्षेत उत्तर लिहिताना सर्वप्रथम विचारलेला प्रश्न काळजीपूर्वक वाचणे गरजेचे असते. प्रश्न वाचून त्यामध्ये विचारलेल्या मुद्द्यावर अचूक व नेमकेपणाने उत्तर लिहिणे महत्त्वाचे असते. अशातच प्रश्नात विचारलेल्या मुद्द्याला बगल देऊन स्वत:ला येत असलेले मुद्दे विद्यार्थी लिहीत बसतात. त्यातल्या त्यात मराठी माध्यमातून परीक्षा देणारे विद्यार्थी इंग्रजीमधील प्रश्नच न समजल्यामुळे आणखी गफलत करून घेतात. यासाठी प्रश्न काळजीपूर्वक वाचून त्याचे अचूक उत्तर रचनात्मक पद्धतीने लिहिणे गरजेचे असते. या लेखात व पुढील लेखमालेत आपण २०२३ मध्ये झालेल्या मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर ३ मधील अर्थशास्त्र विषयाच्या प्रश्नांचे विश्लेषण करून त्यांच्या उत्तराच्या रचना करण्याचा प्रयत्न करणार आहोत. यामध्ये विस्तृत उत्तर न लिहिता प्रश्नाच्या उत्तरात कोणते मुद्दे अपेक्षित आहेत व त्या अपेक्षित मुद्द्यांची रचना कशी असली पाहिजे यावर भर देणार आहोत.
हेही वाचा >>> स्कॉलरशीप फेलोशीप : हवा दर्जेदार शिक्षणाचा अधिकार!
Q. Faster economic growth requires increased share of the manufacturing sector in GDP, particularly of MSMEs. Comment on the present policies of the government in this regard. ( Answer in 150 words)
प्रश्नाची पार्श्वभूमी : २०१६ च्या नोटबंदी पासून MSME अडचणींच्या गर्तेत अडकलेल्या आहेत. ज्यात २०१७ मध्ये लागू झालेला GST, २०१८ व २०१९ मध्ये अर्थव्यवस्थेत आलेली मरगळ व २०२० मधील करोना यामुळे एकंदरच MSME च्या अडचणी सतत वाढत गेल्या आहेत.
उत्तर लिहिताना : उत्तर लिहिताना सर्वप्रथम तीव्र आर्थिक वाढीचा दर म्हणजे काय व तो साध्य करण्यासाठी उत्पादन क्षेत्राचे (Manufacturing Sector) योगदान स्पष्ट करणे गरजेचे आहे. ते करत असताना उत्पादन क्षेत्राचा जीडीपीमधील वाटा, या क्षेत्रामधील निर्माण होणारा रोजगार, त्याचे प्राथमिक व तृतीय क्षेत्राशी असणारे सहसंबंध, निर्यातीत असणारा वाटा, भांडवली वस्तूंच्या उत्पादनाची गरज व त्यांचे पुढील योगदान इत्यादी स्पष्ट करणे गरजेचे आहे. हे स्पष्ट करत असताना विशेष भर या क्षेत्रातील महत्त्वाचा घटक असलेले MSME यांची व्याख्या देणे व त्याच्या योगदानावर देणे आवश्यक आहे. कोव्हिडनंतर केंद्र सरकारने या संकल्पनेच्या मर्यादेमध्ये मोठे बदल केलेले आहेत. यानंतर उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी व त्यातही प्रामुख्याने MSME ला चालना देण्यासाठी सरकारने जाहीर केलेल्या विविध योजनांचा उल्लेख करणे गरजेचे आहे. यानंतर उत्तर संपवताना अगदी थोडक्यात या क्षेत्रातील समस्या मांडून त्या कशा पद्धतीने सुटतील असे सकारात्मक चित्र उभे करून उत्तर संपवावे.
हेही वाचा >>> नोकरीची संधी : लष्करात भरती होण्याची संधी
Q : What is the status of digitalization in the Indian economy? Examine the problems faced in this regard and suggest improvements. (Answer in 150 words)
प्रश्नाची पार्श्वभूमी : केंद्र सरकारने यावर्षी १४,९३० कोटी रुपयांची तरतूद करून डिजिटल इंडिया या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे नूतनीकरण केले आहे.
उत्तर लिहिताना :
१. डिजिटल इंडिया या उपक्रमाची माहिती थोडक्यात द्यावी.
२. २०१५ पासून सुरू झालेल्या उपक्रमातून आत्तापर्यंत झालेली लक्ष्य प्राप्ती लिहावी. यासाठी नीती आयोग आणि मास्टरकार्डने जोडणी केलेले ‘कॉमर्स – क्रिएटिंग अ रोडमॅप फॉर अ डिजिटली इन्क्लुसिव्ह भारत’ या शीर्षकाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे, त्याचा आधार घेता येतो. त्याचबरोबर उत्तर लिहिताना शासन व्यावहार, सर्व सामाजिक आर्थिक भौगोलिक स्तरांचे समावेशन व सक्षमीकरण, व्यापार, शिक्षण आरोग्य यासर्व आयामांमध्ये डिजिटल इंडियाने केलेल्या लक्षणीय कामगिरीबद्दल लिहीणे गरजेचे आहे. ३. यासर्व प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी व त्यावरील मार्ग सुचवणे गरजेचे आहे. मार्ग सुचवताना कल्पकतेचा वापर करून आउट ऑफ बॉक्स पर्याय सुचवून इतर उत्तरापासून आपले उत्तर वेगळे [Standout] करण्याचा प्रयत्न करावा. पुढील लेखात या पेपर मधील राहिलेल्या प्रश्नांवर चर्चा करू या.