सध्या बहुतांश क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान आले आहे. हे तंत्रज्ञान कुठपर्यंत गेले आहे याची आपल्याला कल्पनाही करता येत नाही. या क्षेत्रामुळे नोकऱ्यांवर गदा येईल, अशी भीती बाळगण्याऐवजी त्यातील संधी शोधण्याचा प्रयत्न करावा. या क्षेत्रात विद्यार्थ्यांना टिकून राहायचे असेल तर, त्यांनी ‘पायथन प्रोग्रॅम’ आणि माहितीचे विश्लेषण (डेटा अॅनालिसिस) चे ज्ञान आत्मसात केले पाहिजे. त्यासह, इंग्रजी भाषेबरोबर परदेशी भाषा शिकणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. केवळ अभ्यास आणि ज्ञान संपादन करून चालणार नाही तर, मानसिक स्वास्थ्याकडे आणि शारीरिक स्वास्थाकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी दररोज योग, प्राणायम केले पाहिजे.

इंडस्ट्री ४.० येऊन १२ वर्षे झाली. परंतु, तरी अनेकांना त्याविषयी माहीत नाही, याची खंत वाटते. सर्वच प्रकारच्या सर्जनशील क्षेत्रात सुद्धा कृत्रिम बुद्धिमत्तेेने मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे. आपण सगळ्यांनी जागे होण्याची गरज आहे. चॅट जीपीटीमुळे कला क्षेत्रातील बऱ्यापैकी नोकऱ्या कमी होण्याची शक्यता आहे. हे तंत्रज्ञान खूप वेगाने पुढे जात आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे आपल्या मनामध्ये काय सुरू आहे, हे समजते. त्यामुळे करिअर निवडताना किंवा त्यात विकसित होताना सुद्धा आपण कृत्रिम बुद्धिमत्तेला टाळू शकत नाही.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Artificial intelligence is hard to avoid bhushan kelkar amy
First published on: 21-06-2024 at 09:17 IST