प्रा. रवींद्र कुलकर्णी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नेहमीप्रमाणे सारे जण जमले. मागच्या वेळी सर्वानी मूल्यशिक्षणाविषयी चर्चा केली होती. यावेळी प्रा. रमेश कोणत्या विषयाची चर्चा करणार याबद्दल सर्वाना कुतूहल होतं. आज प्रा. रमेश सर काहिसे उशिरा आले. त्यांच्या चेहऱ्यावर थोडा दमलेला भाव होता. सर म्हणाले, ‘‘आज जरा क्रॉस मैदानावर चक्कर मारली, जवळच्या विद्यापीठ विद्यार्थी भवनात जाऊन आलो व नंतर जहांगीर आर्ट गॅलरीत गेलो होतो.’’ सारे आश्चर्यचकित झाले. सर म्हणाले, ‘‘मित्रांनो, आज आपण कला, क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांवर बोलणार आहोत. त्यामुळे जरा मनाची तयारी करण्यासाठी व काही नवं सुचतं का ते पाहण्यासाठी तिथं जाऊन आलो.’’
सर म्हणाले, ‘‘सुहृदांनो, सांस्कृतिक जागरूकता आणि अभिव्यक्ती ही मुलांमध्ये विकसित होण्यासाठी त्यांना आपल्या संस्कृतीचा परिचय करून देणं, आपल्या पाळामुळांची ओळख करून देणं व त्याविषयी आपलेपणाची भावना निर्माण करणे आवश्यक आहे. तसेच इतर संस्कृती आणि ओळखीचे कौतुक प्रदान करण्यासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या प्रमुख क्षमतांपैकी एक आहेत. कलेविषयी जागरूकता, सांस्कृतिक ओळख आणि समाजाचे पुनरुत्थान करण्याबरोबरच, विविध व्यक्तींमध्ये संज्ञानात्मक आणि सर्जनशील क्षमता वाढवण्यासाठी आणि वैयक्तिक आनंद प्रदान करणे हे आवश्यक आहे. शिक्षणाच्या सर्व स्तरांवर विद्यार्थ्यांना क्रीडा, ललित कला, उपयुक्त कला, दृश्य कला आणि सांस्कृतिक उपक्रमांत सहभागी करणे हा NEP 2020 चा गाभा आहे. त्यातून मिळणारा आनंद, मन:स्वास्थ्य, संज्ञानात्मक विकास आणि व्यक्तींची सांस्कृतिक ओळख हे सर्व प्रकारच्या भारतीय कला शिक्षणाच्या सर्व स्तरांवर उपलब्ध करून देणे महत्त्वाचं आहे.’’
हेही वाचा >>> यूपीएससीची तयारी : कर्तव्यवादी नैतिक सिद्धांत
प्रा. सुनील रमेश सरांना थांबवत म्हणाले, ‘‘सर, याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी होईल ना, आणि यात आपल्याला स्थानिक कलाकार आणि कारागीरांना अतिथी शिक्षक म्हणून आमंत्रित केले पाहिजे, त्यांच्याकडून संगीत, कला, भाषा आणि हस्तकला यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये संस्कृती आणि स्थानिक ज्ञानाविषयी जागरूकता सुनिश्चित करण्यासाठी उच्च शिक्षण संस्थांनी प्रयत्न केले पाहिजेत.’’
प्रा. रमेश सरांनी त्यांना दुजोरा दिला. ते म्हणाले, ‘‘उच्च शिक्षण संस्थांच्या अभ्यास मंडळांनी भाषांतर आणि व्याख्या, कला आणि संग्रहालय प्रशासन, पुरातत्व, कलाकृती संवर्धन, ग्राफिक डिझाईन आणि वेब डिझाइनमध्ये उच्च दर्जाचे अभ्यासक्रम विकसित केले पाहिजेत, जेणेकरून संग्रहालये, वारसास्थळे किंवा पर्यटन स्थळे येथे काम करण्यासाठी उच्च विद्या विभूषित विद्यार्थी तयार होतील. यामुळे पर्यटन उद्योगालाही मोठय़ा प्रमाणात बळकटी मिळेल व योग्य गती मिळेल. उच्च शिक्षण संस्थांनी मराठी आणि इतर भारतीय भाषांमधील कलाकृतींचे संवर्धन आणि उच्च दर्जाचे साहित्य विकसित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.’’
सर सांगत होते, ‘‘क्रीडा क्षेत्रही अत्यंत महत्त्वाचं आहे. आरोग्य आणि निरोगीपणाशी संबंधित अभ्यासक्रमाचे घटक हे एखाद्या व्यक्तीच्या शारीरिक, भावनिक, बौद्धिक, सामाजिक, आध्यात्मिक आणि पर्यावरणीय कल्याणाच्या योग्य स्थितीला प्रोत्साहन देतात. खेळ आणि फिटनेस आदी क्रियाकलाप नियमित तासिकाच्या व्यतिरिक्त आयोजित केले जावेत. योगशिक्षणाने विद्यार्थ्यांना त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक क्षमतांच्या एकात्मतेसाठी शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा तयार करणे आणि तसेच स्वत:ला स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाबद्दल मूलभूत ज्ञानाने सुसज्ज करणे, स्वयं-शिस्त आणि आत्म-नियंत्रण राखणे, स्वत:ला चांगल्या प्रकारे हाताळण्यास शिकणे यावर शिक्षण केंद्रित केले पाहिजे. जीवनातील सर्व परिस्थितींमध्ये अभ्यासक्रमातील खेळ आणि फिटनेस घटकांनी शारीरिक तंदुरुस्तीच्या सुधारणेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे ज्यामध्ये शरीराचे विविध घटक आणि सामर्थ्य, वेग, समन्वय, सहनशक्ती आणि लवचिकता यांसारख्या फिटनेसशी संबंधित कौशल्ये सुधारणे समाविष्ट आहे. विविध कौशल्यांसह क्रीडा कौशल्यांचे संपादन तसेच विशिष्ट खेळाशी संबंधित मूलभूत हालचाली कौशल्ये; रणनीतिक क्षमता सुधारणे; आणि मानसिक क्षमता सुधारणे.’’
हेही वाचा >>> UPSC-MPSC : संसदेत किती प्रकारचे नेते असतात? त्यांची कार्ये कोणती?
प्रा. जोसेफ यांनी त्यांना विचारलं, ‘‘सर, चार वर्षांच्या बहुविद्याशाखीय पदवी कार्यक्रमाचा भाग म्हणून पाठविल्या जाणाऱ्या शालेय अभ्यासक्रमांतर्गत कोणकोणते उपक्रम हाती घेतले जाऊ शकतात?’’ रमेश सर म्हणाले, ‘‘उच्च शिक्षण संस्थांनी आपलं लक्ष मोठय़ा प्रमाणावर पुढील उपक्रमांवर केंद्रित केलं पाहिजे आणि एक खबरदारी घेतली पाहिजे, की या सर्व उपक्रमांत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे आवश्यक ते श्रेयांकही दिले पाहिजेत. आपण पुढील उपक्रम हाती घेऊ शकतो:
i) शारीरिक शिक्षण
ii) योग / खेळ आणि खेळ यांच्याशी संबंधित उपक्रम
iii) कॅम्पस प्रकाशन किंवा इतर प्रकाशनांमध्ये सहभाग
iv) वृत्तपत्रे, मासिकांमध्ये लेख प्रकाशित करणे
v) सामुदायिक कार्य जसे की राष्ट्रीय एकात्मता, पर्यावरण, मानवी हक्क आणि कर्तव्ये, शांतता, नागरी भावना इत्यादींच्या मूल्यांचा प्रचार.
vi) विविध क्षेत्रात भारताने आजवर प्राप्त केलेल्या यशासंबंधित एक लहान प्रकल्प कार्य
vii) भारतीय विचार आणि कल्पनांवर अभ्यास गट/परिसंवाद मंडळांची उत्क्रांती
viii) भारतीय सभ्यतेच्या विविध पैलूंचा शोध घेणारी क्रियाकलाप
ix) वैज्ञानिक स्वभावासारख्या लोकप्रियीकरण कार्यक्रमांमध्ये सहभाग
x) नृत्य/संगीत/नाटय़ आणि व्हिज्युअल आर्ट्समधील नाविन्यपूर्ण रचना आणि निर्मिती.
xi) विद्यापीठाने विहित केलेले सांस्कृतिक/क्रीडा उपक्रम यासारखे इतर कोणतेही उपक्रम.
सह-अभ्यासक्रम आणि विस्तार उपक्रम/अभ्यासक्रमांचे मूल्यमापन विद्यापीठाने विहित केलेल्या प्रक्रियेनुसार करणे अपेक्षित आहे.’’
रमेश सर म्हणाले, ‘‘मित्रांनो, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्राला योग्य महत्त्व दिलं तर ते विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाला उपकारक ठरेल. पुढच्या वेळी आपण सामूहिक उपक्रम आणि प्रत्यक्ष प्रकल्पांची NEP 2020 मधे नेमकी कोणती भूमिका आहे ते पाहू.’’ अनुवाद : डॉ. नीतिन आरेकर