इंडियन ओव्हरसीज बँक ( IOB) (भारत सरकारचा उपक्रम अॅप्रेंटिसेस अॅक्ट, १९६१ अंतर्गत अॅप्रेंटिसेसची सन २०२४-२५ करिता भरती. एकूण पदे – ७५०. महाराष्ट्रातील रिक्त पदे – ६० (अजा – ६, अज – ५, इमाव – १६, ईडब्ल्यूएस – ६, खुला – २७ (३ पदे अपंगांसाठी प्रत्येकी १ पद राखीव)). गोवा – ५ (खुला – ५), कर्नाटक – ३०, गुजरात – २५, आंध्र प्रदेश – २५ इ. पात्रता – (दि. १ मार्च २०२५ रोजी) पदवी (कोणतीही शाखा) उत्तीर्ण. पदवी परीक्षा १ एप्रिल २०२१ ते १ मार्च २०२५ दरम्यान उत्तीर्ण केलेली असावी.

वयोमर्यादा : (दि. १ मार्च २०२५ रोजी) २० ते २८ वर्षे.

अॅप्रेंटिसशिप ट्रेनिंगचा कालावधी १ वर्षाचा असेल. ट्रेनिंग दरम्यान उमेदवारांना दरमहा अर्धनागरी/ ग्रामीण भागातील बँकांसाठी – रु. १०,०००/-, अर्बन भागासाठी रु. १२,०००/-, मेट्रो सिटीजसाठी रु. १५,०००/- स्टायपेंड दिला जाईल.

निवड पद्धती : (i) ऑनलाइन ऑब्जेक्टिव्ह टाईप लेखी परीक्षा (१) जनरल/फिनान्शियल अवेअरनेस, (२) जनरल इंग्लिश, (३) क्वांटिटेटिव्ह अँड रिझनिंग अॅप्टिट्यूड, (४) कॉम्प्युटर किंवा विषयाचे नॉलेज. प्रत्येकी २५ प्रश्न, २५ गुण, एकूण १०० प्रश्न, वेळ ९० मिनिटे. (ii) टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज

राज्यनिहाय कॅटेगरीनुसार मेरिट लिस्ट उमेदवारांच्या लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार बनविली जाईल. प्रतीक्षा यादीसुद्धा बनविली जाईल.

अर्जाचे शुल्क : खुला/ इमाव/ ईडब्ल्यूएस – रु. ८००/-.

विस्तृत माहिती http://www.iob.in किंवा www.bfsissc.com या वेबसाईटवरील Careers Section मध्ये उपलब्ध आहे.

ऑनलाइन अर्ज http://www.bfsissc.com या संकेतस्थळावर करण्याचा अंतिम दिनांक ९ मार्च २०२५.

तामिळनाड मर्कंटाईलबँकेत संधी

तामिळनाड मर्कंटाईल बँक लि. (TMB) मध्ये राज्यनिहाय ‘सिनियर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह (SCSE)’ पदांची भरती. एकूण रिक्त पदे – १२४ (खुला गट). महाराष्ट्र राज्यातील रिक्त पदे (कंसात प्रादेशिक भाषा दिलेली आहे) महाराष्ट्र – एकूण २२ (मराठी); गुजरात – ३४ (गुजराती); आंध्र प्रदेश – २१ पदे (तेलुगू); कर्नाटक – ३२ (कन्नड); तेलंगणा – २० (तेलुगू).

पात्रता : (दि. ३१ जानेवारी २०२५ रोजी) पदवी (आर्ट्स आणि सायन्स विषयातील) किमान सरासरी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.

वय : (दि. ३१ जानेवारी २०२५ रोजी) ३० वर्षे पूर्ण नसावीत.

अनुभव : असल्यास प्राधान्य देण्यात येईल, परंतु इष्ट पात्रता नव्हे.

वेतन : दरमहा रु. ३२,०००/- + इतर भत्ते (वेतनाच्या ५० टक्के) रु. १६,०००/- एकूण रु. ४८,०००/- दरमहा. याशिवाय वार्षिक देय असलेला वेरिएबल पे रु. १६,०००/- आणि इतर भत्ते. (i) न्यू पेन्शन स्कीम अंतर्गत बँकेचे योगदान (वेतनाच्या १४ टक्के) रु. ४,४८०/-. (ii) मेडिकल इन्श्युरन्स रु. १,७५१.७५. (iii) सेवानिवृत्तीच्या वेळी मिळणारे पैसे (ग्रॅच्युइटी) दरमहा रु. १,३३३.३३. (iv) लाइफ इन्श्युरन्स रु. २६०.७५. (v) मेडिकल एड रु. २३५.८३ इ. एकूण सीटीसी रु. ७२,०६१.६७ दरमहा.

निवड पद्धती : लेखी परीक्षेचे स्वरूप IBPS च्या मानका (Standard) प्रमाणे (एकच परीक्षा) परीक्षेचे माध्यम इंग्रजी. लेखी परीक्षेतील गुणांनुसार उमेदवार इंटरव्ह्यूकरिता शॉर्ट लिस्ट केले जातील.

फेज-१: ऑनलाइन परीक्षा (एप्रिल २०२५) एकूण १५० प्रश्न, १५० गुण, वेळ १२० मिनिटे. (i) जनरल अवेअरनेस – २५ प्रश्न, वेळ १५ मिनिटे. (ii) इंग्लिश लँग्वेज – ३० प्रश्न, वेळ २० मिनिटे. (iii) रिझनिंग अँड कॉम्प्युटर अॅप्टिट्यूड – ३० प्रश्न, वेळ २५ मिनिटे. (iv) क्वांटिटेटिव्ह अॅबिलिटी – २५ प्रश्न, वेळ २५ मिनिटे. (v) जनरल बँकिंग – ४० प्रश्न, वेळ ३५ मिनिटे. (एका प्रश्नाला उत्तराचे ५ ऑप्शन्स असतील; प्रत्येकी चुकीच्या उत्तरासाठी १/४ गुण वजा केले जातील.)

परीक्षा केंद्र : मुंबई/ ठाणे/ MMR/ नवी मुंबई, पुणे, रत्नागिरी इ.

फेज-२ : मुलाखत (इंग्लिश)

अर्जाचे शुल्क/इंटिमेशन चार्जेस : रु. १,०००/- अधिक कर. ऑनलाइन अर्ज www.tmbnet.in/tmb_careers या संकेतस्थळावर दि. १६ मार्च २०२५ पर्यंत करावेत. suhaspatil237@gmail.com

Story img Loader