सुहास पाटील

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्मोनल सिलेक्शन ( IBPS) आपल्या सहयोगी ११ बँकांमधील क्लेरिकल कॅडरच्या सन २०२५-२६ मधील एकूण रिक्त ६,१२८ पदांच्या भरतीसाठी कॉमन रिक्रूटमेंट प्रोसेस ( CRP Clerks- XIV) ऑगस्ट/ सप्टेंबर/ ऑक्टोबर २०२४ मध्ये आयोजित करणार आहे.

Education Opportunity Various courses run by Amrit
शिक्षणाची संधी: ‘अमृत’द्वारे चालवणारे विविध कोर्सेस
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Nashik compensation land, Farmers Action Committee Nashik,
नाशिक : जागेचा मोबदला न मिळाल्यास रस्त्यांवर नांगर – मनपा आयुक्तांना शेतकरी कृती समितीचा इशारा
Antar Singh Aryas appeal to youth says responsibility of youth to save tribals
आदिवासींना वाचविण्याची युवापिढीवर जबाबदारी, युवा संवादमध्ये अंतरसिंग आर्या यांचे आवाहन
JP Gavit, pesa recruitment, Nashik, JP Gavit agitation
नाशिक : पेसा भरतीसाठी आंदोलन तीव्र करणार – जे. पी. गावित यांचा इशारा
Free electricity, farmers, mahavitaran,
मोफत वीज योजना : नाव शेतकऱ्यांचे, लाभ महावितरणचा, वीज ग्राहक संघटना म्हणते..
Jayant Patil On Devendra Fadnavis
Jayant Patil : जयंत पाटलांची फडणवीसांवर खोचक टीका; म्हणाले, “महाराष्ट्राकडे पाहण्यासाठी त्यांना वेळ नाही”
Satara DCC Bank Recruitment 2024
Satara: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध पदांसाठी नोकरीची सुवर्ण संधी; लगेच करा अर्ज

महाराष्ट्रातील रिक्त पदे एकूण ५९०. (२२ पदे दिव्यांग कॅटेगरी HI ५, OC ५, VI ५, ID ७ साठी राखीव, ६० जागा माजी सैनिकांसाठी व २६ जागा DESM साठी राखीव)

(१) बँक ऑफ इंडिया १०६ पदे (अजा १०, अज ९, इमाव २८, ईडब्ल्यूएस १०, खुला – ४९).

(२) पंजाब नॅशनल बँक ११० पदे (अजा ११, अज ९, इमाव २९, ईडब्ल्यूएस ११, खुला – ५०).

(३) पंजाब अँड सिंध बँक १८ पदे (अजा २, अज १, इमाव ४, ईडब्ल्यूएस १, खुला – १०).

(४) सेंट्रल बँक ऑफ इंडिया ३५२ पदे (अजा ३५, अज ३१, इमाव ९५, ईडब्ल्यूएस ३५, खुला १५६).

(५) इंडियन ओव्हरसिज बँक ४ पदे (अजा २, इमाव २).

गोव्यातील रिक्त पदे एकूण ३५ पदे.

(१) बँक ऑफ इंडिया ३ पदे,

(२) सेंट्रल बँक ऑफ इंडिया १८ पदे,

(३) इंडियन ओव्हरसिज बँक ३ पदे,

(४) पंजाब नॅशनल बँक १० पदे,

(५) पंजाब अॅण्ड सिंध बँक ० पदे,

(६) कॅनरा बँक १ पद.

महाराष्ट्रातील सहयोगी बँकांमधून BOB, Bank of Maharashtra, Indian Bank, UCO बँक, युनियन बँक ऑफ इंडिया यांनी रिक्त पदांचा तपशील IBPS ला कळविलेला नाही.

पदाचे नाव : क्लर्क.

पात्रता : दि. २१.०७.२०२४ रोजी पदवी (कोणतीही शाखा) उत्तीर्ण आणि स्थानीय भाषेचे व कॉम्प्युटरचे ज्ञान आवश्यक.

वयोमर्यादा : दि. १ जुलै २०२४ रोजी २० ते २८ वर्षे ( इमाव विधवा/ परित्यक्ता/ ज्युडिशियली सेपरेटेड महिला खुला गट ३५/ इमाव ३१ वर्षे; अजा/अज ३३ वर्षे; दिव्यांग ३८/४१/४३ वर्षे; ३८/ अजा/ अज ४० वर्षे).

प्री-एक्झामिनेशन ट्रेनिंग सहयोगी बँका अजा/ अज/ दिव्यांग/ अल्पसंख्यांक/ माजी सैनिक उमेदवारांना नि:शुल्क प्री-एक्झामिनेशन ट्रेनिंग औरंगाबाद, मुंबई, नागपूर, पुणे, पणजी इ. केंद्रांवर दि. १२ ते १७ ऑगस्ट २०२४ मध्ये आयोजित करणार आहेत. उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करताना तशी नोंद करावी.

अर्जाचे शुल्क : अजा/ अज/ दिव्यांग/ माजी सैनिक उमेदवारांसाठी रु. १७५/- आणि इतर उमेदवारांसाठी रु. ८५०/-.

ऑनलाइन प्रीलिमिनरी एक्झामिनेशन ऑगस्ट २०२४ मध्ये.

हेही वाचा >>> करिअर मंत्र

ऑनलाइन मुख्य परीक्षा ऑक्टोबर २०२४ मध्ये.

निवड पद्धती : सीआर्मी ऑनलाईन परीक्षा (अ) पूर्व परीक्षा (ऑब्जेक्टिव्ह टाईप) (१) इंग्लिश लँग्वेज ३० प्रश्न, ३० गुण. (२) न्यूमरिकल अॅबिलिटी- ३५ प्रश्न, ३५ गुण. (३) रिझनिंग अॅबिलिटी ३५ प्रश्न, ३५ गुण. प्रत्येक टेस्टसाठी वेळ प्रत्येकी २० मिनिटे. एकूण ६० मिनिटे. एकूण १०० प्रश्न, एकूण १०० गुण.

पूर्व परीक्षेसाठी महाराष्ट्रातील परीक्षा केंद्र अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई/ ठाणे/ नवी मुंबई,/ MMR, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सोलापूर.

(ब) मुख्य परीक्षा (ऑब्जेक्टिव्ह टाईप) १९० प्रश्न, २०० गुण, वेळ १६० मिनिटे. ( i) जनरल/ फिनान्शियल अवेअरनेस ५० प्रश्न, ५० गुण, वेळ ३५ मिनिटे; ( ii) जनरल इंग्लिश ४० प्रश्न, ४० गुण, वेळ ३५ मिनिटे; ( iii) रिझनिंग अॅबिलिटी अँड कॉम्प्युटर अॅप्टिट्यूड – ५० प्रश्न, ६० गुण, वेळ ४५ मिनिटे; ( iv) क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड ५० प्रश्न, ५० गुण, वेळ ४५ मिनिटे.

मुख्य परीक्षेसाठी महाराष्ट्रातील परीक्षा केंद्र औरंगाबाद, मुंबई, ठाणे/ नवी मुंबई/ MMR, नागपूर, पुणे.

CRPXIII परीक्षेचे माध्यम महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी इंग्लिश, हिंदी, मराठी आणि कोंकणी असेल. प्रत्येक चुकीच्या उत्तराला प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/४ गुण वजा केले जातील.

अंतिम निवड मुख्य परीक्षेतील गुणवत्तेनुसार केली जाईल.

ऑनलाइन अर्ज www.ibps.in या संकेतस्थळावरील जाहिरातीमधील Click here to apply for CRP Clerks XIV या लिंकमधून दि. २८ जुलै २०२४ पर्यंत करावेत.

ऑनलाइन अर्जासोबत १) रंगीत फोटोग्राफ (४.५×३.५ सेंमी), (२) सिग्नेचर (स्वाक्षरी), (३) डाव्या अंगठयाची निशाणी, (४) स्वहस्ते लिहिलेले घोषणापत्र, (५) अॅपेंडिक्स-१ प्रमाणपत्र (संकेतस्थळावरील जाहिरातीमधील Clause- J( viii) मध्ये नमूद केलेले) यांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करणे आवश्यक. संकेतस्थळावरील जाहिरातीमधील Annexure- III मध्ये दिलेल्या ‘Guidelines for Scanning and Upload of Documents’ सूचनांप्रमाणे उमेदवारांचा वेबकॅम किंवा मोबाइल फोनवरून कॅप्चर केलेला फोटो अपलोड करणे आवश्यक. शंकासमाधानासाठी – https://cgrs.ibps.in/ ला लॉग इन करा.

The text for hand written declaration is as follows:- “I, ———— ( Name of the candidate), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required”