ICICI Bank Jobs In Mumbai Pune: बँकेत नोकरी हे अनेकांचे स्वप्न असते, पण आता तुमच्या या स्वप्नपूर्तीसाठी एक नामी संधी समोर आली आहे. प्रसिद्ध ICICI बँकेत रिलेशनशीप मॅनेजर या पदासाठी भरती निघाली आहे. आयसीआयसीआय बँकेच्या भारतभरातील विविध शाखांमध्ये नोकरीसाठी आपणही अर्ज करू शकता. या नोकरीसाठी पात्रता व अनुभवाचे निकष काय आहेत? कामाचे स्वरूप काय असणार? व सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्ज कसा करायचा याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेऊयात.

रिक्त पदाच्या कामाचे स्वरूप

रिलेशनशिप मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ग्राहकांच्या पसंती, बाजारातील ट्रेंड समजून घेणे आवश्यक आहे. या भूमिकेसाठी तुम्ही आयसीआयसीआय बँकेच्या सर्व टीम्स व ग्राहकांमधील दुवा म्हणून काम करणे अपेक्षित आहे. जुन्या ग्राहकांना जपून ठेवण्यासाठी आणि नवीन ग्राहकांना जोडून घेण्यासाठी आपल्याला काम करावे लागेल. तसेच जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची खात्री करण्यासाठी विक्री धोरणे तयार करणे, क्रॉस-सेलिंग हे सुद्धा कामाचा एक भाग असणार आहे.

Minor boy beaten up in shop two suspects arrested
दुकानात अल्पवयीन मुलास मारहाण, दोन संशयित ताब्यात
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Nagpur Mahanagarapalika Bharti 2025: total 245 vacancy available for these posts Nagpur Mahanagarpalika Bharti Form Apply
नागपूर महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; १ लाख २२ हजारांपर्यंत मिळणार पगार; जाणून घ्या अर्ज कसा करायचा?
epileptic attack, youth epileptic attack, Pune,
पुणे : अपघातानंतर तरुणाला अपस्माराचा झटका, पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरेंच्या तत्परतेमुळे वैद्यकीय मदत
Success Story Of Safin Hasan In Marathi
Success Story : जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेला भेट देताच मनात जागं झालं स्वप्न; यूपीएससी परीक्षेला जाताना बसला मोठा धक्का अन्…; वाचा ‘या’ आयपीएस अधिकाऱ्याची गोष्ट
buldhana vidarbha
निर्यात क्षेत्रात ‘हा’ जिल्हा पश्चिम विदर्भात अव्वल; ४६५ कोटींची निर्यात
zopu yojana audit
मुंबई : थकित भाड्याची तक्रार आल्यास आता झोपु योजनेचे ॲाडिट!
shradhha kapoor shakti kapoor
शक्ती कपूर यांनी ‘ही’ सवय सोडण्यासाठी बिग बॉसमध्ये घेतला होता सहभाग; आठवण सांगत म्हणाले, “मी श्रद्धाला सिद्ध करून…”

शैक्षणिक निकष

उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील स्पेशलायझेशनसह अग्रगण्य संस्थेकडून पदव्युत्तर/एमबीए पदवी असणे आवश्यक आहे. किंवा रिलेशनशिप मॅनेजमेंटमधील अनुभवासह पदवी असल्यासही पात्र मानले जाईल.

अनुभव

रिलेशनशिप मॅनेजरला विक्री आणि रिलेशनशिप मॅनेजमेंट क्षेत्रातील 0-5 वर्षांचा अनुभव असावा. बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा (BFSI) मधील रिलेशनशिप मॅनेजमेंटमधील अनुभवास प्राधान्य दिले जाईल.
क्रॉस-फंक्शनल संघांमध्ये काम करण्याची क्षमता असावी.
संवाद कौशल्य (तोंडी आणि लेखी ).
शिकण्याची तयारी

हे ही वाचा<< १२ वी नंतर भारतीय वायुसेनेत करिअरची संधी; अर्ज व निवडप्रक्रिया जाणून घेण्यासाठी करा क्लिक

अर्ज कसा कराल?

आयसीआयसीआय बँकेतील नोकरीविषयी Linkedin तसेच Naukari.com च्या माध्यमातून पोस्ट करण्यात आल्या आहेत. आपण इथे क्लिक करून पुरून जाहिरात पाहू शकता.

Story img Loader