Bank of Baroda Apprentice Recruitment 2025: बँकेतील नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदाने अप्रेंटिस पदांच्या तब्बल ४००० जागांवर भरती जाहीर केली आहे. या पदासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आजपासून म्हणजे १९ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू झाली आहे, उमेदवार बँक ऑफ बडोदाच्या https://www.bankofbaroda.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. पण, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतन याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणे गरजेचे आहे.
बँक ऑफ बडोदामधील भरतीसंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून अप्रेंटिस पदाच्या ४००० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ मार्च २०२५ ही आहे.
शैक्षणिक
बँक ऑफ बडोदामधील या जागांसाठी अर्ज करणार्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी प्राप्त केलेली असावी.
वयोमर्यादा
बँक ऑफ बडोदामधील अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १ फेब्रुवारी २०२५ पर्यंत २० ते २८ वर्षांदरम्यान असावे. यात एसटी आणि एससी वर्गातील उमेदवारांना ५ वर्षांची, तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ३ वर्षांची सूट देण्यात आली आहे.
नोकरीचे ठिकाण
या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण देशभर कुठेही पोस्टिंग मिळू शकते.
अर्ज शुल्क
जनरल/ओबीसी/ ईडब्ल्यूएस – ८०० रुपये
एसी/ एसटी- ६०० रुपये
पीडब्ल्यूडी – ४०० रुपये
वेतन
या पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या आणि निवड होऊन नोकरीवर रुजू होणाऱ्या अप्रेंटिस उमेदवारला १२००० ते १५००० पर्यंत वेतन दिले जाईल.
कसा कराल अर्ज
१) भरती प्रक्रियेअंतर्गत, उमेदवारांना पात्र असल्यास, प्रथम भारत सरकारच्या अप्रेंटिसशिप पोर्टलवर म्हणजेच NATS पोर्टल https://nats.education.gov.in (“स्टुडेंट रजिस्टर/लॉगिन” सेक्शनवर जा) जावे लागेल.
२) यानंतर NAPS पोर्टल https://www.apprenticeshipindia.gov.in वर नोंदणी करणे अनिवार्य असेल.
४) NAPS पोर्टलवर नोंदणीकृत असलेल्यांना https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity वर जावे लागेल आणि “Search By Establishment Name” सेक्शनमध्ये “Bank of Baroda” टाइप करावे लागेल.