Bank of Baroda Recruitment 2023: बँकेत नोकरीची संधी शोधत आहात? मग तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये रिलेशनशिप मॅनेजर, फॉरेक्स एक्विजिशन तसेच रिलेशनशिप मॅनेजर आणि केडिट अॅनॅलिस्टच्या विविध पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज केला नाही ते बँक ऑफ बडोदाच्याच्या अधिकृत संकेतस्थळ bankofbaroda.in भेट देऊन रिक्त जागांसाठी अर्ज करू शकता.
बँक ऑफ बडोदाद्वारे जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार, या भरतींतर्गत अभियानाच्या माध्यमातून विविध पदांवर एकूण १५७ पदांवर भरती केली जाणार आहे. पात्र उमेदवार १७ मे २०२३ पर्यंत किंवा त्याआधी अर्ज करु शकतो. अधिक महितीसाठी भरतीची अधिसुचना पाहा.
बँक ऑफ बडोदा भरती २०२३ प्रक्रियेची अधिसुचना
- रिलेशनशिप मॅनेजर स्केल IV २० पदे
- रिलेशनशिप मॅनेजर स्केल III: ४६ पदे
- केडिट अॅनॅलिस्ट स्केल III: ६८ पदे
- केडिट अॅनॅलिस्ट स्केल III: ०६ पदे
- फॉरेक्स एक्विजिशन आणि रिलेशनशिप मॅनेजर स्केल II: १२ पदे
- फॉरेक्स एक्विजिशन आणि रिलेशनशिप मॅनेजर र स्केल III: ०५ पदे
- एकूण पदांची संख्या – १५७ पदे
हेही वाचा – भारतीय समुद्री विश्वविद्यालयात नोकरीची संधी! ‘या’ पदासाठी होणार भरती, जाणून घ्या पात्रता निकष
बँक ऑफ बडोदा भरती २०२३ : कोण पाठवू शकते अर्ज
मान्यता प्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालायातून संबधित विषयासह कमीत कमी पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतो. याशिवाय संबंधित क्षेत्रातील अनुभव देखील मागितला आहे. वयोमर्यादेबाबत सांगायचे झाल्यास १ एप्रिल २०२३पर्यंत उमेदवाराचे वय कमीत कमी २५ वर्ष असावे आणि जास्त जास्त ४५ वर्ष असावे. पदानुसार शैक्षणिक पात्रता, कामाचा अनुभव आणि वयोमर्यादेबाबत अधिक जाणून घेण्यासाठी अधिसुचना पाहू शकता.
बँक ऑफ बडोदा भरती २०२३ अधिसूचना – https://www.bankofbaroda.in/-/media/Project/BOB/CountryWebsites/India/Career/23-04/notification-dated-27-04-2023-re-opening-of-application-26-17.pdf
बँक ऑफ बडोदा भरती २०२३: किती मिळेल पगार
- MMGS II: ४८१७० x १७४० (१) – ४९९१० x १९९० (१०) – ६९१८० रुपये
- MMGS III: ६३८४० x १९९० (५) – ७३७९० x २२२० (२) – ७८२३० रुपये
- SMG/S-IV: ७६०१० x २२२० (४) – ८४८९० x २५०० (२) – ८९८९० रुपये
बँक ऑफ बडोदा भरती २०२३ : जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया?
- सर्वात आधी बँक ऑफ बडोदाच्या ‘Current Opportunities’ अधिकृत संकेतस्थळाला भेट bankofbaroda.in द्या.
२. होम पेजवर करिअर टॅबमध्ये ‘Current Opportunities’ लिंक वर क्लिक करा.
३. येथे ‘Specialist Officers for Corporate & Institutional Credit Dept. on Regular basis’ लिंकवर क्लिक करा आणि ‘Apply Now’ वर क्लिक करा.
४. अर्जाचा फॉर्म भरा आणि महत्त्वाचे कागदपत्र जोडा आणि शुल्क जमा करा
५. आपला फॉर्म जमा झाल्यावर, पुढील कन्फर्मेशन पेज डाउनलोड करा आणि प्रिंट काढून घ्या.