Bank of Baroda Jobs 2024 : तुम्ही बँकेत नोकरीच्या शोधात असाल तर, तुमच्यासाठी नामी संधी चालून आली आहे. बँक ऑफ बडोदामध्ये बंपर भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत फायनान्स, एमएसएमई बँकिंग, डिजिटल अशा विविध बँकिंग क्षेत्रात काम करण्यासाठी ५९२ पदांची भरती प्रक्रिया सुरु केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल करावा. इच्छुक आणि पात्र उमेदवार bankofbaroda.in या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात.
Bank of Baroda Jobs 2024 : भरतीसंबंधित महत्त्वाच्या तारखा
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : ३० ऑक्टोबर २०२४
अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : १९ नोव्हेंबर २०२४
Bank of Baroda Jobs 2024 : वयोमर्यादा
अधिकृत अधिसूचनेनुसार, अर्जदारांची वयोमर्यादा २२ ते ४५ वर्षांच्या दरम्यान आहे. याव्यतिरिक्त, सेवानिवृत्त बँक कर्मचारी आणि तरुण उमेदवारांसाठी वयोमर्यादा ६५ वर्षांपेक्षा जास्त नसावी.
Bank of Baroda Jobs २०२४: आवश्यक शैक्षणिक पात्रता
बिझनेस फायनान्स मॅनेजर पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे सीए किंवा एमबीए पदवी असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर एमएसएमई रिलेशनशिप मॅनेजर पदांसाठी अर्जदाराकडे कोणत्याही शाखेची पदवी असणे आवश्यक आहे.
रिक्त पदांचा तपशील
फायनान्समध्ये १ पद असून एमएसएमई बँकिंगमध्ये १४० पदे , डिजिटल ग्रुपमध्ये १३९ पदे, रिसिप्ट मॅनेजमेंटमध्ये २०२ पदे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये ३२ आणि कॉर्पोरेट आणि इन्स्टिट्यूशनल लोनमध्ये ७९ पदांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त मॅनेजर, असिस्टंट व्हाईसप्रेसिडेंट, रिलेशनशिप मॅनेजर, प्रॉडक्ट हेड अशी अनेक पदांवर भरती करण्यात येणार आहे.
निवड प्रक्रिया
या सर्व पदांसाठी अर्जदारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे. तसेच शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. बँकेकडून अद्याप मुलाखतीची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.
अर्ज शुल्क
जनरल, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ६०० रुपये भरावे लागणार आहेत. तर एससी, एसटी, पीडब्ल्यूडी आणि महिला उमेदवारांना १०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.
बँक ऑफ बडोदा भर्ती २०२४ साठी ऑनलाइन अर्ज कसा कराल?
१. bankofbaroda.in वर बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
२. मुख्यपृष्ठावर, “ऑनलाइन अर्ज करा” लिंकवर क्लिक करा.
३. अर्जातील सर्व आवश्यक फील्ड पूर्ण करा.
४. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि फॉर्म सबमिट करा.
५. अर्ज सबमिट करा.
६. अर्ज डाऊनलोड करून प्रिंट काढा.