Bank of Baroda Jobs 2024 : तुम्ही बँकेत नोकरीच्या शोधात असाल तर, तुमच्यासाठी नामी संधी चालून आली आहे. बँक ऑफ बडोदामध्ये बंपर भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत पर्यवेक्षक पदासाठी भरती करण्यात येईल. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल करावा. इच्छुक आणि पात्र उमेदवार bankofbaroda.in या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात. बँक ऑफ बडोदाने पर्यवेक्षकांच्या पदासाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत, अर्जाची प्रक्रिया आता सुरु झाली असून उमेदवार त्यांचे अर्ज ११ ऑक्टोबरपर्यंत सबमिट करू शकतात.

Bank of Baroda Jobs 2024 : भरतीसंबंधित महत्त्वाच्या तारखा

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : २७ सप्टेंबर २०२४

अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : ११ ऑक्टोबर 2024

Bank of Baroda Jobs 2024 : वयोमर्यादा

अधिकृत अधिसूचनेनुसार, अर्जदारांची वयोमर्यादा २१ ते ४५ वर्षांच्या दरम्यान आहे. याव्यतिरिक्त, सेवानिवृत्त बँक कर्मचारी आणि तरुण उमेदवारांसाठी वयोमर्यादा ६५ वर्षांपेक्षा जास्त नसावी.

Bank of Baroda Jobs 2024 : आवश्यक शैक्षणिक पात्रता

या भरती मोहिमेसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर असणे आवश्यक आहे. पात्रतेशी संबंधित अधिक तपशीलांसाठी, उमेदवार अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची परीक्षा ही द्यावी लागणार नाहीये. या भरती प्रक्रियेतील निवड थेट वैयक्तिक मुलाखतीतील कामगिरीवर आधारित केली जाईल. मुलाखतीनंतर शॉर्टलिस्ट करून उमेदवारांच्या नावाची लिस्ट प्रसिद्ध केली जाईल. ११ ऑक्टोबर २०२४ ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्याच्या अगोदरच अर्ज करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती आपल्याला साईटवर मिळेल.

Bank of Baroda Jobs 2024 : अर्ज दाखल करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.

स्टेप १ : बँक ऑफ बडोदामध्ये भरतीसाठी अर्ज करण्यासाठी सर्वात आधी bankofbaroda.in या वेबसाईटवर जा.
स्टेप २ : आता भरतीसाठीच्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप ३ : यानंतर उमेदवारासंबंधित सर्व माहिती भरा.
स्टेप ४ : यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
स्टेप ५ : अर्ज शुल्क भरा.
स्टेप ६ : अर्ज सबमिट करा.
स्टेप ७ : अर्ज डाऊनलोड करून प्रिंट काढा.

हेही वाचा >> रेल्वे भरतीमध्ये २३,७२३ जागा घटल्या; अवघ्या ११,५८८ पदांसाठी भरती, उमेदवारांनी निराशा केली व्यक्त

भरती प्रक्रियेचा अर्ज आणि काही महत्वाची कागदपत्रे ही आपल्याला प्रादेशिक व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा, साबरकांठा क्षेत्रीय कार्यालय, दुसरा मजला, शामलाजी हायवे रोड, सहकारी जिन, हिम्मतनगर-३८३००१ येथे पाठवावे लागतील. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना ही अगोदर व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.