Banking Jobs: बँकिंगमध्ये करिअर शोधत आहात? तुमच्या पात्रतेनुसार इंडियन बँक ते बँक ऑफ इंडिया (BOI) पर्यंत तीन आघाडीच्या बँकांनी ७०० हुन अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया घोषित केली आहे. बँकेतील जॉब्ससाठी नोंदणी प्रक्रियेसह नोकरीच्या संधींची यादी आम्ही आज आपल्याला देत आहोत. अर्जासाठी महत्त्वाच्या तारखा, रिक्त जागा, अधिकृत वेबसाइट आणि इतर तपशील तपासून आपणही आपल्या बँकेतील नोकरीचे करिअर सुरु करू शकता.
इंडियन बँक जॉब्स
इंडियन बँकेने स्पेशालिस्ट ऑफिसरच्या पदांसाठी भरती प्रक्रिया घोषित केली आहे. पात्र उमेदवार भारतीय बँकेच्या अधिकृत वेबसाइट indianbank.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. नोंदणी प्रक्रिया १६ फेब्रुवारीपासून सुरू झाली असून २८ फेब्रुवारी २०२३ रोजी संपेल. या भरती मोहिमेद्वारे एकूण २२० रिक्त पदे भरली जातील. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी आहे. भरती प्रक्रियेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, येथे दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
पदाचे नाव: विशेषज्ञ अधिकारी (स्पेशालिस्ट ऑफिसर)
अधिकृत वेबसाइट: indianbank.in
अंतिम मुदत: २८ फेब्रुवारी २०२३
IDBI बँक जॉब्स
IDBI बँक लिमिटेड ने एक भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे, ज्यामध्ये उमेदवारांना स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर्स पदासाठी अर्ज करता येणार आहे. पात्र उमेदवार IDBI च्या अधिकृत वेबसाइट idbibank.in वर जाऊन अर्ज करू शकतात. २१ फेब्रुवारीपासून नोंदणी प्रक्रिया सुरू होईल. अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३ मार्च २०२३ आहे. या भरती मोहिमेद्वारे एकूण ७५ रिक्त पदे भरली जातील. भरती प्रक्रियेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, येथे दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
पदाचे नाव: विशेषज्ञ संवर्ग अधिकारी (स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर्स)
अधिकृत वेबसाइट: idbibank.in
अंतिम मुदत: ३ मार्च २०२३
बँक ऑफ इंडिया पीओ जॉब्स 2023
बँक ऑफ इंडिया (BOI) ने प्रोबेशनरी ऑफिसरच्या पदासाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवार bankofindia.co.in या बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज भरण्याची अंतिम तारीख २५ फेब्रुवारी २०२३ आहे. या भरती मोहिमेद्वारे एकूण ५०० रिक्त पदे भरली जातील. भरती प्रक्रियेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, येथे दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
हे ही वाचा<< ठाणे महानगरपालिकेत नोकरीची मोठी संधी! मुलाखत घेऊन होणार निवड, अर्जासाठी इथे क्लिक करा
पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर
अधिकृत वेबसाइट: bankofindia.co.in.
अंतिम मुदत: २५ फेब्रुवारी २०२३