Bank Of Maharashtra Recruitment 2023: बँक ऑफ महाराष्ट्रने २०२३ -२०२४ या वर्षासाठी श्रेणी II आणि III मध्ये विशेषज्ञ अधिका-यांसाठी नोंदणी सुरू केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकृत वेबसाइट bankofmaharashtra.in वर अर्जाची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार ६ फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरू शकतात. उमेदवारांना या पदासाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना तपासण्याचा सल्ला दिला जातो. या सूचना आपण सविस्तर जाणून घेऊयात..
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये किती जागा रिक्त आहेत?
बँक ऑफ महाराष्ट्रच्या भरतीत मुख्यतः श्रेणी II आणि III मध्ये २२५ विशेषज्ञ अधिकारी पदे भरली जाणार आहे. खाली दिलेल्या पात्रता निकषांना पूर्ण करण्यासाठी आपण ६ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करू शकता.
शैक्षणिक पात्रता:
उमेदवाराने अर्थशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण विद्यापीठातील सर्व सेमेस्टर/वर्षांच्या एकूण किमान ६०% गुणांसह पूर्ण केलेने असावे.
भारत सरकार किंवा तिच्या नियामक संस्थांद्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून शिक्षण पूर्ण केलेले असावे.
वयोमर्यादा:
भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा किमान २५ वर्षे आणि कमाल ३८ वर्षे असावी.
अर्ज फी:
UR/EWS/OBC श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क १००० रुपये असणार आहे. SC/ST/PwBD श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क १०० रुपये आहे. उमेदवार डेबिट कार्ड आणि नेट बँकिंगद्वारे अर्ज शुल्क जमा करू शकतात.
निवड प्रक्रिया:
उमेदवारांची अंतिम निवड ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतीच्या एकत्रित गुणांवर आधारित असेल.
हे ही वाचा<< Job Alert: गुप्तचर विभागात १० वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची मोठी संधी, भरती कधी आणि कशी होणार ? जाणून घ्या
बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2023: अर्ज कसा करावा?
- bankofmaharashtra.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- ‘करिअर’ टॅबवर क्लिक करा.
- ‘श्रेणी II आणि III प्रकल्प 2023-2024 मधील विशेषज्ञ अधिकारी’ अंतर्गत ‘नोंदणी’ पर्यायावर क्लिक करा.
- नोंदणी करा
- पोस्ट निवडा, अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज फी भरा आणि सबमिट करा.
- अर्जाची प्रिंटआउट घ्या.