Bank of Maharashtra Recruitment 2024 : बँकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत ६०० रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. चला तर मग या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया जाणून घेऊयात.

महत्त्वाच्या तारखा

Ratan Tata Pet Dog came to pay him last tribute
मुक्या प्राण्याची माया! रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांचा पाळीव श्वान उपाशी, अंत्यदर्शनाचा भावुक करणारा Video
14th October Rashi Bhavishya In Marathi
१४ ऑक्टोबर पंचांग: इच्छापूर्ती की जिद्द-चिकाटी? पंचांगानुसार आज…
Bigg Boss Marathi Winner Suraj Chavan
Bigg Boss Marathi Winner : ‘गुलीगत धोका’ म्हणत सूरज चव्हाण ठरला पाचव्या पर्वाचा महाविजेता!
aarya jadhao first post after Elimination
Bigg Boss Marathi तून बाहेर पडल्यावर आर्या जाधवची पहिली पोस्ट; नेटकरी म्हणाले, “निक्कीला…”
pravin tarde Post for Suraj Chavan bigg boss marathi 5
सूरज चव्हाणने Bigg Boss Marathi 5 जिंकल्यावर प्रवीण तरडेंची दोन वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले…
aarti solanki reaction after suraj chavan won bigg boss marathi
“गरीब सूरजला जिंकवून माझ्यावर अन्याय”, मराठी अभिनेत्रीचं मोठं विधान; भावुक होत म्हणाली, “२४ वर्षांपासून या इंडस्ट्रीत…”
Govinda Hospitalized after Shooting Himself Accidently
अभिनेता गोविंदाला स्वतःच्याच बंदुकीतून लागली गोळी, पत्नीने दिली प्रकृतीबद्दल माहिती
bigg boss marathi riteish deshmukh gave special gift to suraj chavan
रितेश भाऊंचा फुल्ल सपोर्ट! सूरज चव्हाणची भविष्यात आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय; दिली ‘ही’ खास भेट

अर्ज करण्याआधी अधिसूचना वाचून घेण्याचे आवाहन बँक ऑफ महाराष्ट्र द्वारे करण्यात आले आहे. १४ ऑक्टोबर २०२४ रोजी, या भरतीसाच्या अर्ज प्रक्रियेस सुरुवात केली जाणार आहे.या भरतीमध्ये अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना २४ ऑक्टोबर २०२४ तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहे. या तारखेनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाही. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी Bankofmaharashtra.in या अधिकृत संकेस्थळाला भेट द्या. तसेच जाहीर अधिकृत अधिसूचनेचा आढावा घेण्यासाठी उमेदवारांनी याच लिंकवर जावे. ११ ऑक्टोबरला अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

पात्रता

ज्या तरुणांचे नुकतेच शिक्षण पूर्ण झाले आहे आणि त्यांना कामाचा अनुभव घ्यायचा आहे त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी प्राप्त केलेली असावी. तसेच त्या व्यक्तीला त्याच राज्याच्या/केंद्रशाशित प्रदेशातील स्थानिक भाषा यायला हवी.या नोकरीसाठी २० ते २८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोगटात सूट दिली गेली आहे.याबाबत सर्व माहिती तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन घेऊ शकतात.

अर्ज शुल्क

बँक ऑफ महाराष्ट्रमधील या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला १५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.बँक ऑफ इंडियातील या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ९००० रुपयांची स्टायपेंड दिली जाणार आहे. त्याचसोबत त्यांना ट्रेनिंगदेखील दिले जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

हेही वाचा >> Government Job: हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी; महिना १,६१,००० रुपये पगार; पात्रता काय? जाणून घ्या

उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याआधी अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावा.एकदा जमा केलेले अर्ज मागे घेण्याची परवानगी दिली जाणार नाही आणि एकदा भरलेले शुल्क परत केले जाणार नाही. अधिक संबंधित तपशीलांसाठी उमेदवार बँक ऑफ महाराष्ट्रची अधिकृत वेबसाइट पाहू शकतात.