Bank of Maharashtra Recruitment 2025: बँकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत २२ रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. चला तर मग या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया जाणून घेऊयात.उमेदवार अधिकृत वेबसाइट bankofmaharashtra.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मार्च २०२५ आहे.

अधिकृत अधिसूचनेत असे म्हटले आहे की, “उमेदवारांनी सेवेत सातत्य राखावे. जर नंतर कामात कोणत्याही प्रकारची तक्रार आढळली तर उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाईल. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी पात्रतेच्या तारखेनुसार पदासाठी पात्रता निकष पूर्ण केले आहेत याची खात्री करावी अशी विनंती केली आहे. अपूर्ण अर्ज नाकारले जाऊ शकतात त्यामुळे उमेदवारांना तपशील पाहण्यासाठी बँकेची वेबसाइट तपासण्याचा सल्ला देण्यात येतो.

शैक्षणिक पात्रता

  • १०वी प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका
  • १२वी प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका
  • डिप्लोमा प्रमाणपत्र आणि सेमिस्टर/वर्षनिहाय गुणपत्रिका, जिथे लागू असेल तिथे
  • पदवी प्रमाणपत्रासह पदवी सत्र/वर्षनिहाय गुणपत्रिका
  • पदवी प्रमाणपत्रासह पदव्युत्तर पदवी सत्र/वर्षनिहाय गुणपत्रिका
  • पदवी प्रमाणपत्रासह पदव्युत्तर पदवी
  • व्यावसायिक पदवी: पदवी प्रमाणपत्रासह सेमिस्टर/वर्षनिहाय गुणपत्रिका
  • पात्रता निकषांमध्ये नमूद केल्याप्रमाणे अतिरिक्त प्रमाणपत्रे

रिक्त पदे

  • महाव्यवस्थापक – आयबीयू (स्केल VII)
  • उपमहाव्यवस्थापक – आयबीयू (स्केल VI)
  • सहाय्यक महाव्यवस्थापक (स्केल V)
  • सहाय्यक महाव्यवस्थापक – ट्रेझरी (स्केल V)
  • सहाय्यक महाव्यवस्थापक – अनुपालन/जोखीम व्यवस्थापन (स्केल V)
  • सहाय्यक महाव्यवस्थापक – क्रेडिट (स्केल V)
  • मुख्य व्यवस्थापक – फॉरेक्स/क्रेडिट/ट्रेड फायनान्स (स्केल IV)
  • मुख्य व्यवस्थापक – अनुपालन/जोखीम व्यवस्थापन (स्केल IV)
  • मुख्य व्यवस्थापक – कायदेशीर (स्केल IV)
  • वरिष्ठ व्यवस्थापक – व्यवसाय विकास (स्केल III)
  • वरिष्ठ व्यवस्थापक – बॅक ऑफिस ऑपरेशन्स (स्केल III)

वेतन

  • स्केल VII: रु. १५६५०० ते रु. १७३८६०
  • स्केल VI: रु. १४०५०० ते रु. १५६५००
  • स्केल V: रु. १२०९४० ते रु. १३५०२०
  • स्केल IV: रु. १०२३०० ते रु. १२०९४०
  • स्केल III: रु. ८५९२० ते रु. १०५२८०

अर्ज शुल्क

युआर/ईडब्ल्यूएस/ओबीसी: रु. ११८०
एससी/एसटी/पीडब्ल्यूडी: रु.११८

Bank of Maharashtra Recruitment 2025: अर्ज कसा करावा?

  • अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  • भर्ती लिंकवर क्लिक करा आणि स्वतःची नोंदणी करा
  • अर्ज भरा
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज फी भरा
  • फॉर्म सबमिट करा.

उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याआधी अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावा.एकदा जमा केलेले अर्ज मागे घेण्याची परवानगी दिली जाणार नाही आणि एकदा भरलेले शुल्क परत केले जाणार नाही. अधिक संबंधित तपशीलांसाठी उमेदवार बँक ऑफ महाराष्ट्रची अधिकृत वेबसाइट पाहू शकतात.

Story img Loader