BDL Recruitment 2023: संरक्षण मंत्रालयाच्या भारत डायनामिक्स लिमिटेडमध्ये भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर केले आहे. त्यानुसार संस्थेत १२ पदांवर भरती होणार आहे. ज्यासाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट bdl-india.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या मोहिमेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 जुलै 2023 आहे. तर 27 जुलै ही हार्ड कॉपी जमा करण्याची शेवटची तारीख आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

BDL Vacancy 2023: रिक्त पदांचा तपशील:

या मोहिमेद्वारे एकूण १२ पदे भरली जातील. ज्यामध्ये डेप्युटी मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर इत्यादी पदांचा समावेश आहे.

हेही वाचा – Railway Recruitment 2023 : रेल्वेमध्ये ‘या’ पदांसाठी निघाली भरती; ३० जूनपर्यंत करू शकता अर्ज

BDL Vacancy 2023: पात्रता :

उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेकडून संबंधित लेखक ग्रॅज्युएट / पोस्ट ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग आणि अन्य पात्रता आणि कार्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी उम्मेदवारांचे जास्तीत जास्त वय २८/३५ वर्ष निश्चित केले आहे.

BDL Vacancy 2023: वेतन:

या पदावर निवड केलेल्या उमेदवारांना ४०,००० रुपयांपासून १,६०,००० रुपये प्रतिमहिना वेतन दिले जाईल.

अधिकृत भरती – https://bdl-india.in/sites/default/files/2023-06/D%26E%20Recruitment%20Adv.pdf

हेही वाचा – SBI मध्ये होणार भरती! ‘इतका’ मिळेल पगार; परीक्षेशिवाय होईल निवड, फक्त ‘हे’ उमेदवार करू शकतात अर्ज

BDL Vacancy 2023: अशी होईल निवड :

या पदांवर अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारावर केली जाईल.

BDL Vacancy 2023: आवेदन शुल्क:

भरती अर्ज करण्यासाठी ५०० रुपये निश्चित केले गेले.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bdl recruitment 2023 for 12 vacancies monthly salary up to 160000 deputy manager and assistant manager snk