BEL Bharti 2023: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत, प्रकल्प अभियंता-I आणि प्रशिक्षणार्थी अभियंता-I या पदांच्या एकुण ४२८ रिक्त जागा भरण्यासाठीची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ मे २०२३ आहे. भरतीबाबतच्या सविस्तर माहितीसाठी http://www.bel-india.in या अधिकृत बेवसाईटला अवश्य भेट द्या. तसेच भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्जाची फी याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती २०२३ –
पदाचे नाव – प्रकल्प अभियंता-I, प्रशिक्षणार्थी अभियंता-I
एकूण पदांची संख्या – ४२८
प्रकल्प अभियंता-I पदासाठी – ३२७ जागा.
प्रशिक्षणार्थी अभियंता-I पदासाठी – १०१ जागा.
शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. त्यासाठी https://drive.google.com/file/d/12D4h3QXcYzbIwltzpmR9Qosbv8ROPW_-/view या लिकंवरील मूळ जाहिरात पाहावी..
वयोमर्यादा –
प्रकल्प अभियंता-I – ३२ वर्षापर्यंत.
प्रशिक्षणार्थी अभियंता-I -२८ वर्षापर्यंत.
अर्ज शुल्क –
प्रकल्प अभियंता-I – ४०० रुपये + १८% GST
प्रशिक्षणार्थी अभियंता-I – १५० रुपये +१८% GST
अर्ज करण्याची पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ मे २०२३
पगार –
प्रकल्प अभियंता-I पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना प्रतिमहिना ४० हजार ते ५५ हजारांपर्यंत पगार मिळणार आहे.
प्रशिक्षणार्थी अभियंता-I या पदासाठी निवडलेल्या उमेदवाराला ३० ते ४० हजारांपर्यंत पगार मिळणार आहे.