BEL Pune Bharti 2023 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) पुणे अंतर्गत ‘व्यवस्थापक, उपव्यवस्थापक’ पदांसाठी मागवले अर्ज. या प्रक्रियंतर्गत एकूण ०३ रिक्त जागाचा भरती केली जाणार आहे. पात्र उमेदवार अर्ज ऑफलाईन पद्धतीने करु शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ जून २०२३ आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या प्रक्रियंतर्गत व्यवस्थापक पदांसाठी २ रिक्त पदे आणि उपव्यवस्थापक पदासाठी एका पदाची भरती केली जाणार आहे. उमेदवाराची निवड पिंपरी-चिंचवड/पुणे येथे मुलाखतीद्वारे केली जाईल

वयोमर्यादा

व्यवस्थापक पदासाठी वयोमर्यादा ४५ वर्षे आहे तर उपव्यवस्थापक पदासाठी ३५ वर्षे आहे.

हेही वाचा – RBI Recruitment 2023: रिझर्व्ह बँकेत अधिकारी होण्याची संधी, २९१ पदांसाठी होणार भरती, असा भरा अर्ज

शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. व्यवस्थापक पदासाठी पात्र उमेदवार UGC मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून संबंधित क्षेत्रात B.E./B.TECH पदवीधर असला पाहिजे. तर उपव्यवस्थापक पदासाठी पात्र उमेदवार B.E./ B.TECH (एरोनॉटिकल अभियांत्रिकी)पदवीधर असला पहिजे.

हेही वाचा- इंडियन ऑईलमध्ये नोकरीची मोठी संधी! ‘या’ ६५ जागांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता निकष, अर्जाची प्रक्रिया

निवड प्रक्रिया

  • उमेदवाराची निवड पुणे येथे लेखी चाचणी व मुलाखतीद्वारे होईल.
  • मुलाखतीसाठी केवळ त्याच उमेदवारांना बोलावले जाईल ज्यांची लेखी परीक्षेनंतर होईल.
  • अर्जामध्ये प्रविष्ट केलेल्या वैध ई-मेल आयडीवर नंतर लेखी परीक्षा/मुलाखतीचे ठिकाण सूचित केले जाईल.
  • लेखी चाचणी/मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला मिळणार नाही.
  • लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र/मुलाखतीसाठी कॉल पोस्टाने पाठवले जाणार नाही हे लक्षात घ्या.

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने अर्ज कसा करावा

  • इच्छुक उमेदवाराने https://belop-india.in/careers.html या वेबसाइटला भेट देऊ उपलब्ध अर्जाचे स्वरूप डाउनलोड करावे.
  • दिलेल्या संबंधित पत्त्यावर उमेदवारांनी अर्ज पाठवावा.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापुर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ जून २०२३ आहे हे उमेदवारांनी लक्षात ठेवावे
  • या तारखेनंतर प्राप्त झालेला अर्ज आणि/किंवा अपूर्ण अर्ज स्विकारला जाणार नाही
  • BELOP कोणत्याही पोस्टल/कुरियर विलंबासाठी जबाबदार नाही.

    हेही वाचा – SSC CHSL Notification 2023: सीएचएसएल भरती प्रक्रियेतंर्गत १६०० पदांवर होणार भरती, जाणून घ्या पात्रता निकष

पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपविभागीय डॉ. व्यवस्थापक –एचआर बीईएल ऑप्टोनिक डिव्हाइसेस लिमिटेड, ईएल-३०,’जे’ ब्लॉक, भोसरी औद्योगिक क्षेत्र, पुणे- ४११०२

अधिकृत वेबसाईट – bel-india.in

अर्जाची प्रत डाऊनलोड करण्यासाठी – https://bel-india.in/Documentviews.aspx?fileName=Detailed%20Advt%20-%20Fixed%20Term%20Engineers%20for%20Aviation%20Hoses%20Project-9-5-23.pdf

अधिक माहिती PDF जाहिरात – https://drive.google.com/file/d/1ZyR6-h38IekqtPc93piH26BWS4aYzXQC/viewhttps://bel-india.in/

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bel pune bharti 2023 belop requires the 2 manager and 1 deputy manager know eligibility salary details snk
First published on: 11-05-2023 at 11:27 IST