BEL Recruitment 2023: भारत इलेक्टॉनिक्स लिमिटेडमध्ये प्रोजेक्ट इंजिनिअरमध्ये पदांवर भरती निघाली आहे. BEL ने वॉटर फ्रंट सपोर्ट स्थानांवर प्रकल्प अभियंता-I पदाच्या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. कंत्राटी पद्धतीने ही भरती करण्यात येत आहे. बीईएल भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार BELच्या अधिकृत वेबसाइट bel-india.in वर १५ ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकतात. BE किंवा B.Tech किंवा B.Sc अभियांत्रिकी पदवी असलेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात.
मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन किंवा टेलिकम्युनिकेशनमध्ये बीई किंवा बीटेक किंवा बीएससी अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक
प्रोजेक्ट इंजिनियर -१ (मेकॅनिकल)
BE किंवा B.Tech किंवा B.Sc इंजिनिअर पदवी मेकॅनिकल शाखेतून उतीर्ण असावा.
हेही वाचा – RITES मध्ये निघाली १११ पदांची भरती, अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घ्या
BEL Recruitment 2023: वयोमर्यादा
उमेदवाराचे वय १ ऑगस्ट २०२३ रोजी ३२ वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव वर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
अधिसुचना – https://bel-india.in/Documentviews.aspx?fileName=01.%20DETAILED%20WEBSITE%20ADVT%20ENGLISH-26-07-23.pdf
BEL Recruitment 2023: निवड प्रक्रिया
तात्पुरत्या आधारावर प्रकल्प अभियंत्यांच्या एकूण २७ रिक्त जागा भरण्याचे या भरती मोहिमेचे उद्दिष्ट आहे. या भरतीसाठी BEL वॉक-इन इंटरव्ह्यू घेण्यात येईल. BEL द्वारे दिलेल्या लिंकचा वापर करून उमेदवारांना मुलाखतीसाठी नोंदणी करावी लागेल.
हेही वाचा – नेटफ्लिक्स देणार नोकरीची संधी! ‘या’ कामासाठी मिळेल साडे सात कोटी रुपये वार्षिक पगार!
बीईएल प्रकल्प अभियंता भरतीसाठी अर्ज कसा करावा?
- bel-india.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
- होमपेजवर, ‘करिअर’ टॅबवर क्लिक करा आणि भरती-जाहिरात निवडा.
- वॉटर फ्रंट सपोर्ट पोझिशन्ससाठी प्रकल्प अभियंत्यांच्या भरती अधिसूचनेवर क्लिक करा.
- आता ‘गुगल फॉर्म लिंक’ वर क्लिक करा.
- फॉर्म भरा, कागदपत्रे अपलोड करा आणि फी भरा.
- डाउनलोड करा आणि प्रिंटआउट घ्या.