BEL Recruitment 2023: भारत इलेक्टॉनिक्स लिमिटेडमध्ये प्रोजेक्ट इंजिनिअरमध्ये पदांवर भरती निघाली आहे. BEL ने वॉटर फ्रंट सपोर्ट स्थानांवर प्रकल्प अभियंता-I पदाच्या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. कंत्राटी पद्धतीने ही भरती करण्यात येत आहे. बीईएल भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार BELच्या अधिकृत वेबसाइट bel-india.in वर १५ ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकतात. BE किंवा B.Tech किंवा B.Sc अभियांत्रिकी पदवी असलेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन किंवा टेलिकम्युनिकेशनमध्ये बीई किंवा बीटेक किंवा बीएससी अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक

प्रोजेक्ट इंजिनियर -१ (मेकॅनिकल)
BE किंवा B.Tech किंवा B.Sc इंजिनिअर पदवी मेकॅनिकल शाखेतून उतीर्ण असावा.

हेही वाचा – RITES मध्ये निघाली १११ पदांची भरती, अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घ्या

BEL Recruitment 2023: वयोमर्यादा
उमेदवाराचे वय १ ऑगस्ट २०२३ रोजी ३२ वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव वर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट दिली जाईल.

अधिसुचना – https://bel-india.in/Documentviews.aspx?fileName=01.%20DETAILED%20WEBSITE%20ADVT%20ENGLISH-26-07-23.pdf

BEL Recruitment 2023: निवड प्रक्रिया
तात्पुरत्या आधारावर प्रकल्प अभियंत्यांच्या एकूण २७ रिक्त जागा भरण्याचे या भरती मोहिमेचे उद्दिष्ट आहे. या भरतीसाठी BEL वॉक-इन इंटरव्ह्यू घेण्यात येईल. BEL द्वारे दिलेल्या लिंकचा वापर करून उमेदवारांना मुलाखतीसाठी नोंदणी करावी लागेल.

हेही वाचा – नेटफ्लिक्स देणार नोकरीची संधी! ‘या’ कामासाठी मिळेल साडे सात कोटी रुपये वार्षिक पगार!

बीईएल प्रकल्प अभियंता भरतीसाठी अर्ज कसा करावा?

  • bel-india.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • होमपेजवर, ‘करिअर’ टॅबवर क्लिक करा आणि भरती-जाहिरात निवडा.
  • वॉटर फ्रंट सपोर्ट पोझिशन्ससाठी प्रकल्प अभियंत्यांच्या भरती अधिसूचनेवर क्लिक करा.
  • आता ‘गुगल फॉर्म लिंक’ वर क्लिक करा.
  • फॉर्म भरा, कागदपत्रे अपलोड करा आणि फी भरा.
  • डाउनलोड करा आणि प्रिंटआउट घ्या.