मुलांनी काही आगळं वेगळं करायचं ठरवलं की, अनेक कंगोरे एकदम टोकदारपणे समोर येतात. हे कंगोरे खरे किती, का खोटे याच वास्तव दाखवण्याचा हा ‘आरसा’. लिबरल आर्टस् अशीच एक शिक्षण शाखा. मनोज बीए लिबरल आर्ट्स या कोर्सला दाखल झाला. असला काही अभ्यासक्रम असतो हे त्याच्या वडिलांनाही माहीत नव्हते. मात्र, तो एक परदेशी नोकरीचा मार्ग होता हे मनोजच्या प्रगतीतून सिद्ध झाले. अर्थात त्यासाठी मोठा खर्च करावा लागला होता.

अमेरिकेत जाऊन अमेरिकन नागरिक होण्याचे माझे स्वप्न अपूर्ण राहून मी दुबईमध्ये स्थायिक झालो. दुबईमध्ये स्थिरावल्या पासून माझ्या मुलाला मनोजला मी अमेरिकेला शिकायला पाठवण्याचे स्वप्न पहात होतो. यासाठी लागतील ते प्रयत्न करण्याची माझी तयारी होती. पण मनोजची शैक्षणिक उतरण जशी माझ्या लक्षात येऊ लागली तेव्हा अमेरिकेऐवजी त्याला इंग्लंडमध्ये कसे पाठवता येईल यावर मी लक्ष केंद्रित केले. पाचवीला त्याची शाळा बदलली. ती इतकी महागडी शाळा होती की माझ्या पगाराच्या २५ टक्के रक्कम त्याच्या फी साठीच जायची. अनेक वेळा याविषयी अलकाशी बोलूनही त्यातील गांभीर्य तिच्या कधी लक्षातच आले नाही. इथेच तिचा माझा संवाद तुटू लागला. कामानंतर कुठे जाऊन मित्रांबरोबर गप्पा होतील अशी शक्यता दुबईमध्ये कधीच नव्हती. अलकाचा व माझा विसंवाद वाढत गेला त्याचा परिणाम मात्र मनोजच्या मनावर ओरखडे उमटण्यात झाला.

loksatta editorial about indira gandhi declared emergency in 1975
अग्रलेख : असणे, नसणे आणि भासणे!
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
mrunal dusanis says live in america is more difficult than India
“अमेरिकेत राहणं खूप अवघड”, चार वर्षांनी भारतात आलेल्या मृणाल दुसानिसने सांगितलं परदेशातील राहणीमान, म्हणाली…
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
ghatkopar hoarding case
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट; राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कैसर खालिद निलंबित
loksatta editorial on israeli supreme court decisions says ultra orthodox jews must serve in military
अग्रलेख : बीबींचा ‘शहाबानो क्षण’!
devendra fadnavis analysis
“आपण तीन नाही, तर चार पक्षांशी लढत होतो, तो चौथा पक्ष म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांकडून लोकसभेतील निकालाचं विश्लेषण!

अचानकपणे एका दिवशी सातवी सहामाहीचा निकाल माझ्यासमोर आला. दोन विषयात लाल रेघा मला दिसल्या. त्यातही माझा संताप वाढवणारी गोष्ट म्हणजे दोन दिवस हा निकाल मनोजने आमच्यापासून लपवून ठेवला होता. अलकाशी होणारी भांडणे हा नित्याचा विषय झाला असल्यामुळे मनोज कायमच खोलीचे दार बंद करून अभ्यासाचे सोंग करत असे. माझी खात्री आहे की त्याचे कान मात्र दाराला लागलेले असत. रिपोर्ट कार्ड बघून माझा आवाज अचानक चढला आणि मनोज म्हणून मी जोरात हाक मारली. पुढच्याच क्षणी दार उघडून खाल मानेने मनोज बाहेर आला. दोन दिवस रिपोर्ट कार्ड लपवून का ठेवले असे मी त्याला विचारले असता त्याने काहीही उत्तर दिले नाही. आणि माझा तोल पूर्णपणे सुटला. माय आणि लेक दोघेजण माझे वाटोळे करायला निघाले आहेत असे म्हणत मी त्याचे बकोट पकडून पाठीत दणका घालणार एवढ्यात अलका मध्ये पडली व तिच्या गालफडावर तो दणका बसला.

हेही वाचा >>> MPSC मंत्र : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- पर्यावरण

सारेच अनपेक्षित घडले होते. पण जे घडले त्याची माफी मागून भरपाई होणार नव्हती. संतापाच्या भरात माफी मागण्याचा विचार सुद्धा माझ्या मनात आला नाही. कसलीही नोकरी नसलेली अलका मला अचानक सोडून जाईल व मनोजला घेऊन भारतात जाईल हे स्वप्नातही नसलेल्या मला याचा मानसिक धक्का मला जबरदस्त बसला होता. भारतात आता ती काय करत असेल, मनोजचे कसे चालले असेल या पायी महिनाभर माझी झोप पूर्णपणे उडली होती. एका मानसोपचार तज्ज्ञालाही मी जाऊन भेटलो. मला जवळचे कोणतेच नातेवाईक नसल्यामुळे त्याचाच आधार होता. तिसऱ्या भेटीमध्ये त्यांनी मला एक मार्ग सांगितला. तुझे मनोज व अलकावर खरच प्रेम असेल तर दोघांची काळजी घेण्याची पूर्ण आर्थिक व्यवस्था पहिल्यांदा त्यांच्यापर्यंत पोहोचव. त्यानंतर अलकाचा संताप निदान कमी होईल, शक्य झाल्यास राग निवळेल. आता मला रस्ता स्पष्ट दिसू लागला. मनोजचे भले कसे होईल व तो अमेरिकेत कसा पोहोचेल यासाठी एका कन्सल्टन्सीची मी मदत घेतली. त्यांच्यातर्फेच मला रिटाचा संपर्क मिळाला. अतिशय मृदू शब्दात पण पूर्ण प्रोफेशनली आमचा संवाद सुरू झाला. विविध संस्थांचालकांशी तिचे उत्तम संबंध असल्यामुळे मनोजची ती भारतातील दुसरी पालक झाली. दुबईतील पगार रुपयांमध्ये रूपांतरित केल्यावर माझा आर्थिक बोजा ही खूप कमी झाला होता. मनोजशी न बोलता, अलकाशी संपर्क न करता रिटा मात्र दर आठवड्याला मला लेखी रिपोर्ट पाठवत असे. आणि अक्षरश: त्याच्या मार्कांची काळजी किती निरर्थक आहे व माझी झोप उडण्याची काहीच कारण नाही हे माझ्या लक्षात आले.

खास महागड्या संस्था

परदेशात पालक असलेल्या मुलांसाठी अशा अनेक संस्था भारतातील विविध शहरात काढल्या गेल्या आहेत हे हळूहळू मला उलगडत गेले. याच टप्प्यावर बारावीनंतर चार वर्षे शिकले तरच अमेरिकेत जाता येते हे सत्य मला कळले. त्याची सोय रिटानेच केली व मनोज बीए लिबरल आर्ट्स या कोर्सला दाखल झाला. असला काही अभ्यासक्रम असतो हे कोणालाही माहिती नव्हते. तो अभ्यासक्रम मनोज कसा पूर्ण करणार याबद्दल रिटाने मला आश्वस्त केले. प्रत्येक सेमिस्टरला काही गटातून आवडीचे विषय निवडायचे व त्याचा अभ्यास आपल्या कुवतीनुसार करायचा ही चार वर्षाची पद्धत असल्यामुळे मनोजही दडपणातून मोकळा झाला होता. दुसऱ्या वर्षापासून तो दर महिन्यातून एखादा माझा फोन घ्यायला लागला. अलकाने मात्र माझा नंबर ब्लॉक करून ठेवला होता. तशी ती आता माझी पत्नी राहिलेली नव्हती, पण मनातील राग तसाच होता.

मनोज बऱ्या गुणांनी बीए लिबरल आर्ट्स पास झाल्यावर त्याची अमेरिकेत जाण्याची व्यवस्था दुबईतील एका एजंट करवी मी रिटाच्या मदतीने करून घेतली. त्याला मास्टर्ससाठी एका छोट्या विद्यापीठात प्रवेश मिळवला. तो अभ्यासक्रम करताना पुन्हा गणिताची अडचण त्याला थोडी जाणवली पण आता त्याचा आत्मविश्वास वाढला होता. मनोजच्या पदवी प्रदान समारंभात अनेक वर्षाने अलका तिथे भेटल्यावर काय बोलायचे असे वाटत होते पण ते अवघडलेपण मनोजने दूर केले. माझ्या सामान्य ज्ञानामध्ये लिबरल आर्ट्स नावाच्या पदवीची भर पडली मात्र त्यासाठी वीस लाखाचा खर्च झाला. निदान तिघांची पुढील आयुष्यात आता समाधानाची वाटचाल होईल.