Cheapest computer course after 10th: भारतातील तरुणांवर सर्वात मोठी जबाबदारी असते ती म्हणजे शिक्षण पूर्ण करून नोकरी करत घराची जबाबदारी सांभाळणे. या कारणामुळे बरेच तरुण आज दहावीच्या पुढे शिक्षण घेऊ शकत नाहीत किंवा त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागते. पण, दहावी उत्तीर्ण असल्यानंतरही नोकरी शोधण्यात खूप अडचणी येतात. हीच अडचण लक्षात घेऊन आम्ही तुमच्यासाठी पाच असे स्वस्त कॉम्प्युटर कोर्सेसविषयी माहिती घेऊन आलो आहोत, जे पूर्ण केल्यानंतर तुम्ही वर्षाला चार ते पाच लाख रुपयांच्या पॅकेजची नोकरी मिळवू शकता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दहावीनंतर करा ‘हे’ पाच बेस्ट कॉम्प्युटर कोर्सेस

१) आयटीआय इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी –
या कॉम्प्युटर कोर्सचा कालावधी दोन वर्षांचा आहे आणि याची फी सुमारे ७० हजार ते एक लाख रुपये आहे. हा कॉम्प्युटर कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर तुम्हाला वर्षाला तीन ते चार लाख रुपयांच्या पॅकेजची नोकरी सहज मिळू शकते.

२) आयटीआय कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट –
या कोर्सचा कालावधी एक वर्षाचा आहे आणि त्याची फी २० हजार रुपयांपासून ते एक लाख रुपयांपर्यंत आहे. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला दोन ते तीन लाख रुपयांच्या पॅकेजची नोकरी सहज मिळू शकते.

३) डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी –
या डिप्लोमाचा कालावधी एक ते तीन वर्षांचा आहे, ज्यासाठी तुम्हाला ५० हजार ते ९० हजार रुपये फी भरावी लागेल. हा सायबर सिक्युरिटी डिप्लोमा केल्यानंतर तुम्हाला चार-पाच लाख रुपयांच्या पॅकेजची नोकरी मिळू शकते.

४) कोर्सेस ऑन कॉम्प्युटर कॉन्सेप्ट्स (CCC) –
हा दोन महिन्यांचा शॉर्ट टर्म कोर्स आहे. या कोर्ससाठी तुम्हाला ५० हजार ते ६० हजार रुपये फी भरावी लागेल. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुमच्या पात्रतेनुसार तुम्हाला तीन ते चार लाख रुपयांच्या पॅकेजची नोकरी मिळू शकते.

५) बेसिक कॉम्प्युटर कोर्स (BCC) –
हा एक एंट्री लेव्हल कोर्स आहे, ज्यामध्ये कॉम्प्युटरचे बेसिक नॉलेज मिळते. या कोर्सचा कालावधी एक ते सहा महिन्यांचा आहे, ज्यासाठी तुम्हाला १२ हजार ते २४ हजार रुपये फी भरावी लागेल. हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला एक ते तीन लाख रुपयांच्या पॅकेजच्या नोकरीची अपेक्षा करता येईल.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Best and cheapest jobs oriented computer courses after 10th low budget computer courses list here sjr