Fashion Designing : फॅशन डिझायनिंगमध्ये अनेकांना आवड असते पण ही आवड चांगले करिअर घडवू शकते, हे खूप कमी लोकांना माहीत आहे. सध्या दिवसेंदिवस फॅशन उद्योगामध्ये विविधता दिसून येत नाही आणि स्पर्धा वाढली आहे. चांगल्या ब्रॅण्डबरोबर काम करणे, आंतरराष्ट्रीय फॅशन इव्हेंटमध्ये सहभागी होणे आणि मार्केटमध्ये योगदान देण्याची संधी प्रदान करते.

भारतात फॅशन डिझाइनिंगमध्ये मिळणारा पगार हा अनुभव, कौशल्ये, ठिकाण आणि तुम्ही कोणत्या संस्थेसाठी काम करता, यावर अवलंबून असते. फ्रेशरला सुरुवातीला या क्षेत्रात २.५ ते ५ लाखापर्यंत वार्षिक पगार मिळू शकतो. त्यानंतर अनुभव आणि कौशल्याच्या जोरावर तुम्ही फॅशन डिझायनर म्हणून ६ लाख ते २० लाख किंवा त्याहून अधिक वार्षिक पगार कमावू शकता.

Samruddhi Highway Thane Nashik tunnels Warli painting
समृद्धी महामार्गावरील बोगद्यांना आकर्षक चित्रांचा साज, ठाणे – नाशिकला जोडणाऱ्या बोगद्यावर स्थानिक वारली चित्रकलेचा आविष्कार
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
ITBP Recruitment 2025 news in marathi
नोकरीची संधी : ‘आयटीबीपी’त ५१ पदे रिक्त
portfolio, investment , Alphaportfolio Concept ,
चला अल्फापोर्टफोलिओ तयार करूया
98 akhil bharatiya marathi sahitya sammelan sharad pawar interaction with writers
महाराष्ट्र पूर्वपदावर आणण्यासाठी साहित्यिकांची लेखणी उपयुक्त; शरद पवार यांची अपेक्षा
Portfolio With Alpha
अल्फा पोर्टफोलिओ कसा तयार करायचा?
Haldi Kunku Gift Ideas for Womens in Budget
Makar Sankranti Gift Idea: सुवासिनींना यंदा हळदी-कुंकवासाठी ‘वाण’ काय द्यायचं? पाहा ‘या’ भन्नाट आयडिया; खर्च कमी आणि वस्तूही उपयोगी
pune best city for women loksatta news
महिलांना काम करण्यासाठी सर्वोत्कृष्ट असलेल्या पहिल्या पाच शहरांत पुण्याला स्थान

फॅशन डिझायनिंग इंडस्ट्रीमध्ये तुम्ही खालील पर्याय निवडून करिअर घडवू शकता.

फॅशन डिझायनर –

फॅशन डिझायनर हे एक अत्यंत क्रिएटिव्ह असतो जे कपडे, ॲक्सेसरीज किंवा पादत्राणासाठी दर्जेदार डिझाइन्सची निर्मिती करतात. ते ट्रेंडच्या पुढे जाऊन एकापेक्षा एक उत्तम डिझाइन्स तयार करतात आणि फॅशन इंडस्ट्रीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. फॅशन डिझायनर डिझाइनसाठी संशोधन करणे, स्केचिंग करणे, फॅब्रिक्स निवडणे, नमुने तयार करणे आणि त्यांच्या डिझाइनच्या उत्पादनावर लक्ष ठेवणे, इत्यादी कामे करतात

हेही वाचा : Career in Theater : अभिनय येत नाही पण नाट्यविश्वात करिअर करायचे आहेत? जाणून घ्या हे नऊ चांगले पर्याय

फॅशन इलस्ट्रेटर –

फॅशन इलस्ट्रेटर हा एक अत्यंत कुशल कलाकार असतो जो फॅशन डिझाइन्सचे व्हिज्युअल इमेज तयार करण्यात अव्वल असतो. रेखाचित्रे आणि चित्रांद्वारे फॅशन डिझाइनची संकल्पना समोर आणतो. फॅशन इलस्ट्रेटर डिझाइन निर्मितीत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. फॅशन डिझायनर, स्टायलिस्ट आणि ब्रॅण्डशी संवाद साधत काम करतात.

फॅशन स्टायलिस्ट-

फॅशन स्टायलिस्ट हा अत्यंत क्रिएटिव्ह असतो. आकर्षक पोशाख आणि वस्तू तयार करतो. मागणीनुसार डिझाइन तयार करण्यासाठी ते क्लायंट, फॅशन ब्रॅण्ड, छायाचित्रकार किंवा फॅशन प्रकाशनासाठी जुळवून काम करतात. फॅशन स्टायलिस्ट डिझाइनद्वारा नवीन ट्रेंड किंवा स्टोरी किंवा ब्रॅण्ड ओळख सांगण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.

फॅशन व्यावसायिक –

फॅशन व्यावसायिक हा डिझाइन उत्पादनांची खरेदी, विक्री आणि जाहिरात व्यवस्थापनाचे काम करतो. फॅशन व्यावसायिक हे फॅशन डिझायनर आणि ग्राहक यांच्यामध्ये समन्वय महत्त्वाची भूमिका बजावतात. योग्य उत्पादने बाजारात योग्य वेळी उपलब्ध करण्याची जबाबदारी यांच्यावर असते.

Story img Loader