सर, माझी मुलगी बी.कॉमला आहे. बारावीत तिला ६८ टक्के मिळाले आहेत. मला एखाद्या कोर्सेस बद्दल माहिती हवी आहे ज्याच्यामुळे तिला पदवी मिळवल्यानंतर त्या कोर्सेसच्या आधाराने नोकरी मिळवता येईल.        – वैदेही

पदवी बी. कॉम.चीच घेऊन अन्य कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम करणे हा झाला पहिला रस्ता. तर दुसरा रस्ता सुरू होतो कौशल्य विकासाच्या अभ्यासक्रमाला थेट प्रवेश घेणे. बी.कॉम. पदवी घेण्यासाठीचा खर्च जेमतेम ५० हजार रुपये असतो तर अन्य साऱ्या रस्त्यांचा खर्च किमान तीन ते पाच लाखापर्यंत जातो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही पद्धतीचा अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण करा तुम्हाला मिळणारी पहिली नोकरी ही सहसा सोळा ते वीस हजार रुपये मासिक एवढीच असते. मात्र पहिले वर्ष शिकणे, दुसरे वर्ष अनुभव घेणे व नंतर तिसऱ्या वर्षी खरा पगार सुरू होणे, म्हणजे चांगली रक्कम हाती येते. बीकॉम करता करता ट्रॅव्हल अँड टुरिझम, इंटिरियर डिझाईन, ग्राफिक डिझाईन, डिजिटल मार्केटिंग यातील आवडतील तसे अभ्यासक्रम करणे शक्य असते. अन्यथा बीबीए या नावाने विविध स्पेशलायजेशन असलेले सुमारे दहा अभ्यासक्रम सर्व खासगी विद्यापीठात उपलब्ध आहेत. रिटेल मॅनेजमेंट, बँकिंग फायनान्स, ट्रॅव्हल टुरिझम, इव्हेंट मॅनेजमेंट, सप्लायचेन अ‍ॅण्ड लॉजिस्टिक्स अशा पद्धतीच्या अभ्यासक्रमानंतर नोकरीची शक्यता सुरू होते. कोणत्याही अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यापूर्वी पाठय़पुस्तके पहावीत एखाद्या विद्यार्थ्यांला भेटावे आणि मगच प्रवेश घ्यावा. मुलीने पदवीला सुरुवात केली आहे तर दुसरे सहामाहीपासून एखादा आवडीचा रस्ता निवडावा.

Extension of 15 days for students to submit SEBC and Non Criminal Certificate
एसईबीसी व नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना १५ दिवसांची मुदतवाढ
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Contractors are going to be charged twice as much for the deteriorated road repair work in Pimpri
पिंपरीतील रस्तेदुरुस्तीची निकृष्ट कामे; ठेकेदारांवर…!
electric mobility promotion scheme 2024 to be extended says hd kumaraswamy
अवजड उद्योगमंत्र्यांचा मात्र ई-वाहनांना प्रोत्साहन कायम राहण्याचा दावा
Dates for each police station to record statement of victims in POCSO
पोक्सोंमधील पीडितांचे जबाब नोंदवण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यांना तारखा
tiss Bans students participation in anti establishment unpatriotic discussions
राजकीय चर्चा, आंदोलने यांत सहभागी होण्यास टीसच्या विद्यार्थ्यांना मनाई; ‘टीस’कडून विद्यार्थ्यांसाठीच्या नियमावलीमध्ये बदल
Monthly scholarship on behalf of Barty to promote research scholarship of Scheduled Caste students
५९ दिवसांचे आंदोलन, सरकार नरमले, १०० टक्के अधिछात्रवृत्ती
Loksatta Chatura What exactly is the Drone Pilot Scheme for Women
महिलांसाठीची ड्रोन पायलट योजना नेमकी काय आहे ?

सर, मी नुकताच ६० व्या वर्षी सरकारी नोकरीतून निवृत्त झालो. मला ज्योतिष शास्त्र शिकायचे आहे. मी कल्याणला राहतो. कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद. – धनंजय देशपांडे.

हेही वाचा >>> UPSC-MPSC : सागरी परिसंस्था म्हणजे काय? त्याचे मुख्य घटक कोणते?

ज्योतिष शास्त्र शिकायचे आहे ते हौस म्हणून का व्यवसाय म्हणून याबद्दल मनाशी एकदा पूर्णपणे निर्णय घ्यावात. त्यानुसार शिकण्याची हौस भागवण्याकरताचा खर्च, वेळ आणि मुख्य म्हणजे चिकाटी याचा ताळमेळ लागेल. व्यवसाय म्हणून शिकायचा असेल तर पुण्यामध्ये रितसर ज्योतिष शास्त्र शिकवण्याचे क्लासेस घेणारी अनेक मंडळी आहेत. या साऱ्याची सुरुवात म्हणजे ज्योतिषाचे विविध प्रकार प्रथम नीट जाणून घेणे. हातावरच्या रेषातून ज्योतिष, चेहरा बघून ज्योतिष, तात्कालीक प्रश्न कुंडली मांडून त्यावरून ज्योतिष सांगणे, जन्म कुंडली काढून आणि आणून दिलेली कुंडली ताडून पाहून दोन्हीचा मेळ घालून भविष्य वर्तवणे किंवा मोजक्या विषयातच भविष्य सांगणे जसे की लग्न, नोकरी, परदेशगमन, संतती अशा विविध गोष्टींचा समावेश होतो. या खेरीज न्यूमेरोलॉजीचा अभ्यास करून भविष्य वर्तवणारे आहेतच. टॅरो या पद्धतीत ठरावीक आकृत्यांचे पत्ते वापरून भविष्य सांगितले जाते. प्राथमिक रित्या सुरुवात म्हणून एखाद्या मोठय़ा पुस्तकाच्या दुकानात या साऱ्या वरील पुस्तके तुम्हाला उपलब्ध आहेत त्यातील निवडक वाचून मग निर्णय घ्यावा. विविध वृत्तपत्रे, नियतकालिकात भविष्य लिहिणारे अनेक जण नामांकित आहेत. त्यांच्याशी संपर्क साधलात तर अधिक माहिती नक्की प्राप्त होईल. वयाच्या साठी नंतर एक छानसा छंद आपण जोपासत आहात यासाठी आपले अभिनंदन करावेसे वाटते.

नमस्कार सर, मी मुंबईतील नामांकित शासकीय (स्वायत्त) महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी पदवीच्या दुसऱ्या वर्षांला आहे. मला दहावीत ९५.८०, बारावीत ८८.३३ आणि एमएचटी-सीईटीत ९९.०९ पर्सेटाईल होते. सध्या पहिल्या वर्षांच्या दोन सत्रांचे मिळून ७.४३ (रिलेटिव्ह) सीजीपीए आहेत. सध्या परीक्षेत बऱ्याचदा पास होण्याइतकेच गुण मिळतात. अभ्यासाची पद्धत कुठेतरी चुकत आहे असे वाटते. स्वायत्त कॉलेज आणि गेल्या दोन बॅचेस ऑनलाइन असल्यामुळे मार्गदर्शनपर साहित्य (जसे जुन्या प्रश्नपत्रिका, पुस्तके) वगैरे फारसे उपलब्ध नाही. अभ्याक्रमात आणि पेपर पॅटर्नमध्ये अनेकदा बदल होत राहतात.

मुंबई विद्यापीठाची पुस्तके वापरली, तरीही पेपरची काठीण्यपातळी खूप जास्त वाटते, कारण कॉलेजमधल्या परीक्षा थोडय़ा वेगळय़ा स्वरूपाच्या आहेत. ४० मार्काच्या मिडसेमेस्टरचे ५० टक्के गृहीत (२० गुण), १०० मार्काच्या एंडसेमेस्टरचे ६० टक्के गृहीत (६० गुण), (दोन्हींमध्ये ऑप्शनल प्रश्न नाहीत), २० गुण इंटर्नल.

ह्या बाबतीत प्राध्यापकांकडूनही योग्य मदत मिळत नाहीच, शिवाय त्यांचे शिकवणे समजत नसेल तर स्वत:हून शिकताना आणखीनच अडचण होते. माझे ध्येय किमान ९ सीजीपीए मिळवणं आहे. कृपया अभ्यास कसा करावा ह्या बाबतीत मार्गदर्शन करावे.

– अपूर्वा

अपूर्वा तुझ्यासारखीच परिस्थिती अनेकांची होत असते. याची दोन-तीन वेगवेगळी कारणे आहेत. आठवी ते बारावी क्लासमध्ये संपूर्णपणे शिकवलेला अभ्यासक्रम पाठ करून मार्क मिळत असतात. ते अत्युत्तम असल्यामुळे त्याच्या आठवणीतून किंवा स्मरणरंजनातून मुले बाहेर येत नाहीत. ज्या मिनिटाला माझे दहावी, बारावी व सीईटीचे मार्क तू विसरशील आणि त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे नामवंत कॉलेजात प्रवेश मिळाल्याचा आनंद बाजूला ठेवशील तेव्हा खऱ्या अर्थाने अभ्यासाची पद्धत, स्व-अभ्यासाचा रस्ता तुला सापडेल. जुन्या नोट्स नाहीत पेपरचे स्वरूप सारखे बदलते, प्राध्यापकांना विचारले असता त्यांच्याकडून उत्तरे मिळत नाहीत, अन्य कोणाकडून मदत घ्यावी ते कळत नाही असे सारे प्रश्न उत्तम स्वरूपाच्या संस्थेमध्ये व्यावसायिक अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाला पडतातच. त्यातच जाण्या येण्याची तीन तास हे दमवणारे असले तर त्याची भर पडते मात्र यावर उपाय नाही. अभ्यास करताना प्रत्येक विषयाची टेक्स्टबुकची रोज फक्त तीन पाने वाचून स्वत:च्या नोट्स काढणे व त्या आधारे मैत्रिणीला/ मित्राला विषय सांगायचा प्रयत्न करणे व प्रश्नांना उत्तरे देणे अशी सुरुवात आणि केली तर उपयोगी पडते. या उलट कळते, आवडते ते पुन्हा पुन्हा वाचले जाते. अशा नोट्स काढण्याचा उपाय अनेकांना कायम मार्गदर्शक ठरतो. दुसरा सगळय़ात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सॉफ्टवेअर मध्येच मला नोकरी करायची आहे हे सध्या विसरून जावे. तुला मिळणारी कोणतीही नोकरी सॉफ्टवेअरशी संबंधित असणार आहे त्यासाठी आतापासून कोडींग शिकण्यात वेळ घालवू नये. तुझ्या विषयाशी संबंधित एम्बेडेड सिस्टिमचे कोडींग एवढेच सध्या पुरे आहे. शेवटची बाब मला नऊ पेक्षा जास्त सीजीपी हवा आहे हे वाक्य. सध्या तुझे तिसरे सेमिस्टर चालू आहे. आठव्या सेमिस्टपर्यंत दर सेमिस्टरला अध्र्या टक्क्याने सीजीपी नक्की वाढेल असा प्रयत्न करणे जास्त व्यवहार्य नाही काय?