बारावीनंतर कोणते करिअर निवडावे, हा प्रश्न विद्यार्थ्यांना पडतो पण अनेक विद्यार्थ्यांना लवकरात लवकर एखादा कोर्स संपवून जॉब करण्याची इच्छा असते. अशा विद्यार्थ्यांना आज आम्ही पाच कोर्स सांगणार आहोत, ज्यामुळे त्यांना लवकरात लवकर जॉब मिळू शकतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१. जर तुम्ही क्रिएटिव्ह असाल आणि तुम्हाला डिझाइन किंवा पेंटिंगमध्ये आवड असेल तर तुम्ही इंटीरिअर डिझाइनिंगमध्ये डिप्‍लोमा करू शकता. हा डिप्‍लोमा शॉट टर्म कोर्समध्ये असतो. त्यानंतर तुम्ही महिन्याला २० हजारांवर कमावू शकता.

२. ॲनिमेशन आणि मल्‍टिमीडिया कोर्सेस खूप महाग असतात पण तुम्हाला आवड असेल आणि तुम्ही क्रिएटिव्ह असाल तर तुम्ही कोणत्याही प्रोफेशनल इन्स्टिट्यूटमधून डिप्लोमा करू शकता. तुम्ही दर महिना २०,००० पर्यंत कमावू शकता.

हेही वाचा : Maharashtra HSC Result 2023 Date : इयत्ता बारावीचा निकाल आज जाहीर होणार, जाणून घ्या कसा आणि कुठे पाहता येईल

३. जर तुम्ही बारावी सायन्स केले असेल आणि तुम्हाला कॉम्प्युटर प्रोग्रामिंग, वेबसाइट किंवा सॉफ्टवेअर ॲप बनविण्यात इंटरेस्ट असेल तर तुम्ही डिप्लोमा करून जॉब मिळवू शकता. तुम्ही महिन्याला २० हजारांवर कमावू शकता

४. फिटनेस इन्स्ट्रक्टर म्हणून जर तुम्हाला काम करायचे असेल तर सहा किंवा आठ महिन्यांचा कोर्स करून तुम्ही जिममध्ये ट्रेनर इन्स्‍ट्रक्‍टर बनू शकता. तुम्ही १५ ते २० हजार कमावू शकता.

हेही वाचा : LinkedIn वर जॉब शोधणे होणार अधिक सोपे! या नव्या टूलमुळे फसवणुकीला लागणार लगाम, एकदा वाचाच…

५. योगा हा करिअरसाठी बेस्ट ऑप्शन आहे. यासाठी तुम्हाला कोर्ससोबत प्रॅक्टिसची खूप आवश्यकता असते. यामध्ये करिअर बनवण्यासाठी तुम्ही बारावीनंतर यासंबंधित कोर्स करू शकता. कोर्स केल्यानंतर तुम्ही जॉबद्वारे महिन्याला १५ से २० हजार कमावू शकता.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Best five courses after 12th for earning check career options maharashtra hsc 12th result 2023 ndj