Part-time Jobs For Students: देशाबाहेर शिक्षण घेणे बहुतेक लोकांसाठी परवडणारे नसते. अशा परिस्थितीत विद्यार्थी अभ्यासाबरोबरच पार्ट टाईम जॉब करतात. हल्ली शिकणारी मुले पार्ट टाइम जॉबच्या शोधात असतात. विद्यार्थी व्हिसावर शिक्षण घेणाऱ्या भारतीयांना आठवड्यातून २० तास काम करण्याची परवानगी असते. ज्यामध्ये बहुतेक विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्येच पार्ट टाईम नोकरी मिळते. आजकालच्या पार्ट टाइम जॉब्स करून अनेकजण भरघोस पैसे कमवत आहेत. मात्र अमेरिकेमध्ये शिकता शिकता पार्ट टाइम जॉब्स  करावे तरी कोणते? कोणत्या पार्ट टाइम जॉब्समध्ये अधिक पैसे मिळू शकतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

अमेरिकेत शिकता- शिकता कमवा; ‘ही’ यादी एकदा पाहाच!

टीचर असिस्टेंट 

तुम्ही अमेरिकेत शिकता शिकता टीचर असिस्टेंट  म्हणून पार्ट टाईम नोकरी करू शकता. टीचर असिस्टेंट म्हणून काम केल्यास तुम्हाला कोणताही विषय सखोलपणे समजून घेण्याची संधी मिळू शकते. तसेच तुमचा बायोडेटा मजबूत असेल. सहाय्यक शिक्षक म्हणून, तुम्हाला सेमिनार आयोजित करावे लागतील. प्राध्यापकांना मदत करावी लागेल. या नोकरीतून तुम्ही दररोज सुमारे ३०००-५००० रुपये कमवू शकता.

प्रोडक्शन असिस्टंट

जर तुम्हाला इव्हेंट मॅनेजमेंट आणि नेटवर्किंगमध्ये आवड असेल तर तुम्ही प्रोडक्शन असिस्टंटचे काम करू शकता. यामध्ये तुम्हाला कॅम्पस लाइफचा एक भाग बनण्याची संधी मिळेल. तुम्ही विविध प्रकारचे कार्यक्रम व्यवस्थापित करुन तुम्ही कोणताही कार्यक्रम आयोजित करू शकता. ही नोकरी तुमच्यामध्ये नेतृत्वगुण देखील विकसित करेल. या नोकरीतून तुम्ही दररोज ४०००-६००० रुपये कमवू शकता.

ग्रंथालयात नोकरी

जर तुम्हाला पुस्तकांची आवड असेल तर तुम्ही लायब्ररीमध्ये पार्ट टाईम नोकरी करू शकता. यामध्ये तुम्हाला ग्रंथपाल आणि ग्रंथालय कर्मचाऱ्यांना मदत करावी लागेल. याशिवाय विद्यार्थ्यांना पुस्तके शोधण्यातही मदत करावी लागेल. पुस्तकांचे व्यवस्थापन करण्यापासून ते नवीन पुस्तकांची योग्यरित्या व्यवस्था करण्यापर्यंतचे काम तुम्हाला येथे मिळू शकते. याशिवाय, ग्रंथालयात होणारे कार्यक्रम देखील आयोजित करावे लागू शकतात. या कामातून विद्यार्थी दररोज सुमारे २०००-४००० रुपये कमवू शकतात.

ट्यूरर

जर तुम्हाला शिकवण्याची आवड असेल आणि तुमची एखाद्या विषयात चांगली पकड असेल तर तुम्ही ट्यूटर म्हणून पार्ट टाईम नोकरी करू शकता. तुम्हाला विद्यार्थ्यांना शिकवावे लागेल. स्टडी मटेरियल तयार करावे लागतील आणि वर्ग देखील घ्यावे लागतील. विद्यार्थ्यांना शैक्षणिक पुस्तके कुठून घेऊ शकतात याविषयी माहिती द्यावी लागेल.या नोकरीतून तुम्ही दिवसाला ५०००-७००० रुपये कमवू शकता.