भारत डायनॅमिक्स लिमिटेड (BDL) अंतर्गत ३६१ प्रकल्प इंजिनिअर, प्रकल्प अधिकारी आणि इतर पदांसाठी रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी वॉक इन मुलाखत घेण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवार bdl-india.in या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकणार आहेत. तसेच या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ फेब्रुवारी असेल. भारत डायनॅमिक्स लिमिटेड २०२४ या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची पद्धत कशी असणार आहे याबद्दल जाणून घेऊ.
Bharat Dynamics Limited (BDL) Recruitment 2024 : रिक्त जागांचा तपशील
चार वर्षांसाठी प्रकल्प इंजिनिअर, प्रकल्प पदविका सहायक, प्रकल्प व्यापार सहायक आणि प्रकल्प कार्यालय सहायक यांच्या ३६१ रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती मोहीम आयोजित केली जात आहे.
Bharat Dynamics Limited (BDL) Recruitment 2024 : रिक्त पदे
प्रकल्प इंजिनिअर / अधिकारी – १३६ रिक्त जागा.
प्रोजेक्ट डिप्लोमा सहायक / सहायक – १४२ रिक्त जागा.
प्रकल्प व्यापार सहायक (BLV-4, DHH-2, LD-3, MD-3) / कार्यालय सहायक – ८३ रिक्त जागा.
Bharat Dynamics Limited (BDL) Recruitment 2024 : वयोमर्यादा –
उमेदवारांचे वय २८ वर्षे असावे.
Bharat Dynamics Limited (BDL) Recruitment 2024 : अर्ज शुल्क
प्रकल्प इंजिनिअर / प्रकल्प अधिकारी यांच्यासाठी अर्जाची फी ३०० रुपये आहे. प्रोजेक्ट डिप्लोमा असिस्टंट / प्रोजेक्ट ट्रेड असिस्टंट / प्रोजेक्ट असिस्टंट / प्रोजेक्ट ऑफिस असिस्टंटसाठी अर्ज फी २०० रुपये आहे.