BEL Recruitment 2024 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) अंतर्गत ट्रेनी इंजिनीयर – I (प्रशिक्षणार्थी अभियंता – I ) या पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ मार्च असणार आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी या https://bel-india.in/ अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
BEL Recruitment 2024 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडअंतर्गत भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण यांबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ.
पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी अभियंता – I (ट्रेनी इंजिनीयर – I)
पदसंख्या – ४७ जागा
नोकरीचे ठिकाण – मुंबई
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २८ वर्षे असावे.
BEL Recruitment 2024 : अर्ज शुल्क – सर्व उमेदवारांना १७७ रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.
BEL Recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता
उमेदवाराच्या पदानुसार त्याची शैक्षणिक पात्रता अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.
लिंक : https://drive.google.com/file/d/1zzWExJEBiwEbphIUWDAk2-eYehLI3IHv/view
पगार :
प्रशिक्षणार्थी अभियंता-I या पदासाठी निवडलेल्या उमेदवाराला ३० ते ४० हजारांपर्यंत पगार मिळणार आहे.
भरतीसाठी पाठविण्यात आलेल्या अर्जातील माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्जाबरोबर आवश्यक कागदपत्रांच्या सत्य प्रती जोडाव्यात. अर्ज शेवटच्या तारखेअगोदर दिलेल्या लिंकवर पाठवावा. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अशा प्रकारे उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत.