AIATSL Recruitment 2023: एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेडने हँडीमन आणि युटिलिटी एजंट पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत जवळपास ९९८ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १८ सप्टेंबर २०२३ ही आहे. तर एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज फी याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड भरती २०२३
पदाचे नाव – हॅंडी मॅन, युटिलिटी एजंट
एकूण रिक्त पदे – ९९८
शैक्षणिक पात्रता –
- हॅंडी मॅन – १० वी पास + इंग्लिश, मराठी आणि हिंदी भाषेचे ज्ञान.
- युटिलिटी एजेंट – १० वी पास + मराठी आणि हिंदी भाषेचे ज्ञान.
वयोमर्यादा –
- खुला प्रवर्ग १८ ते २८ वर्षे.
- ओबीसी – ३ वर्षांची सूट
- मागासवर्गीय – ५ प्रवर्ग
अर्ज फी –
- खुला/ ओबीसी प्रवर्ग – ५०० रुपये.
- मागासवर्गीय/ माझी सैनिक – फी नाही.
नोकरी ठिकाण – मुंबई.
हेही वाचा- SBI मध्ये ६ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा
अधिकृत वेबसाईट – https://www.airindia.com/
महत्वाच्या तारखा –
- अर्ज करण्याची सुरवात – ३० ऑगस्ट २०२३
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ सप्टेंबर २०२३
अर्ज करण्याचा पत्ता –
एचआरडी विभाग, एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड, जीएसडी कॉम्प्लेक्स, सहार पोलिस स्टेशनजवळ, सीएसएमआय विमानतळ, टर्मिनल-२, गेट क्रमांक ५, सहार, अंधेरी-पूर्व, मुंबई – ४०००९९
भरती संबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/1Y3921uO9aNldWGWfFsLeCR7BaHLIDZ9e/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.