Indian Navy Bharti 2023 : भारतीय नौदल अकादमी अंतर्गत फायर इंजिन ड्रायव्हर आणि फायरमन पदांच्या काही रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या १२९ उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. अर्ज करण्याची आणि अर्जदारांची पात्रता निश्चित करण्याची अंतिम तारीख एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये प्रसिद्ध झालेली पहिली तारीख सोडून ६० दिवसांनंतर मोजली जाणार आहे. भारतीय नौदल भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अर्ज पाठविण्याचा पत्ता याबाबतची सविस्तर माहिती जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय नौदल भरती २०२३ –

पदाचे नाव – फायर इंजिन ड्रायव्हर आणि फायरमन.

एकूण पदसंख्या – १२९

शैक्षणिक पात्रता – १० वी पास. (शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून सविस्तर माहितीसाठी भरितीची जाहिरात अवश्य पाहा.
अर्जाची पद्धत – ऑफलाईन.

हेही वाचा- १० वी पास, ITI आणि पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी! ICMR अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (SO ‘CRC’ साठी) मुख्यालय ईस्टर्न नेव्हल कमांड, न्यू अॅनेक्सी बिल्डिंग, D -ब्लॉक (दुसरा मजला), नेव्हल बेस विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश – ५३००१४.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६० दिवसाच्यात आत

अधिकृत वेबसाईट – http://www.joinindiannavy.gov.in

असा करा अर्ज –

  • भरतीसाठी उमेदवार आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने करु शकतात.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
  • अर्ज सादर करण्याची आणि अर्जदारांची पात्रता निश्चित करण्याची शेवटची तारीख एम्प्लॉयमेंट न्यूजमधील प्रकाशनाची पहिली तारीख वगळून ६० दिवसांनंतर मोजली जाईल.

भरती संबंधित अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी (https://drive.google.com/file/d/1vdbpSI5eCxYg_bGojvdpNHuwzngGEOR1/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big job opportunity for 10th pass candidates in indian navy know the detailed information jap