Department of Telecommunication Bharti 2023: दूरसंचार विभाग पुणे येथे “यंग प्रोफेशनल” पदाच्या एकूण ३० रिक्त जागासाठीची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
पदाचे नाव – यंग प्रोफेशनल
एकूण पद संख्या – ३०
शैक्षणिक पात्रता –
- सायबरमधील विशेष ज्ञानासह अभियांत्रिकी (इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स/सीएस/आयटी) मध्ये पदवी/ PG
सुरक्षा/ आर्टिफिशियल इंटेलिजन्स/ क्वांटम कंप्युटिंग/ IoT/ तसेच विभागाशी संबंधित इतर कोणतेही क्षेत्र ORMBA/ CA/ ICWA/ CFA किंवा आवश्यक क्षेत्रातील डोमेन ज्ञानासह कायद्यातील पदवी/पीजी. किंवा
इकॉनॉमिक्स/ स्टॅटिस्टिक्समध्ये पीजी किंवा ऑपरेशन रिसर्चमध्ये स्पेशलायझेशनसह एमबीए. - शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून त्यासाठी उमेदवारांनी या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहावी.
वयोमर्यादा – या भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवाराचे वय ३२ वर्षांपेक्षा कमी असावे.
अर्ज करण्याची पद्धती – ऑनलाईन
महत्वाच्या तारखा –
हेही वाचा- Govt Jobs 2023 : FTII मध्ये निघाली भरती, सरकारी नोकरीसाठी इच्छूक उमेदवार करू शकतात अर्ज
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ मे २०२३
पगार – निवडलेल्या उमेदवाराला ७० हजारांपर्यंत पगार मिळणार.
अधिकृत वेबसाईट – dot.gov.in