Maharashtra Board Class 10th, 12th Results 2024 Dates: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) १३ मे रोजी इयत्ता १० वी, १२ वीचा निकाल जाहीर केला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) वेबसाइटवर निकालाच्या संदर्भात एक अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विद्यार्थी आणि पालकांना एसएससी (इयत्ता 10) आणि सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. १० वी व १२ वी च्या निकालांच्या तारखा mahahsscboard.in वर जाहीर केल्या जातील असेही या अधिसूचनेत म्हणण्यात आले आहे. साधारणपणे दरवर्षी, महाराष्ट्र्र बोर्डाचा १२ वीचा निकाल आधी व त्यांनतर १० वीचा निकाल जाहीर केला जातो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हिंदुस्तान टाईम्सने महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, या आठवड्याच्या सुरुवातीला बोर्डाने अशी माहिती दिली होती की मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे आणि एचएससीचा म्हणजेच १२ वी चा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर केला जाऊ शकतो. निकाल जाहीर झाल्यावर, विद्यार्थी mahresult.nic.in आणि msbshse.co.in आणि hscresult.mkcl.org या साईट्सवर निकाल पाहू शकतात.

निकालाचे अपडेट मिळवण्यासाठी क्लिक करा

महाराष्ट्र बोर्ड 10 वी 12 वी निकाल 2024 : निकाल साईटवर कसा तपासायचा?

  • अधिकृत वेबसाइटला mahresult.nic.in वर भेट द्या.
  • मुख्यपृष्ठावर उपलब्ध महाराष्ट्र SSC, HSC निकाल 2024 लिंक तपासा.
  • लॉग इन तपशील ऍड करून सबमिट वर क्लिक करा.
  • एंटर क्लिक करा आणि पेज डाउनलोड करा.
  • निकाल डाउनलोड केल्यानंतर प्रिंट काढा.

हे ही वाचा<< १० वीच्या निकालात यंदाही मुलींची बाजी! CBSE ने जाहीर केली टक्केवारी, पुण्याचा नंबर सहावा,’या’ जिल्ह्यातील विद्यार्थी ठरले अव्वल

महाराष्ट्र बोर्डासाठी उत्तीर्ण होण्याचे निकष काय आहेत?

महाराष्ट्र बोर्डासाठी इयत्ता १० वी (SSC) आणि इयत्ता १२ वी (HSC) या दोन्ही परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्याचे निकष सारखेच आहेत. विद्यार्थ्यांनी प्रत्येक विषयात किमान ३५ टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. यामध्ये सर्व विषयांसाठी – मुख्य आणि पर्यायी अशा दोन्ही थिअरी परीक्षा आणि प्रात्यक्षिक परीक्षांचा समावेश आहे.

हे ही वाचा<<१२ वीचा निकाल जाहीर! CBSE मध्ये पुण्याचा नंबर नववा, ‘या’ लिंकवर थेट पाहा रिझल्ट

२०२४ मध्ये महाराष्ट्रात १४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे तर १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. सीबीएसई व आयसीएसईने दहावी व बारावीचे निकाल जाहीर केल्यावर महाराष्ट्र बोर्डाचे विद्यार्थी सुद्धा आता निकालाच्या प्रतिक्षेत आहेत.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big update on maharashtra board ssc hsc results 2024 msbshse class 10 and class 12th result 2024 date time official website link in marathi svs