SSC 10th Result 2024 Website Link: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे या आठवड्याच्या सुरुवातीलाच इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला. त्यापाठोपाठ आता दहावीच्या निकालाची उत्सुकता सुद्धा वाढली आहे. बारावीच्या निकालानंतर साधारण ८- १० दिवसांमध्ये दरवर्षी दहावीचा सुद्धा निकाल जाहीर केला जातो. विद्यार्थी व पालकांची उत्सुकता पाहता सोशल मीडियावर तारखांबाबत खोटी माहिती देणाऱ्या अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. यासंदर्भात काही दिवसांपूर्वी बोर्डाने एक अधिसूचना जारी करत १० वी व १२ वी च्या निकालांच्या तारखा mahahsscboard.in वर जाहीर केल्या जातील असे स्पष्ट केले होते. निकालाची तारीख ही मूळ निकालाच्या एक दिवस आधी जाहीर होईल. सकाळी साधारण ११ वाजता निकालाच्या बाबतची एकूण आकडेवारी बोर्डाचे अधिकारी पत्रकार परिषदेत सांगतील तर १ वाजल्यापासून विद्यार्थी आपले गुणपत्रक पाहू शकतील. आता हा निकाल जेव्हा येईल तेव्हा पाहायचा, कुठे व कसा हे जाणून घेऊया..
महाराष्ट्र बोर्ड: दहावीच्या निकालाच्या वेबसाईट्स
- mahresult.nic.in
- sscresult.mkcl.org
- sscresult.mahahsscboard.in.
महाराष्ट्र बोर्ड 10 वी निकाल 2024 : साईटवर कशी पाहाल मार्कशीट?
- अधिकृत वेबसाइटला mahresult.nic.in वर भेट द्या.
- मुख्यपृष्ठावर उपलब्ध महाराष्ट्र SSC Results 2024 लिंकवर क्लिक करा.
- लॉग इन तपशील भरून सबमिट वर क्लिक करा.
- एंटर क्लिक करा आणि पेज डाउनलोड करा.
- निकाल डाउनलोड केल्यानंतर प्रिंट काढा.
महाराष्ट्र बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी आवश्यक तपशील
- हॉल तिकीटवरील रोल नंबर
- आईचे नाव
याशिवाय, यंदा सुद्धा महाराष्ट्र बोर्ड परीक्षेच्या निकालाची लिंक DigiLocker ॲप आणि वेबसाइट – digilocker.gov.in वर उपलब्ध असेल. तिथे आपला निकाल कसा पाहायचा हे ही जाणून घ्या
- सर्वप्रथम, तुमच्या मोबाईल फोनवर किंवा इतर कोणत्याही डिव्हाइसवर DigiLocker ऍप्लिकेशन उघडा.
- आता, तुमचे युजरनेम आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा. आवश्यक असल्यास, तुमच्या प्रोफाइल पेजवर आधार क्रमांक सिंक प्रक्रिया पूर्ण करा.
- डाव्या साइडबारवर, ‘पुल पार्टनर डॉक्युमेंट्स’ असे लिहिलेल्या पर्यायावर क्लिक करा.
- ड्रॉपडाउन मेनूमधून ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ’ निवडा.
- तुम्हाला हवा असलेला प्रकार निवडा, जसे की SSC मार्कशीट, स्थलांतर किंवा उत्तीर्णता प्रमाणपत्र.
- उत्तीर्ण होण्याचे वर्ष आणि तुमचा रोल नंबर प्रविष्ट करा.
- तपशील सबमिट करा आणि मार्कशीट स्क्रीनवर दिसेल.
- डाउनलोड करा व प्रिंटआउट घ्या.
यंदा महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा १ ते २६ मार्च दरम्यान घेण्यात आल्या होत्या. काही दिवसांपूर्वी बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. साधारण ३१ मे ला दहावीचा निकाल जाहीर होऊ शकतो. याबाबात अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. निकाल जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांना, आपली उत्तीर्णतेची टक्केवारी पाहता येईल. तब्बल १६ लाख विद्यार्थी आपल्या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.
हे ही वाचा<< Maharashtra 12th HSC Results 2024: कोकणची पोरं हुश्शार! मुंबईत निराशा; बारावीच्या निकालाची विभागनिहाय टक्केवारी पाहा
दुसरीकडे, या वर्षी, महाराष्ट्र बारावीचा निकाल २१ मे रोजी जाहीर झाला आणि यंदा राज्याची उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.३७% आहे. यंदाही ९ विभागांमधून कोकण विभागाने बाजी मारली आहे तसेच मुलींनी यंदा सुद्धा घवघवीत यश संपादित केलं आहे. आता दहावीच्या निकालात सुद्धा हाच ट्रेंड राहणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.